कणकवली चौकातील रॅपिड टेस्टमध्ये दाम्पत्य पॉझिटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2021 19:17 IST2021-04-21T19:04:14+5:302021-04-21T19:17:05+5:30
CoronaVirus Sindhdurg :कणकवली पटवर्धन चौकात रॅपिड टेस्ट मध्ये सातत्य सुरू असून आज सकाळी साडे नऊ वाजता केलेल्या रॅपिड टेस्टमध्ये पति झ्र पत्नीचा टेस्ट रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे.

कणकवली चौकातील रॅपिड टेस्टमध्ये दाम्पत्य पॉझिटिव्ह
कणकवली :कणकवली पटवर्धन चौकात रॅपिड टेस्ट मध्ये सातत्य सुरू असून आज सकाळी साडे नऊ वाजता केलेल्या रॅपिड टेस्टमध्ये पति झ्र पत्नीचा टेस्ट रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे.
कणकवली शहरातील पटवर्धन चौकात मागील 4 दिवसांपासून थर्मल स्क्रिनिंगसह संशयितांची रॅपिड टेस्ट केली जात आहे.आज सकाळी केलेल्या रॅपिड टेस्टमध्ये पती पत्नी कोव्हीड पॉझिटिव्ह आढळले आहेत.आरोग्य विभागाच्या वतीने पॉझिटिव्ह पेशंटना पुढील सूचना देण्यात आल्या.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज सापडले तब्बल 183 पॉझिटीव्ह रूग्ण
सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज दुपारी 12 वाजेपर्यंत एकूण 7 हजार 509 कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात 2,777 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आज आणखी 183 व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. माहिती प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी दिली