शहरं
Join us  
Trending Stories
1
रशिया, चीनची जर क्षेपणास्त्रे आली तर अमेरिका बचाव करू शकणार नाही; पेंटागनची धक्कादायक कबुली 
2
सोनम रघुवंशी जामिनावर सुटली, पण मेघालयातच अडकली; शिलॉन्ग न्यायालयाचा मोठा निर्णय
3
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
4
"हिंदू असल्याचे सांगताच त्याने हात पकडला अन्..."; मीरा रोड हल्ल्याचा धक्कादायक घटनाक्रम समोर
5
मनू भाकरला विचारला वैभव सूर्यवंशीबद्दलचा 'तो' प्रश्न; सोशल मीडियावर संतापले चाहते, काय घडलं?
6
इच्छा तिथे मार्ग! वडील गमावल्याचं दु:ख, बारावीत नापास; मेहनतीने भाजी विकणारा झाला IAS
7
“इथे व्यवसाय करायचा असेल तर मराठी येणे आवश्यकच”; मंत्री प्रताप सरनाईकांनी स्पष्टच सांगितले
8
Facebook Instagram Rules : तुमच्या मृत्यूनंतर फेसबुक-इंस्टाग्राम कोण चालवणार? मेटाचा नवा नियम; 'डिजिटल मृत्युपत्र' लिहिता येणार
9
सहा वर्षांनी...! भारत-चीन हवाई कनेक्टिव्हिटी पुन्हा सुरू! इंडिगोचे विमान ग्वांगझूमध्ये उतरले; एअर चायनाचीही दिल्ली-बीजिंग सेवा सुरू
10
पेट्रोल-डिझेल गाड्या इतिहासजमा होणार; नितीन गडकरींचा वाहन उत्पादकांना इशारा...
11
IPL 2026: अजब गजब आरोप! वैभव सूर्यवंशीच्या बॅटबद्दल बोलताना PAK एक्सपर्टने तोडले अकलेचे तारे
12
कोकणवासींना गुड न्यूज! १ मेपासून विशेष ट्रेन, वीकेंडला स्पेशल ३६ सेवा; कधीपर्यंत सुरू असेल?
13
रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी'ची क्रेझ! प्रदर्शनाआधीच हजारो तिकिटांची विक्री; वाचा रिपोर्ट
14
कंपन्या AI साठी कर्मचाऱ्यांना काढतायत नंतर पस्तावतायत! पगारापेक्षा जास्तच होतोय खर्च, काय म्हणतायत कंपन्यांचे सीईओ... 
15
तिसऱ्यांदा बोनस शेअर देणार 'ही' बँक; पाहा किती Shares मिळणार? डिविडंडचीही घोषणा
16
‘शिवाजी कोण होता?’ वाचनावरून तणाव; पोलिसांनी आंदोलन चिरडल्याचा आरोप
17
रविंद्र जडेजाची बहीण काँग्रेसच्या तिकीटावर लढली, हरली! गुजरातमध्ये १० महानगरपालिकांवर भाजपचा ताबा
18
“अरविंद केजरीवाल कार्यालयात महात्मा गांधींची प्रतिमा का लावत नाहीत”; काँग्रेसचा थेट सवाल
19
Harsha Richhariya : "एकही आरोप सिद्ध झाला तर सर्व संपत्ती..."; हर्षा रिछारियाचं सडेतोड उत्तर, दिलं थेट आव्हान
20
"माझी मुलं श्रेयस अय्यरला हाक मारताना..."; प्रिती झिंटाने IPLच्या 'सरपंच'बद्दल केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

मालवणची ‘फ्लार्इंग क्वीन’ कोकण विभागात द्वितीय

By admin | Updated: August 26, 2015 00:21 IST

राज्यस्तरीय फेरीसाठी निवड : महाविद्यालयीन स्तरावर प्रतिष्ठेची पुरुषोत्तम करंडक स्पर्धा

मालवण : महाविद्यालयीन स्तरावर प्रतिष्ठेची स्पर्धा म्हणून ओळखली जाणाऱ्या पुरुषोत्तम करंडक स्पर्धेत येथील स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी यश संपादन केले आहे. रत्नागिरी येथे झालेल्या कोकण विभागीय फेरीत महाविद्यालयाच्या ‘फ्लार्इंग क्वीन’ या एकांकिकेला द्वितीय क्रमांक प्राप्त झाला आहे. या स्पर्धेची राज्यस्तरीय फेरी जानेवारी महिन्यात पुणे येथे होणार आहे. पुरुषोत्तम करंडक स्पर्धेत विद्यार्थ्यांनी यश संपादन केल्याबद्दल सर्वत्र अभिनंदन होत आहे. महाविद्यालयाच्यावतीने प्राचार्य डॉ. श्रीरंग मंडले यांच्या उपस्थितीत सहभागी विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. रत्नागिरी येथील सावरकर नाट्यगृहात पुरुषोत्तम करंडक स्पर्धेची विभागीय फेरी झाली. या स्पर्धेत सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यातील १६ महाविद्यालयांनी सहभागी झाले होते. महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी संजय पवार लिखित ‘फ्लार्इंग क्वीन’ ही एकांकिका सादर केली. यात निखिला घाडीगावकर, विधिता मोंडकर, माधुरी मेस्त्री, वैभव खोबरेकर, राहुल जाधव, तुषार हिर्लेकर, पलाश चव्हाण, प्रथमेश सरंबळकर, कोमल जोशी, प्रगती मुळीक या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. यांना विशाल राऊत, देवानंद दुखंडे, रोहित कांबळे, विवेक जाधव, विश्राम कदम, रोहन कदम आदींचे सहकार्य लाभले.पुणे येथे होणाऱ्या राज्यस्तरीय फेरीसाठी या एकांकिकेची निवड करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांचे नेतृत्व डॉ. उज्वला सामंत, भक्ती मेस्त्री, कैलास राबते, नंदन पाटील यांनी केले. विद्यार्थ्यांना स्पर्धेच्या रंगीत तालीमेसाठी नगरपरिषदेच्यावतीने मामा वरेरकर नाट्यगृह विनामोबदला उपलब्ध करून दिल्याबद्दल पालिकेचे महाविद्यालयाच्यावतीने आभार मानण्यात आले. विजेत्या विद्यार्थ्यांचे प्राचार्य डॉ. श्रीरंग मुंडले यांच्या उपस्थितीत अभिनंदन करण्यात आले. (प्रतिनिधी)