शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

Sindhudurg Crime: पशुखाद्याच्या ट्रकमधून दारू वाहतूक, साडे सतरा लाखांचा मुद्देमाल जप्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2023 17:56 IST

या प्रकरणी ट्रकचालकावर गुन्हा दाखल

वैभववाडी : पशुखाद्याच्या ट्रकमधून सातारा येथे विनापरवाना साडेपाच लाखांची दारू वाहतूक करणारा ट्रक वैभववाडी पोलिसांनी पकडला. ही कारवाई रविवारी रात्री ९.३० वाजण्याच्या सुमारास करुळ तपासणी नाक्यावर केली. ट्रकसह १७ लाख ३५ हजारांचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला.याप्रकरणी ट्रकचालक आबासो राजाराम बाबर (रा. दाधोली, ता. पाटण, जि. सातारा) यांच्याविरोधात  गुन्हा दाखल केला आहे.  रविवारी रात्री करूळ तपासणी नाक्यावर रात्री ये-जा करणाऱ्या वाहनांची पोलिस शिपाई हरिश्चंद्र जायभाय हे तपासणी करीत होते. या दरम्यान रात्री ९.३० वाजण्याच्या सुमारास वैभववाडीहून (के.ए.-२२  २६२४) कोल्हापुरच्या दिशेने जात असलेला ट्रक तपासणी नाक्यावर आला. त्याला तपासणीकरिता  जायभाय यांनी थांबवले. ट्रकचालक आबासो बाबर याच्याकडे तपासणीकरिता कागदपत्रांची मागणी केली.यावेळी ट्रक चालकाने उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यानंतर गाडीची तपासणी करताना ट्रकचा हौदा जाड ताडपत्री टाकून दोरीच्या साहाय्याने बांधून घेतला होता. जायभाय यांना याबाबतचा संशय आल्यामुळे त्यांनी पोलिस निरीक्षक अमित यादव यांना संबंधित घटनेची तत्काळ माहिती दिली.त्यानंतर वैभववाडी पोलिस स्थानकातून पोलिस उपनिरीक्षक अमोल पाटील व पोलिस कृष्णांत पडवळ यांना तपासणी नाक्यावर पाठविण्यात आले. तेथून ट्रक चालकासह वैभववाडी पोलिस स्थानकात आणण्यात आला. पंचाच्या समक्ष ट्रकचा हौदा उघडण्यात आला. हौद्यात मागच्या बाजूला पशुखाद्य भरलेले होते. पशुखाद्याची पोती बाजूला केली असता आतमध्ये दारूचे लेबल असलेले बॉक्स सापडले. एकूण ५ लाख ३४ हजार रुपयांची दारू ट्रकमध्ये होती.पोलिसांनी दारूसह १२ लाख रुपयांचा टाटा कंपनीचा ट्रक ताब्यात घेतला आहे. या प्रकरणी ट्रकचालक आबासो राजाराम बाबर याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास वैभववाडी पोलिस निरीक्षक अमित यादव करीत आहेत. 

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस