शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

वैभव नाईकांच्या समर्थनात मोर्चा: अरविंद सावंतांसह पंधरा जणांवर कुडाळमध्ये गुन्हे दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 20, 2022 13:43 IST

मात्र आमदार वैभव नाईक यांच्यावर गुन्हा दाखल नाही. त्यामुळे पोलिसांच्या भूमिकेबद्दल संशय व्यक्त केला जात आहे.

कुडाळ: आमदार वैभव नाईक यांची लाच लुचपत प्रतिबंध विभागाने सुरू केलेल्या चौकशीच्या विरोधात कुडाळ येथे शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाच्यावतीने मोर्चा काढण्यात आला. मोर्चेकरांवर मनाई आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी कुडाळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आले आहेत. प्राथमिक १५ जणांवर हे गुन्हे दाखल झाले आहेत. या संदर्भात पोलीस व्हिडिओ रेकॉर्डिंग वरून अन्य कार्यकर्त्यांवर सुद्धा गुन्हे दाखल करण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.सध्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये जिल्हाधिकारी यांनी मनाई आदेश लागू केला आहे. असे असताना आमदार वैभव नाईक यांची लाचलुचपत प्रतिबंध विभागामार्फत सुरू असलेल्या चौकशीच्या विरोधात उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्यावतीने कुडाळ येथे मोर्चा काढण्यात आला. या मोर्चाच्या माध्यमातून मनाई आदेशाचे उल्लंघन करण्यात आले.मनाई आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत, आमदार भास्कर जाधव, संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर, जिल्हाप्रमुख संजय पडते, तालुकाप्रमुख राजन नाईक, गौरीशंकर खोत, सतीश सावंत, संतोष शिरसाट, रुपेश पावसकर, अतुल बंगे, संदेश पारकर, जान्हवी सावंत, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अमित सामंत, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष इर्शाद शेख, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अभय शिरसाट यांच्या विरोधात कुडाळ पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल झाले आहेत. याबाबत कुडाळ पोलीस ठाण्याच्या उपनिरीक्षक तेजस्वी शिंदे यांनी शासकीय तक्रार दाखल केली आहे. दरम्यान या प्रकरणाचा तपास करत असताना मोर्चाच्या व्हिडिओ रेकॉर्डिंग वरून अन्य कार्यकर्त्यांवर सुद्धा गुन्हे दाखल होण्याची शक्यता आहे.वैभव नाईकांना वगळले?या मोर्चामध्ये आमदार वैभव नाईक हे सहभागी झाले होते आणि यासंदर्भातील व्हिडिओ रेकॉर्डिंग सुद्धा आहेत. मात्र कुडाळ पोलिसांनी आमदार वैभव नाईक यांच्यावर मनाई आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केलेला नाही. त्यामुळे पोलिसांच्या भूमिकेबद्दल संशय व्यक्त केला जात आहे.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गVaibhav Naikवैभव नाईक Arvind Sawantअरविंद सावंतPoliceपोलिस