शहरं
Join us  
Trending Stories
1
सत्ताधाऱ्यांकडून राज्यात २ हजार कोटींचे वाटप; आमदार रोहित पवारांचा गंभीर आरोप
2
Narendra Modi : "केरळने धडा शिकवला, उत्तर प्रदेशच्या जनतेनेही ओळखलंय"; मोदींचा राहुल गांधींना खोचक टोला
3
अमेठी, रायबरेलीत काँग्रेसच्या हाताला सपाच्या सायकलची साथ, अखिलेश यादव यांचे कार्यकर्त्यांना स्पष्ट आदेश 
4
Akhilesh Yadav : "भाजपाने Google वर 100 कोटींचा प्रचार करण्याचा रेकॉर्ड केला... हा जनतेचा पैसा"
5
Breaking: मोठी बातमी! शिक्षक, पदवीधर विधान परिषद निवडणूक पुढे ढकलली
6
कार्तिकी गायकवाडच्या घरी 'लिटील चॅम्प'चं आगमन; पोस्ट शेअर करत दिली गुडन्यूज
7
UPSC मध्ये घटस्फोटित कोट्यातून नोकरीसाठी पतीला सोडलं, पहिल्याच Marriage Anniversary ला केली विचित्र मागणी
8
तुम्ही काय दिवे लावले? हार्दिकवर टीका करणाऱ्या AB de Villiers वर गौतम गंभीर खवळला 
9
"बायको गेल्यानंतर स्वत:ला संपवायचं ठरवलं होतं", कठीण काळाबद्दल बोलताना भूषण कडू भावुक
10
Closing Bell: सेन्सेक्स-निफ्टी तेजीसह बंद; अदानी एन्टरप्राईजेसमध्ये तेजी, Cipla घसरला
11
जगातील सर्वात पॉवरफुल क्रॉसओवर बाईक BMW M 1000 XR लाँच,  जाणून घ्या किंमत...
12
मराठा आरक्षण आंदोलनाचा 'एल्गार', मनोज जरांगे पाटील ४ जूनपासून पुन्हा उपोषण करणार
13
RCB vs CSK सामन्यावर पावसाचं सावट! सामना रद्द झाल्यास प्ले ऑफमध्ये कोण जाणार?
14
घाटकोपरसारखीच चूक २१ वेळा; होर्डिंग दुर्घटनेला जबाबदार असलेला भावेश भिंडे कोण आहे?
15
Weather Alert: मुंबईत आजही पाऊस लावणार हजेरी; राज्यातील ९ जिल्ह्यांना 'यलो अलर्ट'; असा आहे हवामान अंदाज!
16
शुभकार्यासाठी निघाले होते, पण...; बस-कारच्या धडकेत कुटुंबातील तिघांचा मृत्यू, चिमुकला बचावला
17
Women World Cup 2024: भारत वर्ल्ड कपची सेमीफायनल खेळणारच; हरमनने सांगितले तगडे आव्हान
18
मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात वाद? हार्दिक सरावाला येताच रोहितसह तिघांनी मैदान सोडले
19
'गलिच्छ! साडी नेसून लोकांच्या मांडीवर बसतो', कपिल शर्मा शोवर भडकला सुनील पाल
20
Video: बापरे..! चिखलात लपलेल्या मगरीने अचानक उघडला जबडा अन् पुढे जे घडलं...

कणकवली नगरपंचायतच्या कंत्राटी सफाई कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन सुरू

By सुधीर राणे | Published: March 27, 2024 1:04 PM

कणकवली : कणकवली नगरपंचायतच्या ५२ कंत्राटी सफाई कर्मचाऱ्यांना अद्याप फेब्रुवारी महिन्याचा पगार मिळालेला नाही. त्यामुळे त्यांच्यासह कुटुंबीयांचे हाल होत ...

कणकवली : कणकवली नगरपंचायतच्या ५२ कंत्राटी सफाई कर्मचाऱ्यांना अद्याप फेब्रुवारी महिन्याचा पगार मिळालेला नाही. त्यामुळे त्यांच्यासह कुटुंबीयांचे हाल होत आहेत. या अन्याया विरोधात नगरपंचायतचे सर्व कंत्राटी कर्मचारी एकवटले असून त्यांनी बुधवारी सकाळपासून काम बंद आंदोलन सुरू केले आहे.कणकवली नगरपंचायतमध्ये ५२ कंत्राटी सफाई कर्मचारी आहेत. त्यामध्ये कणकवली शहरात सफाई करणारे कामगार आणि ट्रॅक्टर व अन्य वाहनांवरील चालकांचा समावेश आहे. नगरपंचायतच्यावतीने ठेकेदाराकडून या कंत्राटी कर्मचाऱ्यांना दरमहा पगार दिला जातो. मात्र, फेब्रुवारी महिन्याचा पगार आता मार्च महिना संपत आला तरीसुद्धा देण्यात आलेला नाही. वारंवार मागणी करूनही ठेकेदाराने कर्मचाऱ्यांचे वेतन देण्याच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष केला आहे. तसेच कर्मचाऱ्यांच्या पगारातून दरमहा भविष्य निर्वाह निधी(पीएफ)चे पैसे वजा करून घेतले जातात. तसेच ठेकेदारानेसुद्धा कर्मचाऱ्यांच्या भविष्य निर्वाह निधी खात्यामध्ये आपला वाटा जमा करणे बंधनकारक आहे. मात्र, ठेकेदार आपल्याकडील रक्कम जमा करत नाही. या विरोधात सुद्धा हे काम बंद आंदोलन करण्यात येत आहे. जोपर्यंत आपला फेब्रुवारी महिन्याचा पगार मिळत नाही आणि  ठेकेदार आपल्याकडील भविष्य निर्वाह निधीची रक्कम कर्मचाऱ्यांच्या खात्यात जमा करत नाही तोपर्यंत काम बंद आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार या कर्मचाऱ्यांनी केला आहे. सर्व कर्मचारी नगरपंचायत कार्यालयासमोर जमा झाले होते.त्यांनी जोरदार घोषणाबाजीही यावेळी केली.दरम्यान, नगरपंचायतचे मुख्याधिकारी विशाल खत्री यांनी कर्मचारी प्रतिनिधी तसेच ठेकेदार यांना चर्चेसाठी बोलाविले आहे.या चर्चेदरम्यान योग्य निर्णय न झाल्यास आंदोलन सुरूच ठेवणार असल्याचा इशारा कर्मचाऱ्यांनी दिला आहे.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गKankavliकणकवली