शहरं
Join us  
Trending Stories
1
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
2
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
3
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
4
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
5
“सांगलीत विशाल पाटलांवर अन्याय झाला, काँग्रेसच्या...”; विजय वडेट्टीवार स्पष्टच बोलले
6
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
7
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
8
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
9
अभिनेते क्षितीज झारापकर यांचे निधन, ५४व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
10
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
11
करिअरच्या उच्च शिखरावर असताना सोडलं बॉलिवूड; लारा दत्ता म्हणाली, 'वाढत्या वयासोबत...'
12
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
13
'तेजस्वी सूर्या गुंडगिरी करतात, मासे खातात'; काँग्रेसवर टीका करताना कंगनाने भाजप नेत्याला केलं लक्ष!
14
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
15
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
16
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
17
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
18
कोव्हिशिल्डमुळेच आलाय श्रेयस तळपदेला हार्ट अटॅक?, अभिनेता म्हणाला - "लस घेतल्यानंतरच..."
19
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
20
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा

केसरकर यांचा उदय नारायण राणे यांच्यामुळेच! राजन तेली यांची टीका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 02, 2019 3:42 PM

तुमचा उदय हा राणेंमुळे झाला आहे, अशी खोचक टीका माजी आमदार राजन तेली यांनी पालकमंत्री दीपक केसरकर यांच्यावर सावंतवाडीत केली.

ठळक मुद्देदीपक केसरकर यांचा उदय नारायण राणे यांच्यामुळेच! राजन तेली यांची टीकामी आहे साक्षीदार; आम्ही मिठाला जागणारी माणसे

सावंतवाडी : आम्ही मिठाला जागणारी माणसे असल्यानेच आमच्यावर विश्वास आहे. तुम्ही आतापर्यंत विश्वासघातच करत आला आहात. माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी तुम्हांला नगराध्यक्षपदी बसविण्यापासून केलेल्या मदतीचा मी साक्षीदार असून, मुळातच तुमचा उदय हा राणेंमुळे झाला आहे, अशी खोचक टीका माजी आमदार राजन तेली यांनी पालकमंत्री दीपक केसरकर यांच्यावर सावंतवाडीत केली. ते आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी तालुकाध्यक्ष महेश सारंग, मनोज नाईक, प्रथमेश तेली उपस्थित होते.तेली म्हणाले, नारायण राणे यांच्या भाजप प्रवेशाबाबतचा निर्णय वरिष्ठ नेत्यांचा आहे. वरिष्ठ नेते जो निर्णय घेतील तो आम्ही मान्य करणार असून, तसे काम करणार आहे. मात्र, मंत्री केसरकर यांना आम्हांला बोलण्याचा अधिकार नाही. त्यांना भाजपचे प्रवक्तेपद दिले गेले नाही. ते सेनेचे मंत्री आहेत. त्यांच्या मंत्रिपदाचा जिल्ह्याला कितपत फायदा झाला हे त्यांनी आजमावून घ्यावे. आजपर्यंत ते कोणाच्या मिठाला जागले नसून, नेहमी विश्वासघाताचे राजकारण करीत आले.

ते पुढे म्हणाले, गेल्यावर्षी चिपी विमानतळावर विमानातून गणपती उतरवून विमानतळाचे उद्घाटन केले हा प्रकार चुकीचा होता. आज त्या ठिकाणी विमान सेवा सुरू नाही, हे अपयश पालकमंत्र्यांचे आहे. त्यामुळे शासनाच्या उड्डाण योजनेअंतर्गत नजीकच्या कर्ली खाडीत जलवाहतुकीसाठी टर्मिनस केल्यास व गोव्यातील समुद्र किनारा याला सोडल्यास येणाऱ्या पर्यटकांच्या माध्यमातून चिपी विमानतळ चांगले चालू शकते.

यासाठी शासन स्तरावर प्रयत्न सुरू आहेत. शासनाने नव्याने प्रधानमंत्री किसान मानधन योजना सुरू केली असून योजनेच्या मिळणाऱ्या पैशातूनच जर शेतकऱ्याने हप्त्याचे पैसे त्या ठिकाणी भरल्यास वयाच्या ६० व्या वर्षापासून शेतकऱ्याला महिना तीन हजार रुपये पेन्शन आहे. या योजनेचा लाभ ४० वयोगटापर्यंत शेतकऱ्यांना घेता येणार असल्याचे सांगितले.शेतकऱ्यांना त्यांचा लाभ मिळवून देणारशेतकरी सन्मान योजनेअंतर्गत ज्या शेतकऱ्यांनी फॉर्मवर बँकेचा आयएफसी कोड व माहिती बरोबर न भरल्याने जवळपास जिल्ह्यातील ३० ते ४० टक्के लोकांना योजनेचा थेट फायदा झाला नाही. त्यामुळे ही माहिती योग्यरित्या भरून नजीकच्या तहसीलदार कार्यालयात किंवा भाजप कार्यालयात दिल्यास एकत्रित पुढे त्याचा पाठपुरावा करून शेतकऱ्यांना त्यांचा लाभ मिळवून देण्यात येईल. तसेच ज्यांनी या योजनेसाठी प्रयत्न केले नाहीत त्यांनी सुद्धा संबंधित फॉर्म भरल्यास त्यांना पैसे मिळवून देण्याची ग्वाही राजन तेली यांनी यावेळी दिली.

टॅग्स :Rajan Teliराजन तेली sindhudurgसिंधुदुर्गDeepak Kesarkarदीपक केसरकर