जिन्यावरुन पडलेल्या मालाडच्या युवकाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2019 15:04 IST2019-07-30T15:03:24+5:302019-07-30T15:04:49+5:30
जिन्यावरून पडल्याने गंभीर जखमी झालेल्या चाकरमान्याचा उपचारादरम्यान बांबोळी येथे निधन झाले. अवधूत वालावलकर ( ४३, रा. मालाड -मुंबई) असे त्याचे नाव आहे.

जिन्यावरुन पडलेल्या मालाडच्या युवकाचा मृत्यू
सावंतवाडी : जिन्यावरून पडल्याने गंभीर जखमी झालेल्या चाकरमान्याचा उपचारादरम्यान बांबोळी येथे निधन झाले. अवधूत वालावलकर ( ४३, रा. मालाड -मुंबई) असे त्याचे नाव आहे.
माठेवाडा येथील आपले चुलत भाऊ संदीप परूळकर यांच्या घरी ते आले होते. यावेळी इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर जिन्यात ते सहज कुटुंबासोबत गप्पा मारत बसले होते. मात्र अचानक तोल गेल्यामुळे तिसºया मजल्यावरून थेट खाली कोसळले.
यात त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्यांना अधिक उपचारासाठी येथील कुटीर रुग्णालयात दाखल केले होते. मात्र, डोक्याची दुखापत मोठी असल्यामुळे त्यांना अधिक उपचारासाठी गोवा-बांबोळी येथे हलविण्यात आले होते. तेथे उपचार सुरू असताना रात्री दीड वाजण्याच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली.
वालावलकर हे मूळचे मालाड-मुंबईतील आहेत. त्यांची कुडाळ परिसरात मालमत्ता असून, या ठिकाणी ते काही काम असल्यामुळे आले होते. मात्र, अचानक झालेल्या अपघातात त्यांना मृत्यूच्या दाढेत जावे लागले. याबाबतची माहिती काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा सामाजिक कार्यकर्ते राजू मसुरकर यांनी दिली. वालावलकर यांच्या पश्चात मुलगा व पत्नी असा परिवार आहे.