शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदी आणि अमेरिकेचे उपाध्यक्ष जेडी वेन्स यांची भेट, 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर झाली चर्चा
2
"जो हाल तेरे बाप का हुआ, वही तेरा होगा...!"; झिशान सिद्दीकी यांना जिवे मारण्याची धमकी 
3
पंतप्रधान मोदींनी दिलं खास गिफ्ट, खुश झाली अमेरिकन उपाध्यक्षांची मुलं! बघा VIDEO
4
"राज ठाकरे यांना झुकवून युती होऊ शकते, असे मला वाटत नाही, कारण..."; उदय सामंत स्पष्टच बोलले 
5
सरपंच संतोष देशमुख यांचे नाव देऊन शाळेत पुतळाही उभारणार; शिक्षण संस्थेचा मोठा निर्णय
6
काँग्रेसविरोधात भाजयुमोचे आंदोलन, संवेदनशील भागात तणाव
7
'यंदा कर्तव्य आहे' वाटतं? टॉस वेळी शुबमन गिलला बाउन्सर; हँडसम क्रिकेटरनं असा दिला रिप्लाय (VIDEO)
8
"राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची युती झाल्यास हत्तीवरून पेढे वाटणार"; ठाकरे गटाच्या नेत्याचा निर्धार
9
GT चा 'ब्लॉकबस्टर शो' जारी; घरच्या मैदानावर खेळणाऱ्या गत चॅम्पियन KKR वर पडले भारी!
10
भाजपला कधी मिळणार नवीन अध्यक्ष? RSS आणि पक्षाच्या उच्च नेतृत्वात विचारमंथन सुरू...
11
40 वर्षांचे प्रेम अन् 80 व्या वर्षी बांधली लगीनगाठ; अनोख्या लग्नाची सर्वत्र चर्चा...
12
IPL 2025 KKR vs GT : रिंकूनं घेतला जबरदस्त कॅच! शुबमन गिलचं शतक हुकलं (VIDEO)
13
"यात मनी लाँडरिंगचा गुन्हा कुठे आहे?"; सोनिया- राहुल गांधींवरील कारवाईवरुन पी. चिदम्बरम यांचा सवाल
14
पत्नीने का उचलले टोकाचे पाऊल? पाहा माजी डीजीपींच्या हत्येची Inside Story...
15
लॉकडाऊन एक फालतू निर्णय होता; व्हाईट हाऊसने कोरोनाची वेबसाईट बदलली, ट्रम्प अन् लॅब लीक...
16
टॅरिफनंतर ट्रम्प यांचा नवा आदेश, ८ मुद्द्यांची 'नॉन-टॅरिफ फ्रॉड' यादी जाहीर
17
राजस्थानचं टेन्शन वाढलं, संजू सॅमसनला दुखापत, आरसीबीविरुद्ध खेळणार नाही!
18
खरी ठरली नॅस्ट्रोडॅमसची भविष्यवाणी? काही शतकांपूर्वी व्हॅटिकन सिटी अन् पोप संदर्भात केलं होतं असं भाकीत
19
'कामाचं बोला' म्हणणाऱ्या एकनाथ शिंदेंना राजू पाटलांनी डिवचलं; पाठवली रखडलेल्या कामांची यादी
20
कौतुकास्पद! रोज फक्त १२० रुपये खर्च करुन कोट्यवधींची बचत; एक, दोन नव्हे तर घेतली ३ घरं

Sindhudurg: करूळ घाटात दरड कोसळली, नवीन संरक्षक भिंतीला फटका

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 20, 2024 12:35 IST

१०० मीटरहून अधिक रस्ता व्यापला : मार्ग बंद असल्यामुळे परिणाम नाही

वैभववाडी : रुंदीकरण व काँक्रीटीकरणासाठी बंद असलेल्या करूळ घाटात गुरुवारी (दि. १८) सायंकाळी अक्षरशः डोंगरच रस्त्यावर आला आहे. त्यामुळे जवळपास १०० मीटरचा रस्ता व्यापला गेला असून, नव्याने बांधलेल्या संरक्षक भिंतीचा कठडाही तुटला आहे. यावरून हा घाट मार्ग आणखी काही महिने वाहतुकीसाठी बंद राहणार, हे स्पष्ट होऊ लागले आहे.तळेरे-कोल्हापूर महामार्गावरील करूळ घाट मार्ग रुंदीकरण व काँक्रीटीकरणाच्या कामासाठी २२ जानेवारीपासून वाहतुकीस बंद आहे. घाट मार्गाचे रुंदीकरण करताना डोंगराकडील बाजू काटकोनात तोडण्यात आली आहे. त्याचे परिणाम आता दिसायला सुरुवात झाली आहे. डोंगराचा बराचसा भाग तोडल्यामुळे संपूर्ण डोंगरच अस्थिर बनले आहेत. पाऊस सुरू झाल्यापासून या घाट रस्त्यात जागोजागी दरडी कोसळत आहेत.मात्र, या घाट रस्त्याची वाहतूक बंद असल्यामुळे त्यांचा परिणाम जाणवत नसला तरी भविष्यातील गंभीरता स्पष्ट दिसत आहे. त्यामुळे करुळ घाट मार्गाने सद्य:स्थितीत वाहतूक सुरू करणे किती जोखमीचे आहे हे यावरून स्पष्ट होत आहे.

गुरुवारी सायंकाळी तालुक्यात अति मुसळधार पाऊस सुरू होता. त्याच दरम्यान सात वाजण्याच्या सुमारास डोंगराचा निम्मा भाग रस्त्यावर कोसळला. मोठेमोठे दगड, झाडे आणि मातीच्या ढिगाऱ्याने जवळपास १०० मीटर रस्ता व्यापला आहे. मोठे दगड संरक्षक भिंतीला आदळल्यामुळे नव्याने बांधलेली काँक्रीटची भिंत तुटली आहे. ठेकेदार कंपनीकडून तो ढिगारा हटविण्याचे काम सुरू आहे. घाट रस्त्यात सतत दरडी कोसळत असल्यामुळे येणाऱ्या गणपती उत्सवापूर्वी या घाट मार्गाने वाहतूक सुरू करणे धोकादायक ठरणार आहे.

करूळ घाटात दरड कोसळली असून, आतापर्यंतची ही सर्वांत मोठी दरड आहे. या दरडीने १०० मीटरपर्यंतचा रस्ता व्यापला आहे. दरड हटविण्याचे काम सध्या युद्ध पातळीवर सुरू आहे. याबाबतची माहिती वरिष्ठ कार्यालयाला देण्यात आलेली आहे. -अतुल शिवनीवार, उपअभियंता, राष्ट्रीय महामार्ग प्रधिकरण

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गkolhapurकोल्हापूरRainपाऊसlandslidesभूस्खलनTrafficवाहतूक कोंडी