शहरं
Join us  
Trending Stories
1
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
2
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
3
'राणेंचा प्रचार करायला लागतोय यातच राज ठाकरेंचा विजय'; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका
4
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
5
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
6
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
7
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
8
“सांगलीत विशाल पाटलांवर अन्याय झाला, काँग्रेसच्या...”; विजय वडेट्टीवार स्पष्टच बोलले
9
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
10
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
11
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
12
अभिनेते क्षितीज झारापकर यांचे निधन, ५४व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
13
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
14
करिअरच्या उच्च शिखरावर असताना सोडलं बॉलिवूड; लारा दत्ता म्हणाली, 'वाढत्या वयासोबत...'
15
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
16
'तेजस्वी सूर्या गुंडगिरी करतात, मासे खातात'; काँग्रेसवर टीका करताना कंगनाने भाजप नेत्याला केलं लक्ष!
17
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
18
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
19
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
20
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत

बियाण्यांच्या संपत्तीतून सिंधुदुर्गला भरडधान्य उत्पादनात अग्रेसर ठेवा, पालकमंत्री रविंद्र चव्हाणांचे आवाहन 

By महेश विद्यानंद सरनाईक | Published: May 29, 2023 5:21 PM

पंतप्रधान नरेंद्र मोदींजीच्या नेतृत्वाखाली भारताने जगाला सुचविले आणि जगाने मान्य करुन २०२३ हे वर्ष आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष म्हणून साजरे केले जातेय

सिंधुदुर्ग : भरडधान्याची बियाणं ही खऱ्या अर्थाने संपत्ती आहे. ही संपत्ती शेतकऱ्यांना दिली जात आहे. या संपत्तीमधून मोठ्या प्रमाणात उत्पादन घेणारा जिल्हा म्हणून सिंधुदुर्गला अग्रेसर ठेवा, असे आवाहन पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांनी केले.महाराष्ट्र शासन कृषी विभाग, जिल्हा परिषद कृषी विभाग, सिंधु आत्मनिर्भर अभियान, सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आणि स्नेहसिंधु कृषी पदवीधर संघांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात सिंधुदुर्ग भरडधान्य अभियानांतर्गत प्रात्यक्षिक प्रक्षेत्र लागवड व मोफत बियाणे वाटपाचा शुभारंभ पालकमंत्री चव्हाण यांच्या हस्ते आज झाला. यावेळी पालकमंत्री चव्हाण आणि उपस्थितांच्या हस्ते अरुण कावले, शिवाजी रासम, दिप्ती सावंत, महेश संसारे, दयाळ अपराज, फटी गवस, सातु जाधव, महादेव सापळे, गोविंद केसरकर, प्रदीप सावंत, गितेश परब, देवकी कदम, नारायण गवस या शेतकऱ्यांना प्रतिनिधिक स्वरुपात सात प्रकारच्या भरड धान्यांच्या बियाण्यांची रवळी देण्यात आली. याप्रसंगी आमदार नितेश राणे, जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर, पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल, अपर जिल्हाधिकारी शंकर बर्गे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संजय कापडणीस, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विजयकुमार राऊत, सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सह. बँकेचे उपाध्यक्ष अतुल काळसेकर, माजी आमदार राजन तेली, प्रभाकर सावंत उपस्थित होते.पालकमंत्री चव्हाण म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदींजीच्या नेतृत्वाखाली भारताने जगाला सुचविले आणि जगाने मान्य करुन २०२३ हे वर्ष आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष म्हणून साजरे केले जातेय. ही पिके आपल्या पूर्वजांची ठेव आहे. तिला वृध्दींगत करण्याचे काम आपल्याला करावयाचे आहे.  लागवडीनंतर  पीक येईपर्यंत त्याची निगा कशी राखावयाची याचे मार्गदर्शन तज्ज्ञ मंडळी करणार आहेत. शिवाय अधिकचे ज्ञान देण्याचे कामही या अभियानातून होणार आहे. पूर्वजांची ही संपत्ती आपल्याकडे दिली जात आहे. त्यामध्ये अधिकाधिक क्षेत्र लागवडीखाली आणून भरड धान्याच्या उत्पादनात जिल्ह्याला अग्रेसर ठेवा, शेतकऱ्यांचे अधिकचे उत्पन्न मिळाले पाहीजे. त्यांचे जीवनमान उंचावले पाहिजे. यासाठी प्रधानमंत्री मोदीजी सातत्याने शेतकऱ्यांपर्यंत विषय मांडण्याचा प्रयत्न करत आहेत. शेतकरी स्वत:च्या पायावर उभा राहिला पाहीजे, यासाठी किसान सन्मान योजनेतून २-२ हजार असे ६ हजार रुपये देण्याचे काम केले आहे. त्याच धर्तीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील राज्य शासनानेही येणाऱ्या काळात ६ हजार रुपये देण्याचे काम सुरु केले आहे. शासनाच्या विविध योजनांचा शेतकरी लाभार्थी व्हायला सुरुवात झाली, तर त्याला चाकरमानी होण्याची गरज नाही. पुढच्या पिढीचे भविष्य उज्ज्वल करण्यासाठी सरकारच्या प्रत्येक योजनांचे भागीदार व्हा, असे आवाहनही पालकमंत्र्यांनी शेवटी केले.प्रस्ताविकात काळसेकर यांनी १० हजार शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवून १८७ प्रात्यक्षिक प्रक्षेत्र करण्यासाठी ५ टन बियाणे गोळा केल्याचे सांगून, जिल्ह्याची ओळख भरडधान्यांचा जिल्हा अशी होईल, असे ते म्हणाले. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राऊत यांनीही, बदलत्या जीवनशैलीबरोबरच आहारातही बदल झाला. भरड धान्यांच्या आहारातील महत्व आणि त्याची जनजागृती हाच उद्देश या अभियानाचा असल्याचे सांगितले. उल्लेखनीय काम करणाऱ्या कृषी सहायक रश्मी कुडाळकर, नाजुका पावडे, धंनजय कदम, चंद्रशेखर रेडकर, कृषी पर्यवेक्षक धनंजय गावडे, विस्तार अधिकारी (कृषी)  एकनाथ सावंत आणि रांगोळीकार संजय गोसावी यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या पहिल्या सत्रात फोंडा घाट येथील भात संशोधन केंद्राचे डॉ.विजयकुमार शेटये यांचे, भरड धान्य आहारातील महत्व, लागवड व प्रक्रीया तंत्रज्ञान विषयावर मार्गदर्शन झाले. डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने तयार कलेली भरड धान्याचे महत्व वरील चित्राफितही प्रदर्शित केली. स्नेहसिंधू कृषी पदवीधर संघाचे संदीप राणे यांनी सर्वांचे आभार मानले. सूत्रसंचालन निलेश जोशी यांनी केले. कार्यक्रमाला अधिकारी, कर्मचारी, महिला, शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गFarmerशेतकरी