शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

सिंधूदुर्गमधील तिलारी धरणाचा डावा कालवा फुटला, लोकांनी अनुभवली पुरसदृश्य स्थिती 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 26, 2021 11:50 IST

या कालव्यांकडे तिलारी विभागाचे होत असलेले दुर्लक्ष आणि ठेकेदाराचा मनमानी कारभार, हा या कालवा फुटीला जबाबदार असल्याचे येथील नागरिक बोलत आहेत. यापूर्वीही माध्यमांतून या धरणाला अनेक ठिकाणी भगदाड पडल्याचे वृत्त आले आहे.

दोडामार्ग : सिंधूदुर्ग जिल्ह्यातील तिराळी धरणाचा गोवा आणि महाराष्ट्राला पाणीपुरवठा करणारा कालवा खानयाळे येथे फुटला. यामुळे येळपई नदीत ऐन उन्हाळ्यात लोकांनी पुरसदृश्य स्थिती अनुभवली. परिणामी तिराळी-दोडामार्ग दोन तासांहूनही अधिक काळ बंद राहिला. तिराळी धरण हे सिंधूदुर्ग जिल्ह्यातील सर्वात मोठे मातीचे धरण आहे.

या कालव्यांकडे तिलारी विभागाचे होत असलेले दुर्लक्ष आणि ठेकेदाराचा मनमानी कारभार, हा या कालवा फुटीला जबाबदार असल्याचे येथील नागरिक बोलत आहेत. यापूर्वीही माध्यमांतून या धरणाला अनेक ठिकाणी भगदाड पडल्याचे वृत्त आले आहे. मात्र, तरीही निद्रिस्त असलेल्या तिलारी विभागाला जाग येत नव्हती. यामुळे अखेर खानयाळे येथे कालव्याला मोठे भगदाड पडून कालवा फुटला. परिणामी तेथील माती व पाणी लोकांच्या शेतात गेल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तर उन्हाळ्यात शेतीला पाणीपुरवठा करणारा हा कालवा बंद होत असल्यामुळे शेती करपण्याची भीतीही शेतकर्‍यांकडून व्यक्त करण्यात येत आहे. 

अधिकाऱ्यांच्या दूर्लक्षामुळे अशा घटना वारंवार घडत आहेत आण याचे परिणाम शेतकऱ्यांना भोगावे लागत आहेत. एढेच नाही, तर प्रशासनाबरोबरच येथील आमदार, पालकमंत्री यांचेही याकडे लक्ष नाही. यामुळे या कालव्यांची योग्य दुरुस्ती आणि देखभाल होत नाही. यासंदर्भात आता, जोवर कालव्याचे पूर्ण ऑडिट होऊन त्याची संपूर्ण दुरुस्त होत नाही, तोवर यातून पाणी सोडू देणार नसल्याचा इशारा सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र निंबाळकर यांनी दिला आहे. खासदार विनायक राऊत यांनी या घटनेची माहिती घेतली असून यासंदर्भात चौकशी होणार असल्याचे विभागप्रमुख संतोष मोर्ये यांनी म्हटले आहे. याशिवाय, तिराळी विभागाची कार्यालये तिराळीत आणावीत यासाठीही येथे उपोषण करण्यात येणार असल्याचे समजते. 

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गWaterपाणीfloodपूरDamधरण