मातीचे ढिगारे कोसळून शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2021 04:53 PM2021-06-17T16:53:34+5:302021-06-17T16:55:57+5:30

Rain Sindhudurg : पाडलोस येथील तिलारी कालव्याच्या दुतर्फा असलेले मातीचे ढिगारे कोसळून शेतजमिनीचे मोठे नुकसान झाले. पावसाळ्यापूर्वी अधिकाऱ्यांनी शेताच्या बाजूने संरक्षक भिंत घालून देण्याचे आश्वासन दिले होते. परंतु, त्याला अधिकाऱ्यांनीच मूठमाती देण्याचा प्रकार घडला आहे. त्यामुळे शेती वाचविण्यासाठी आमचे संपूर्ण कुटुंब या दलदलमय चिखलात आंदोलनासाठी उतरणार असल्याचा इशारा शेतकरी राजू माधव यांनी दिला.

Massive damage to agriculture due to landslides | मातीचे ढिगारे कोसळून शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान

संततधार पावसाने पाडलोस येथील तिलारी कालव्यात शेजारील जमीन वाहून गेल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. (छाया : अजित दळवी)

Next
ठळक मुद्देपाडलोस येथील स्थिती : मातीचे ढिगारे कोसळून शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसानतिलारी कालव्याच्या दुतर्फा असलेली माती धोकादायक

बांदा : पाडलोस येथील तिलारी कालव्याच्या दुतर्फा असलेले मातीचे ढिगारे कोसळून शेतजमिनीचे मोठे नुकसान झाले. पावसाळ्यापूर्वी अधिकाऱ्यांनी शेताच्या बाजूने संरक्षक भिंत घालून देण्याचे आश्वासन दिले होते. परंतु, त्याला अधिकाऱ्यांनीच मूठमाती देण्याचा प्रकार घडला आहे. त्यामुळे शेती वाचविण्यासाठी आमचे संपूर्ण कुटुंब या दलदलमय चिखलात आंदोलनासाठी उतरणार असल्याचा इशारा शेतकरी राजू माधव यांनी दिला.

मडुरा-पाडलोस या सीमा भागात तिलारी कालव्याचे काम सुरू आहे. कालव्याच्या दुतर्फा शेतकऱ्यांच्या मोठ्या प्रमाणात बागायती आहेत. शेतकरी राजू माधव यांनी तिलारी कालव्याच्या अधिकाऱ्यांचे अशा धोकादायक परिस्थितीकडे लक्ष वेधले होते. त्यावेळी येत्या दोन दिवसात दगड टाकून त्याठिकाणी संरक्षक भिंत बांधण्याचे आश्वासन संबंधित अधिकाऱ्यांनी दिले. परंतु, अद्यापपर्यंत यावर कुठलीही कार्यवाही न झाल्याने अधिकाऱ्यांच्या आश्वासनाला त्यांनीच मूठमाती दिल्याचे माधव यांनी सांगितले.

कुटुंबासह दलदलमय चिखलात आंदोलन करणार

पावसामुळे शेतजमीन कोसळत असून, शेती बागायती करणे धोक्याचे बनले आहे. त्यामुळे आम्हा कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे. सुमारे चार ते सहा गुंठे जमीन तिलारी कालव्यात वाहून गेली असून, धोका कायम आहे. उर्वरित जमिनीत नारळ, जंगली झाडे तसेच शेतीसाठी केलेली पेरणी (तरवा) कालव्यात जाणार असल्याने याला जबाबदार कोण, असा प्रश्नही राजू माधव यांनी केला. अधिकाऱ्यांना सांगूनही याकडे दुर्लक्ष होत असल्यामुळे आपल्या कुटुंबासह याच दलदलमय चिखलात आंदोलन करणार असल्याचा इशारा शेतकरी माधव यांनी दिला.
 

Web Title: Massive damage to agriculture due to landslides

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.