शहरं
Join us  
Trending Stories
1
जयंत पाटलांची प्रदेशाध्यपद सोडण्याची इच्छा, म्हणाले, "शरद पवार यांना विनंती करतो, त्यांनी..."
2
सोनम रघुवंशीनं किती रुपयांत केली होती पती राजाच्या जीवाची 'डील'? कुणाला किती रुपये दिले अ‍ॅडव्हॉन्स? जाणून थक्क व्हाल!
3
अजित पवारांसोबत जाण्याबाबत सुप्रिया सुळेंचे मोठे विधान; पक्षाच्या वर्धापनदिनी म्हणाल्या...
4
२४ तास उलटूनही आग शमेना, अजूनही येतायत स्फोटांचे आवाज! केरळच्या समुद्रात सुरू आहे मोठं रेस्क्यू ऑपरेशन
5
Raj Kushwaha : "माझा मुलगा २० वर्षांचा, पोलीस खोटं बोलताहेत"; सोनमचा बॉयफ्रेंड राज कुशवाहच्या आईचा दावा
6
आर्थिक अडचणींना वैतागून एमबीबीएस विद्यार्थ्याची आत्महत्या; जेजे रुग्णालयाच्या वसतिगृहातील घटना!
7
'मी विधवा होऊन...', सोनम रघुवंशीनं दिलं होतं आश्वासन; ओरडून म्हणाली, 'मार दो इसे...!' 'खतरनाक' होतं संपूर्ण प्लॅनिंग
8
Vat Purnima Vrat 2025: वट पौर्णिमेची पूजा झाली, पण घाईघाईत कथा वाचायची राहून गेली? वाचा 'ही' कथा!
9
फक्त या कारणामुळे आशुतोष राणाने रेणुका शहाणेसोबत केलं लग्न, २४ वर्षांनंतर अभिनेत्रीचा खुलासा
10
"मला लग्नच करायचं नव्हतं...", उषा नाडकर्णींनी पहिल्यांदाच लग्नावर केलेलं भाष्य
11
भरमैदानात महिला अंपायरवर भडकला, आर अश्विनला चुकवावी लागली किंमत, ठोठवला मोठा दंड
12
चांदीने मोडले सर्व रेकॉर्ड! 'रिच डॅड पुअर डॅड' पुस्तकाच्या लेखकाचं भाकीत खरं ठरतंय! अजूनही आहे संधी?
13
Sonam Raghuvanshi : "राजा जवळ येतो, जे मला अजिबात आवडत नाही"; सोनमच्या चॅटमधून खळबळजनक खुलासा
14
Mumbai Local: तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईनवर वाहतूक विस्कळीत; प्रवाशांचे प्रचंड हाल, रेल्वेने दिलं स्पष्टीकरण
15
Video: हातात बेड्या, जमिनीवर फेकले अन्...अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्यासोबत अमानुष वागणूक
16
Uber Bike: उबेर बाईक चालकाचे महिला प्रवाशाशी गैरवर्तन; गोरेगाव येथील संतापजनक प्रकार!
17
Lenskart आणणार ८५०० कोटी रूपयांचा IPO; कधी करू शकता गुंतवणूक, काय आहेत डिटेल्स?
18
५०० कर्मचाऱ्यांना फर्स्ट क्लास विमान तिकिट, खर्चासाठी ८.५ लाख अन्.. नक्की कोण आहे ही 'दिलदार' महिला?
19
७ वर्षांनी मोठ्या कोंकणा सेनसोबत डेटिंगच्या चर्चांवर अभिनेत्याने सोडलं मौन, म्हणाला- "विकी-कतरिना..."
20
सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! केंद्र सरकारच्या विविध विभागांमध्ये १४,५८२ पदांवर मेगाभरती...

कणकवलीतील बेपत्ता तरुणी पोहचली छत्तीसगढमधील नक्षलग्रस्त भागात, पोलिसांनी इन्स्टाग्रामवरून काढले शोधून

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2022 14:16 IST

कणकवली पोलिसांच्या कामगिरीबाबत कौतुक

कणकवली : कणकवली येथून छत्तीसगढ राज्यात पोहोचलेल्या तरुणीचा कणकवली पोलिसांनी छत्तीसगढमधील नक्षलग्रस्त आणि अतिदुर्गम भागात जाऊन छडा लावला आणि त्या तरुणीला सुरक्षित व सुखरूप कणकवलीत आणून आईच्या हवाली केले.पोलिस निरीक्षक सचिन हुंदळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक अनिल हाडळ, पोलिस नाईक मनोज गुरव, प्रणाली जाधव यांच्या पथकाने ही कामगिरी केली. कणकवली शहरालगत आशिये गावातील एक तरुणी १६ नोव्हेंबर रोजी बँकेत जाते, असे सांगून घरातून बाहेर पडली. ती पुन्हा परतली नसल्याने ती बेपत्ता असल्याची तक्रार तिच्या आईने १७ नोव्हेंबर रोजी कणकवली पोलिस ठाण्यात दिली होती. त्या तरुणीचे इन्स्टाग्राम अकाउंट पोलिसांनी तपासले असता बेपत्ता तरुणी ही छत्तीसगढ राज्यातील दुबछोला जिल्हा कोरिया या अतिदुर्गम भागातील मैत्रिणीच्या संपर्कात असल्याचे निष्पन्न झाले होते.पोलिसांच्या कामगिरीबाबत कौतुकबेपत्ता तरुणीचे लोकेशन मिळताच उपनिरीक्षक अनिल हाडळ पथकासह ९ डिसेंबर रोजी रेल्वेने छत्तीसगढच्या दिशेने रवाना झाले. कणकवली पोलिसांनी छत्तीसगढमधील खडगवा येथील स्थानिक पोलिस ठाण्यातील पोलिसांच्या सहकार्याने कोरिया जिल्ह्यातील दुबछोला, चिरीमिरी या दुर्गम भागातून बेपत्ता तरुणीच्या इन्स्टाग्रामवरून मैत्रिणीचे घर शोधून काढले. बेपत्ता तरुणीला ताब्यात घेत छत्तीसगढमधून सुरक्षित कणकवलीत आणून तिच्या आईच्या हवाली केले. पोलिसांच्या या कामगिरीबद्दल सर्वस्तरातून त्यांचे कौतुक करण्यात येत आहे.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गCrime Newsगुन्हेगारीMissingबेपत्ता होणंPoliceपोलिसKankavliकणकवली