सावंतवाडीत महाविकास आघाडीत फूट, काँग्रेसकडून साक्षी वंजारी नगराध्यक्षपदांच्या उमेदवार
By अनंत खं.जाधव | Updated: November 18, 2025 09:07 IST2025-11-18T09:06:13+5:302025-11-18T09:07:01+5:30
Local Body Election 2025: महायुती पाठोपाठ महाविकास आघाडीतील बोलणी फिस्कटल्याने उध्दव सेनेकडून सुरूवातीला सीमा मठकर यांची उमेदवारी जाहीर करत उमेदवारी अर्ज दाखल केला होता त्यानंतर आता काँग्रेस कडून नगराध्यक्ष पदासाठी आपला उमेदवार जाहीर केला असून महिला काँग्रेस च्या अध्यक्षा साक्षी वंजारी यांना मैदानात उतरविले आहे.

सावंतवाडीत महाविकास आघाडीत फूट, काँग्रेसकडून साक्षी वंजारी नगराध्यक्षपदांच्या उमेदवार
सावंतवाडी - महायुती पाठोपाठ महाविकास आघाडीतील बोलणी फिस्कटल्याने उध्दव सेनेकडून सुरूवातीला सीमा मठकर यांची उमेदवारी जाहीर करत उमेदवारी अर्ज दाखल केला होता त्यानंतर आता काँग्रेस कडून नगराध्यक्ष पदासाठी आपला उमेदवार जाहीर केला असून महिला काँग्रेस च्या अध्यक्षा साक्षी वंजारी यांना मैदानात उतरविले आहे. त्यामुळे काँग्रेस स्वतंत्र लढणार हे आता निश्चित झाले आहे.
महाविकास आघाडीत बिघाडी झाली आहे. महायुतीनंतर आता आघाडीतही फुट पडली आहे. उध्दव सेनेकडून कोणालाही विश्वासात न घेता उमेदवारी जाहीर करण्यात आली होती यावरून काँग्रेस व उध्दव सेनेत सर्घष होता तरीही चर्चेच्या तीन ते चार फेऱ्या झाल्या तरीही काहि जागांवर एकमत होत नसल्याने अखेर उध्दव सेनेकडून शरद पवार गट व मनसे ला सोबत घेत सर्व जागांवर उमेदवार जाहीर केले होते.
त्यानंतर काँग्रेस च्या वतीने सोमवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले असून यात प्रभाग एक मधून तैकिर शेख, शिल्पा कांबळी, प्रभाग दोन गणपत नमशी, प्रभाग तीन राघवेंद्र नार्वेकर, स्नेहल मसुरकर, प्रभाग चार यशवंत पेडणेकर. निशांत शेख, प्रभाग पाच समीर वंजारी, रितू परब, प्रभाग सहा अरूण भिसे , साक्षी वंजारी, प्रभाग आठ सुमिधा सावंत, प्रभाग सात प्रज्ञा चौगुले, प्रभाग नऊ प्रणाली नाईक, प्रभाग सात संतोष जोईल, प्रभाग दहा श्याम वाडकर आदिनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. अर्ज दाखल करण्यापूर्वी काँग्रेसने येथील श्रीराम वाचन मंदिरात बैठक घेतली त्यानंतर अर्ज दाखल केले आहेत.