आंबा, काजू पिकाला फटका बसण्याची शक्यता, वातावरणातील बदलामुळे बागायतदार चिंतातूर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2019 15:17 IST2019-02-19T15:13:48+5:302019-02-19T15:17:55+5:30
वैभववाडी तालुक्याच्या काही भागात पावसाचा शिडकावा झाला. त्यानंतर अचानक दिवसभर ढगाळ वातावरण आणि उकडा वाढला होता. वातावरणातील या बदलामुळे आंबा, काजू बागायतींना कीडरोग तसेच फळझडीचा धोका उद्भवून उत्पादनात घट होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे आंबा व काजू बागायतदार चिंतातूर असल्याचे दिसून येत आहे.

आंबा, काजू पिकाला फटका बसण्याची शक्यता, वातावरणातील बदलामुळे बागायतदार चिंतातूर
वैभववाडी: तालुक्याच्या काही भागात पावसाचा शिडकावा झाला. त्यानंतर अचानक दिवसभर ढगाळ वातावरण आणि उकडा वाढला होता. वातावरणातील या बदलामुळे आंबा, काजू बागायतींना कीडरोग तसेच फळझडीचा धोका उद्भवून उत्पादनात घट होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे आंबा व काजू बागायतदार चिंतातूर असल्याचे दिसून येत आहे.
गेल्या आठवड्यात तीन दिवस झालेल्या वादळीवा-यामुळे तालुक्यातील अनेक शेतक-यांच्या काजू बागा उध्वस्त झाल्या. त्यानंतर अचानक थंडीची लाट वाढल्यामुळे वातावरण बदलले होते. त्यानंतर आता थंडी गायब होऊन उष्म्याचे प्रमाण वाढले आहे. तालुक्यात खांबाळे, आचिर्णे परिसरात पावसाचा शिडकावा झाला. तर काही ठिकाणी किरकोळ वाराही झाला.
वातावरणातील उष्म्याचे प्रमाण चांगलेच वाढले आहे. पावसाचा शिडकावा, ढगाळ वातावरण आणि उकाड्यामुळे अवकाळी पावसाची शक्यता निर्माण झाली असून पावसाच्या शिडकाव्याचा काजू आणि बहरणा-या आंबा पावसाच्या शिडकाव याचा मोहोराला मोठा फटका बसण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. त्यामुळे बागायतदार चांगलेच धास्तावले आहेत.
वादळी वा-यामुळे बागायतींचे व पिकाचे मोठे नुकसान झाले. त्यातून सावरत असतानाच पावसाचा शिडकावा आणि ढगाळ वातावरण हा वातावरणात झपाट्याने सुरु असलेला बदल कीडरोगांच्या प्रादुभार्वास आमंत्रण देणारा असल्याने तो बागायतदार चिंतातूर झाले आहेत. वातावरणातील बदलामुळे अवकाळी पाऊस झालाच तर काजू बागायतींचे अतोनात नुकसान होण्याची शक्यता आहे.