शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Election 2019 : नारायण राणेंचा महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष भाजपात विलीन

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 15, 2019 15:10 IST

Konkan Vidhan Sabha Election : गेल्या काही काळापासून तारीख पे तारीख करत रेंगाळलेले महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे विलिनीकरण अखेर आज मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत झाले.

कणकवली/मुंबई -  गेल्या काही काळापासून तारीख पे तारीख करत रेंगाळलेले महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे विलीनीकरण आणि कार्यकरत्यांचा  भाजपा प्रवेश अखेर आज मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत झाला. यावेळी माजी खासदार निलेश राणेंसह  महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे असंख्य कार्यकर्ते भाजपामध्ये दाखल झाले. यावेळीच नारायण राणे यांनी महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष भाजपात विलीन झाल्याची घोषणा केली. त्यानंतर या सर्व पदाधिकाऱ्यांसह महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे भाजपामध्ये विलिनीकरण झाल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाच्या विलिनीकरणाची घोषणा करताना नारायण राणे यांनी कोकणच्या विकासासाठी आपण भाजपामध्ये प्रवेश केल्याचे सांगितले. यावेळी नारायण राणे म्हणाले की, ''गेल्या काही काळापासून पक्षप्रवेशाबाबत विचारणा होत होती. अखेर आज त्या प्रश्नाचं उत्तर बोलता मिळालं आहे. आज माझ्यासह स्वाभिमान पक्षाच्या कार्यकर्त्यांचा भाजपामध्ये प्रवेश झाला आहे. 

यावेळी कोकणाच्या विकासाबाबतच्या काही मागण्या नारायण राणेंनी मुख्यमंत्र्यांसमोर मांडल्या. सिंधुदुर्ग जिल्हा हा पर्यटन केंद्र म्हणून विकसित करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी आम्हाला सहकार्य करावे. येथील विकासासाठी त्यांनी मदत करावी, अशी आमची  मागणी आहे, असे नारायण राणे म्हणाले. तसेच कोकणातील नागरिकांचे हित मी नेहमी पाहत आलो आहे आणि त्यासाठी प्रामाणिकपणे काम केले आहे. आज काही मिळविण्यासाठी मी भाजपमध्ये आलो नाही. महाराष्ट्रातील विकास पाहून मी तुमच्या नेतृत्वाखाली काम करण्यासाठी भाजपमध्ये आलो आहे, असेही त्यांनी पुढे सांगितले. 

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Narayan Raneनारायण राणे maharashtra swabhimaani pakshमहाराष्ट्र स्वाभिमान पक्षBJPभाजपाkankavli-acकणकवलीkonkanकोकणAssembly Election 2019विधानसभा निवडणूक 2019Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस