शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

उद्धव ठाकरेंचा सोडा पहिला आमचा ताफा अडवून दाखवा, विनायक राऊतांचे राणेंना आव्हान

By अनंत खं.जाधव | Updated: November 11, 2024 13:05 IST

राणे खासदार झाले अन् विमानळ बंद पडले

सावंतवाडी : शिवसेना उद्धवसेनेचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या गाड्याचा ताफा अडवण्यापूर्वी हिम्मत असेल तर आमच्या गाड्याचा ताफा आडवा मग उद्धवसेनेची ताकद तुम्हाला दाखवू असे खुले आव्हान उध्दव सेनेचे नेते माजी खासदार विनायक राऊत यांनी दिले. सावंतवाडीत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. राणे खासदार झाले आणि चिपी विमानतळ बंद पडले असा घणाघात त्यांनी यावेळी केला.राऊत म्हणाले, नारायण राणे खासदार म्हणून निवडून आल्यानंतर पहिले काम चिपी विमानतळावरून विमानाचे उड्डाण बंद झाले असे निष्क्रिय खासदार आहेत. हे विमानतळ पुन्हा सुरू व्हावे म्हणून आमचे प्रयत्न सुरू आहेत. लोकसभा निवडणुकीत मोठ्याप्रमाणात पैशाचा वापर झाला म्हणूनच आपणास पराभव पत्करावा लागला. पण आता यांना जनता धडा शिकवेल. उद्धव ठाकरे हे सिंधुदुर्ग जिल्ह्यात आल्यानंतर राणे त्यांची गाडी अडवू म्हणतात पण त्यांची गाडी सोडा आमचीच गाडी अडवून दाखवा असे खुले आव्हान राऊत यांनी दिले.पंधरा वर्षे थापा मारुन सावंतवाडी मतदार संघातील लोकांना उल्लू बनविणार्‍या दीपक केसरकरांपेक्षा राजन तेली उजवे आहेत. जनता दीपक केसरकरांना कंटाळली आहे. त्यांची खोटी आश्वासने, थापेबाजपणा आता लोकांच्या लक्षात आला आहे. त्यामुळे काही झाले तरी आता आम्ही केसरकरांना मदत करणार नाही, असा चंग येथील जनतेने बांधला असल्याचे राऊत म्हणाले. पत्रकार परिषदेस माजी मंत्री प्रविण भोसले, राजन तेली, जिल्हाप्रमुख बाबुराव धुरी, उपनेत्या जान्हवी सावंत, रूपेश राऊळ, मायकल डीसोझा, सागर नाणोसकर आदी. उपस्थित होते.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४sawantwadi-acसावंतवाडीVinayak Rautविनायक राऊत Uddhav Thackerayउद्धव ठाकरेNarayan Raneनारायण राणे thane kokan regionThane Kokan Assembly Election 2024