शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
2
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
3
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
4
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
5
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
6
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
7
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
8
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
9
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
10
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
11
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
12
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
13
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
14
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
15
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : निलेश राणेंचं ठरलं! धनुष्यबाण हाती घेणार, कुडाळ विधानसभा मतदारसंघातून लढणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 22, 2024 13:42 IST

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माजी खासदार निलेश राणे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 ( Marathi News ) : विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली आहे. जागावाटपांबाबत बैठकांचे सत्र सुरू असून भाजपाने ९९ जागांची पहिली यादी जाहीर केली आहे. तर दुसरीकडे कोकणातून एक मोठी बातमी समोर आली आहे. माजी खासदार निलेश राणे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणार असून कुडाळ विधानसभा मतदारसंघातून ते निवडणूक लढणार आहे. याबाबत राणे यांनी आज पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली. 

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : " सापडलेल्या पाच कोटी प्रकरणी संजय राऊतांची चौकशी व्हावी,", अजितदादांच्या नेत्याने केली मागणी

उद्या बुधवारी २३ ऑक्टोंबर रोजी शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची माहिती निलेश राणे यांनी दिली.  पत्रकार परिषदेत बोलताना माजी खासदार निलेश राणे म्हणाले, मी २०१९ ला राणे साहेबांसोबत भाजपामध्ये प्रवेश केला होता. भाजपामधील सगळ्या नेत्यांनी आदर दिली खूप प्रेम दिलं. देवेंद्र फडणवीस यांनी मला लहान भावाप्रमाणे सांभाळलं, पक्षामध्ये स्थान दिलं. राजकारणात सुरुवातीपासून राणे साहेबांच्यासोबत मी राहिलो आहे. उद्या २३ तारखेला दुपारी ४ वाजता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीतीमध्ये कुडाळ हायस्कूल मैदानावर माझ्या प्रवेशाची सभा होणार आहे. माझा प्रवेश उद्या नक्की झाला आहे, अशी माहिती माजी खासदार निलेश राणे यांनी दिली.

"युतीच्या प्रोटोकॉलनुसार आपल्याला काम करायला लागते. या मतदारसंघात मी खूप वर्षे काम करत आहे, लोकसभेला आम्ही २७ हजाराचे लीड घेतले. ९० टक्के ग्रामपंचायती जिंकल्या, खरेदी विक्री संघ आम्ही जिंकले आहेत. खासदारकीही आम्ही जिंकली आहे. येणारी विधानसभाही आम्ही टीमवर्कने लढणार आहोत, असंही निलेश राणे म्हणाले.

...त्याच चिन्हावर काम करायला मिळणार याचा आनंद 

" राणे साहेबांची सुरुवात ज्या चिन्हावरुन झाली, आज मला त्याच चिन्हावर काम करण्याची संधी मिळणार आहे. या गोष्टीचा मला आनंद  आणि समाधान आहे. शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली मला काम करायला मिळणार आहे, असंही राणे म्हणाले. 

निलेश राणे म्हणाले, हा मतदारसंघ टॉपमध्ये कसा येईल हा माझा प्रयत्न आहे. मी एकदा खासदार झालोच आहे. २१ व्या शतकातील मतदारसंघ वाटला पाहिजे यासाठी मी प्रयत्न करत आहे. पक्षहितासाठी मला जे करावं लागणार ते मी करणार आहे. 

२००५ नंतर राणे पुन्हा शिवसेनेत

२००५ मध्ये खासदार नारायण राणे यांनी शिवसेना सोडली होती. यानंतर त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला, आता पुन्हा १९ वर्षानंतर नारायण राणे यांचे चिरंजीव निलेश राणे शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. १९ वर्षानंतर पहिल्यांदा ते शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हावर निवडणूक लढवणार आहेत.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Electionनिवडणूक 2024Shiv SenaशिवसेनाBJPभाजपाNilesh Raneनिलेश राणे sindhudurgसिंधुदुर्ग