वेंगुर्ला प्रादेशिक फळ संशोधन केंद्रातील विहीर खचून लाखोंची हानी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 24, 2020 06:24 PM2020-10-24T18:24:53+5:302020-10-24T18:27:24+5:30

vengurla, farmaing, sindhudurgnews सर्वात मोठी विहिर परतीच्या पावसामुळे कोसळून सुमारे ७० लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. या विहिरीबरोबरच विहिरी शेजारी असलेली ४ ते ५ हजार जांभूळ कलम रोपे विहिरीत गाडली गेली आहेत.

Millions lost due to well drilling at Vengurla Regional Fruit Research Center | वेंगुर्ला प्रादेशिक फळ संशोधन केंद्रातील विहीर खचून लाखोंची हानी

प्रादेशिक फळ संशोधन केंद्रातील विहीर कोसळल्याने लाखोंची हानी झाली

googlenewsNext
ठळक मुद्देवेंगुर्ला प्रादेशिक फळ संशोधन केंद्रातील विहीर खचून लाखोंची हानी५ हजार जांभूळ कलम रोपे विहिरीत गाडली गेली

वेंगुर्ला : सर्वात मोठी विहिर परतीच्या पावसामुळे कोसळून सुमारे ७० लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. या विहिरीबरोबरच विहिरी शेजारी असलेली ४ ते ५ हजार जांभूळ कलम रोपे विहिरीत गाडली गेली आहेत.

गेले काही दिवस तालुक्यात परतीच्या पावसाने थैमान घातले असून मोठ्या प्रमाणात भातशेतीचे नुकसान झाले आहे. त्याच बरोबर काही ठिकाणी नैसर्गिक आपत्तीच्या घटनाही घडत आहे.

बुधवारी विजांच्या व ढगांच्या गडगडाटांसह कोसळलेल्या पावसामुळे येथील प्रादेशिक फळ संशोधन केंद्राची विहीर गुरुवारी पहाटे ४.३० वाजण्याच्या सुमारास कोसळली. ही विहीर २५ फूट व्यास रुंदीची व २५ फूट खोलीची होती. या विहिरीचे पाणी प्रादेशिक फळ संशोधन केंद्राच्या परीसरातील झाडांना व नर्सरीतील रोपांना पाणी देण्यासाठी वापरले जात असे.

ही विहीर ५० फुटाच्या व्यासाच्या अंतराने कोसळली असून या विहिरी शेजारी ठेवण्यात आलेली सुमारे ४ ते ५ हजार जांभूळ रोपे ही विहिरीत गाढली जाऊन त्यांचेही नुकसान झाले आहे. त्यामुळे विहिरीसह सुमारे ७० ते ८० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. या नैसर्गिक आपत्तीची नोंद वेंगुर्ला तहसिलदार कार्यालयातील नैसर्गिक आपत्ती विभागात झाली आहे.

 

Web Title: Millions lost due to well drilling at Vengurla Regional Fruit Research Center

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.