शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

घरात घुसून दागिने लुटणाऱ्या संशयिताचे रेखाचित्र तयार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2019 10:41 IST

तीन दिवसांपूर्वी कोकिसरे बांधवाडी आणि तळेरे परिसरातील घरात घुसून दागिने लुटणाऱ्या संशयिताचे रेखाचित्र पोलिसांनी प्रसिद्ध केले आहे. रेखाचित्राशी साधर्म्य असलेली व्यक्ती आढळून आल्यास किंवा त्याच्याबाबत माहिती मिळाल्यास तातडीने नजीकच्या पोलीस ठाण्यात संपर्क साधण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.

ठळक मुद्देघरात घुसून दागिने लुटणाऱ्या संशयिताचे रेखाचित्र तयारमाहिती मिळाल्यास पोलीस ठाण्यात संपर्क साधण्याचे आवाहन

वैभववाडी : तीन दिवसांपूर्वी कोकिसरे बांधवाडी आणि तळेरे परिसरातील घरात घुसून दागिने लुटणाऱ्या संशयिताचे रेखाचित्र पोलिसांनी प्रसिद्ध केले आहे. रेखाचित्राशी साधर्म्य असलेली व्यक्ती आढळून आल्यास किंवा त्याच्याबाबत माहिती मिळाल्यास तातडीने नजीकच्या पोलीस ठाण्यात संपर्क साधण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.कोकिसरे बांधवाडी येथील नारकर दाम्पत्य बुधवारी दुपारच्या सुमारास घरात विश्रांती घेत होते. त्यावेळी हेल्मेटधारी अज्ञाताने घरात घुसून आनंदी नारकर यांच्या गळ्यातील १ लाख रुपये किमतीचे दागिने हिसकावून दुचाकीवरून पलायन केले. भरदिवसा चोरी झाल्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण होते. त्यानंतर तळेरे वाघाचीवाडी येथील महिलेकडे पाणी मागून एकजण घरात घुसला.

तेथेही महिलेच्या गळ्यातील दागिना हिसकावताच महिलेने आरडाओरडा केल्यामुळे चोरट्याने तेथून पळ काढला. त्यानंतर तळेरे बाजारपेठेत भाजी विक्रेत्या महिलेच्या हातातील पर्स चोरट्याने हातोहात लांबविली होती. तेथून कासार्डे गावातील घरात घुसून महिलेच्या गळ्यातील दागिने लुटण्याचा अयशस्वी प्रयत्न चोरट्याने केला होता.एकाच दिवशी चोरट्याने चार ठिकाणी हा प्रकार केल्यामुळे चोरटा हा सराईत असावा असा पोलिसांचा अदांज आहे.त्यामुळे पोलिसांनी अन्य जिल्ह्यातील हिस्ट्रीशिटरची माहिती घेण्यास सुरुवात केली आहे. याशिवाय वैभववाडी, तळेरे, परिसरातील काही ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज मिळविण्याचा पोलिसांचा प्रयत्न सुरू आहे.माहितीनुसार बनविले रेखाचित्रतळेरे परिसरात ज्या महिलांनी चोरट्याचा चेहरा पाहिला होता त्यानी दिलेल्या माहितीनुसार संशयित लुटारुचे रेखाचित्र तयार केले आहे. हे रेखाचित्र शनिवारी पोलिसांनी प्रसिध्दीसाठी दिले आहे. तशा वर्णनाची व्यक्ती आढळून आल्यास किंवा माहिती मिळाल्यास पोलीस उपनिरीक्षक दीपक शेणवी किंवा वैभववाडी पोलीस स्थानक ०२३६७ :२३७१३३ येथे संपर्क साधावा, असे आवाहन सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय बाकारे यांनी केले आहे.अनोळखी व्यक्तीला घरात प्रवेश नकोसध्या वीज कंपनीकडून होणाऱ्या मीटर रिडींगच्या नावाखाली घरात घुसून दागिने लुटण्याचे प्रकार घडत आहेत. त्यामुळे वीज मीटर रिडींगसाठी नेहमीच्या माणसाखेरीज परकी अनोळखी व्यक्ती तसेच पाणी पिण्यासाठी किंवा दागिने पॉलिश करण्यासाठी कोणीही अनोळखी व्यक्ती दारात आल्यास त्याला घरात घेऊ नये, असे आवाहन वैभववाडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय बाकारे यांनी केले आहे. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीsindhudurgसिंधुदुर्ग