शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

सिंधुदुर्गातील दोडामार्गात आढळली मॅरेस्टिका स्वॅम्प ही दुर्मीळ वनस्पती  

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2021 13:09 IST

environment News : ही वनस्पती असलेले बांबर्डेतील अडीच एकरचे क्षेत्र संरक्षित करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्याची अधिसूचनाही लवकरच निघणार आहे.

- अनंत जाधवसावंतवाडी : मॅरेस्टिका स्वॅम्प या दुर्मिळ वनस्पतीचा शोध सिंधुदुर्ग जिल्हयातील दोडामार्ग तालुक्यातील बांबर्डे येथे लागला असून, ही वनस्पती भारतात दोन ठिकाणीच आढळून आली आहे. पूर्वी ती केरळ येथे सापडली होती. तर एक वर्षापूर्वी महाराष्ट्रात सापडली आहे. ही वनस्पती असलेले बांबर्डेतील अडीच एकरचे क्षेत्र संरक्षित करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्याची अधिसूचनाही लवकरच निघणार आहे.मॅरेस्टिका स्वॅम्प ही दुर्मिळ वनस्पती दोडामार्ग तालुक्यातील बांबर्डे येथे आहे. एक वर्षापूर्वी ही वनस्पती या परिसरात असल्याचा शोध लागला असून, अतिशय दलदलीच्या भागात ही वनस्पती आहे. राज्य सरकारचे सल्लागार अफरोझ अहमद यांनी एक वर्षापूर्वी या भागाला भेट देऊन प्रत्यक्ष पाहाणी केली. त्यानंतर तसा अहवाल राज्य सरकारला दिला होता. राज्य सरकारने यांची विशेष दखल घेतली. भारतात दोनच ठिकाणी ही वनस्पती आढळून आली आहे. यात पूर्वी केरळचा उल्लेख केला जात असे तर आता ही वनस्पती दोडामार्ग तालुक्यातील बांबर्डे येथे आढळून आल्याने शासनाने हा परिसर संरक्षित करण्याचा निर्णय घेतला आहे.या भागाला राज्य सरकारने बांबर्डे मॅरेस्टिका स्वॅम संवर्र्धन राखीव क्षेत्र असे नाव दिले असून, हा अडीच हेक्टरचा परिसर संरक्षित करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र या वनस्पतीचा उपयोग कशासाठी केला जातो हे अद्यापपर्यत सांगण्यात आले नसून, ही वनस्पती अतिशय दुर्मिळ असल्यानेच ही संरक्षित करण्याचे शासनाने ठरविले असे सांगितले जाते. त्यामुळेच सिंधुदुर्ग वनविभगााचे सहाय्यक वनसंरक्षक आय. डी जलगावकर यांनी २० डिसेंबर रोजी बांबर्डे गावात जाऊन बैठक घेत ग्रामस्थांची चर्चा केली. ग्रामस्थही सकारात्मक असून, त्यांनीही या प्रस्तावास मंजूरी दिली आहे.त्या मुळे लवकरच हा परिसराचे संवर्धन होणार आहे. याबाबतचा अहवाल सिंधुदुर्ग वनविभागाने राज्यसरकारला पाठवला असून, लवकरच याबाबतची अधिसूचना राज्य सरकार काढणार आहे. बांबर्डे मॅरेस्टिका स्वॅम संवर्र्धन राखीव क्षेत्र असे नामकरणदोडामार्ग तालुक्यात बांबर्डे हे गाव असले तरी तेथून गोवा हा हाकेच्या अंतरावर आहे. ही वनस्पती बांबर्डेच्या जंगल परिसरात अतिशय दलदलीच्या भागात असून, वडा सारखीच ही वनस्पती दिसायला आहे, असे वन अधिकारी सांगतात. तिच्या पारंब्या ही जमिन पर्यत आहेत. या वनस्पतीमूळे बांबर्डेचे नामकरण बांबर्डे मॅरेस्टिका स्वॅम संवर्धन राखीव क्षेत्र असे करण्यात आले आहे. भविष्यात या वनस्पतीमूळे हा भाग पर्यटन दृष्ट्याही विशेष महत्व प्राप्त होणार आहे.

टॅग्स :environmentपर्यावरणsindhudurgसिंधुदुर्गMaharashtraमहाराष्ट्र