शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
5
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
6
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
7
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
8
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
9
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
10
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
11
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
12
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
13
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
14
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
15
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
16
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
17
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
18
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
19
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
20
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

Sindhudurg: दादागिरी महागात पडली, पुण्याच्या पर्यटकांना स्थानिकांकडून चोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2025 17:17 IST

ओरोस : पुण्याहून जीवाची गोवा करण्यास आलेल्या आणि पुन्हा पुण्याला परत जात असताना सिंधुदुर्ग जिल्ह्यात महामार्गनजीक एका सीएनजी पंपावर ...

ओरोस : पुण्याहून जीवाची गोवा करण्यास आलेल्या आणि पुन्हा पुण्याला परत जात असताना सिंधुदुर्ग जिल्ह्यात महामार्गनजीक एका सीएनजी पंपावर केलेली दादागिरी या सर्व पर्यटकांना महागात पडली आणि गोव्यातील नशा सिंधुदुर्गात उतरली. मात्र हे सर्व महाविद्यालय विद्यार्थी असल्याने आणि त्यांचे भविष्य बाद होऊ नये या उदात्त हेतूने जिल्हावासीयांनी त्यांना केवळ चोप देऊन सोडून दिले.पुणे येथून काही तरुण पर्यटक गोव्याला पर्यटनासाठी गेले होते. गोव्यात पर्यटन केल्यानंतर हे पर्यटक सिंधुदुर्ग मार्गे पुन्हा गोव्याला जाण्यासाठी निघाले. हे पर्यटक सिंधुदुर्गातील महामार्ग नजीक असलेल्या एका सीएनजी पेट्रोल पंपावर सीएनजी भरण्यासाठी थांबले या पंपावरील कर्मचाऱ्यांनी सीएनजी भरण्यासाठी गाडीत असलेल्या सर्वांना खाली उतरण्यास सांगितले. मात्र हे सर्व पर्यटक खाली उतरण्यास तयार झाले नाहीत. त्याबरोबरच त्यांनी त्या पेट्रोल पंपावरील त्या कर्मचाऱ्याला शिव्या देण्यास सुरुवात केली.यानंतर तिथे उपस्थित असलेल्या काही जणांनी गाडीतून खाली उतरा तर सीएनजी भरेन असे सांगितले. मात्र त्यांनाही ते ऐकले नाहीत. उलट शिव्या देत त्या कर्मचाऱ्याला मारहाण करण्यास सुरूवात केली. हे पाहताच आजूबाजूच्या रिक्षाचालक तसेच स्थानिकांनी संबंधित पर्यटकांना अडवण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांनाही त्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यानंतर दोन कारमधून आलेल्या सर्व पर्यटकांनी खाली उतरून मारण्यास सुरुवात केली. शेवटी यातील काही पर्यटकांनी आपल्या गाड्यांमध्ये बसून तिथून पळ काढला. मात्र पाच ते सहा जण स्थानिकांच्या हातात सापडले. त्यांना चांगला चोप दिला आणि पोलिसांच्या ताब्यात दिले. मात्र हे पर्यटक महाविद्यालयीन विद्यार्थी होते. या राड्यामध्ये गाड्यांचे मोठे नुकसान झाले आहे.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गgoaगोवाPuneपुणेCrime Newsगुन्हेगारी