कोलगाव ग्रामपंचायत : भाजपकडून शक्तिप्रदर्शनाने उमेदवारी अर्ज दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2020 15:23 IST2020-12-29T15:22:27+5:302020-12-29T15:23:56+5:30

Grampanchyat Bjp Sindhudurg- कोलगाव ग्रामपंचायतीसाठी भाजप पुरस्कृत पॅनेलकडून सोमवारी शक्तिप्रदर्शन करीत भाजपचे जिल्हा चिटणीस महेश सारंग यांच्या नेतृत्वाखाली येथील तहसील कार्यालयामध्ये उमेदवारी अर्ज दाखल केले. यावेळी मोठ्या संख्येने कार्यकर्ते आणि पदाधिकारी उपस्थित होते.

Kolgaon Gram Panchayat: BJP filed nomination papers with a show of strength | कोलगाव ग्रामपंचायत : भाजपकडून शक्तिप्रदर्शनाने उमेदवारी अर्ज दाखल

कोलगाव ग्रामपंचायतीकरिता भाजप पुरस्कृत पॅनेलने शक्तिप्रदर्शन करीत उमेदवारी अर्ज दाखल केले. यावेळी महेश सारंग, संतोष राऊळ उपस्थित होते.

ठळक मुद्दे कोलगाव ग्रामपंचायत : भाजपकडून शक्तिप्रदर्शनाने उमेदवारी अर्ज दाखलजिल्ह्यातील महत्त्वाची लढत

सावंतवाडी : कोलगाव ग्रामपंचायतीसाठी भाजप पुरस्कृत पॅनेलकडून सोमवारी शक्तिप्रदर्शन करीत भाजपचे जिल्हा चिटणीस महेश सारंग यांच्या नेतृत्वाखाली येथील तहसील कार्यालयामध्ये उमेदवारी अर्ज दाखल केले. यावेळी मोठ्या संख्येने कार्यकर्ते आणि पदाधिकारी उपस्थित होते.

कोलगाव ग्रामपंचायत निवडणुकीकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून आहे. या ठिकाणी महेश सारंग विरुद्ध शिवसेनेचे जिल्हा परिषदेचे सदस्य मायकल डिसोजा यांच्यासह गाव विकास पॅनेलही रिंगणात उतरले आहे. त्यामुळे या ग्रामपंचायत निवडणुकीत मोठी चुरस पहायला मिळणार आहे.

भाजप पुरस्कृत पॅनेलकडून एकूण पाच प्रभागांकरिता १५ जणांचे उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले. महेश सारंग यांच्या नेतृत्वाखाली गावातील भाजपच्या प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत हे उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे.

यामध्ये प्रभाग क्र. १ मधून संतोष राऊळ, आशिका सावंत, समीक्षा बटवलकर, प्रभाग क्र. २ मधून प्रभाकर राऊळ, कस्तुरी नाईक, रोहित नाईक तर प्रभाग क्र. ३ मधून माजी सरपंच संदीप हळदणकर, रसिका करमळकर, प्रणाली तिळवे, प्रभाग ४ मधून दिनेश सारंग, आत्माराम चव्हाण, हेमांगी मेस्त्री, तर प्रभाग क्र. ५ मधून निनाद पटवर्धन, संदेशा वेंगुर्लेकर, संयोगिता उगवेकर यांनी आपले नामनिर्देशन सादर केले.

यावेळी सुरेश दळवी, राजन चेंदवणकर, संजय धुरी, संजय पाटणकर, माजी सरपंच राजन कुडतरकर, फ्रॅन्की डान्टस, गुरू जाधव, सुधाकर राणे, महादेव सावंत, अजय सावंत, संदेश राऊळ, दीपक डांबरेकर, राजन करमळकर, रामचंद्र करमळकर आदी भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

Web Title: Kolgaon Gram Panchayat: BJP filed nomination papers with a show of strength

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.