सिंधुदुर्ग: भिरवंडे बिवणेवाडीत भरवस्तीत बिबट्याचा वावर, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 23, 2022 13:32 IST2022-07-23T13:32:05+5:302022-07-23T13:32:31+5:30

कुत्रा जोरजोरात भुंकू लागल्याने घराच्या बाहेर आल्यावर डिसोझा यांना बिबट्या दिसला.

Leopards roam in the urban areas of Bhirwande Bivanewadi in Kankavali taluka | सिंधुदुर्ग: भिरवंडे बिवणेवाडीत भरवस्तीत बिबट्याचा वावर, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

सिंधुदुर्ग: भिरवंडे बिवणेवाडीत भरवस्तीत बिबट्याचा वावर, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

कणकवली : कणकवली तालुक्यातील भिरवंडे बिवणेवाडी बस्ताडकर टेंब येथे विल्सन डिसोझा व डेव्हिड डिसोझा यांच्या घरा समोरील अंगणात मध्यरात्री बिबट्याचे दर्शन झाले. कुत्र्याच्या शोधात आलेल्या या बिबट्याला पाळीव कुत्रा पिंजऱ्यात बंद असल्याने शिकार करता आली नाही. कुत्रा जोरजोरात भुंकू लागल्याने घराच्या बाहेर आल्यावर डिसोझा यांना बिबट्या दिसला.

यापूर्वीही भिरवंडे खलांतर येथील शेतकऱ्यावर भर दुपारी हल्ला करून बिबट्याने एकास जखमी केले होते. बिबट्या दिसल्यानंतर ग्रामस्थांनी वनविभागाशी संपर्क साधला. मानवी वस्तीत येणाऱ्या या बिबट्याचा वनविभागाने तत्काळ बंदोबस्त करावा अशी मागणी ग्रामस्थांनी केली. मात्र, मानवी वस्तीत बिबट्याच्या वावरामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

Web Title: Leopards roam in the urban areas of Bhirwande Bivanewadi in Kankavali taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.