शहरं
Join us  
Trending Stories
1
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
2
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
3
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
4
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
5
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
6
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
7
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
8
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
9
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
10
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
11
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
12
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
13
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
14
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
15
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
16
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
17
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
18
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
19
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
20
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका

'कणकवली पर्यटन महोत्सव' २ जानेवारी पासून , ५ जानेवारी रोजी समारोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 06, 2019 3:45 PM

कणकवली येथील नगरपंचायतीच्यावतीने २ ते ५ जानेवारी या कालावधीत ' कणकवली पर्यटन महोत्सव २०२० ' आयोजित करण्यात आला आहे. आमदार नितेश राणे यांच्या संकल्पनेतून होणाऱ्या या पर्यटन महोत्सवाअंतर्गत फूड फेस्टिव्हल, चित्ररथ तसेच विविध स्पर्धा असे विविधांगी कार्यक्रम होणार असून हिंदी-मराठी चित्रपट सृष्टीतील कलावंत आणि नामवंत गायक-गायिकांची मांदियाळीच यानिमित्ताने कणकवलीत दाखल होणार आहे. अशी माहिती नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी दिली.

ठळक मुद्दे'कणकवली पर्यटन महोत्सव' २ जानेवारी पासून , ५ जानेवारी रोजी समारोपसमीर नलावडे यांची माहिती; विविध सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल

कणकवली : येथील नगरपंचायतीच्यावतीने २ ते ५ जानेवारी या कालावधीत ' कणकवली पर्यटन महोत्सव २०२० ' आयोजित करण्यात आला आहे. आमदार नितेश राणे यांच्या संकल्पनेतून होणाऱ्या या पर्यटन महोत्सवाअंतर्गत फूड फेस्टिव्हल, चित्ररथ तसेच विविध स्पर्धा असे विविधांगी कार्यक्रम होणार असून हिंदी-मराठी चित्रपट सृष्टीतील कलावंत आणि नामवंत गायक-गायिकांची मांदियाळीच यानिमित्ताने कणकवलीत दाखल होणार आहे. अशी माहिती नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी दिली.कणकवली नगरपंचायतच्या नगराध्यक्ष दालनात शुक्रवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी उपनगराध्यक्ष रवींद्र गायकवाड , गटनेते संजय कामतेकर, माजी नगरसेवक किशोर राणे , संदीप नलावडे, चारुदत्त साटम, पंकज पेडणेकर ,राजा पाटकर ,बाळा सावंत आदी उपस्थित होते.समीर नलावडे म्हणाले , या कणकवली पर्यटन महोत्सवाच्या निमित्ताने २ जानेवारी रोजी सायंकाळी ५ वाजता विविध चित्ररथांचा समावेश असलेली भव्य शोभायात्रा कणकवली शहरातून काढण्यात येईल. या शोभायात्रेला पटकीदेवी मंदिराकडून प्रारंभ होणार असून बाजारपेठ मार्गे मुंबई - गोवा महामार्गावरून नरडवे नाका येथील पर्यटन महोत्सव स्थळापर्यंत जाऊन तिचा समारोप होईल.

शहरातील प्रत्येक प्रभागातून चित्ररथ तयार करण्यात येणार आहेत. चित्ररथाना प्रत्येकी रोख रूपये ५००० देण्यात येणार आहेत. तर चित्ररथ स्पर्धेत प्रथम क्रमांक १०, ००० रूपये, द्वितीय ५,००० रूपये तर तृतीय क्रमांकासाठी ३,००० रूपये अशी पारितोषिके प्रमाणपत्रासह दिली जातील. त्यानंतर फ़ूड फेस्टिव्हलचे उदघाट्न सायंकाळी ६.३० वाजता होईल. तर सायंकाळी ७ वाजता पर्यटन महोत्सवाचे रीतसर उदघाट्न माजी मुख्यमंत्री तथा खासदार नारायण राणे, आमदार नीतेश राणे तसेच भाजप पदाधिकारी व अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत होईल .रात्री ८ वाजता ' चला हवा येऊ द्या' फेम सिनेनट भाऊ कदम, कुशल बद्रिके व अन्य नामवंत कलाकारांचा तीन तासांचा ' धमाल कॉमेडी शो ' होईल. ३ जानेवारीला सायंकाळी ७ वाजता नाट्यकर्मी सुहास वरूणकर व प्रा. हरिभाऊ भिसे यांच्या संकल्पनेतून कणकवली तसेच जिल्ह्यातील १५० नामवंत कलाकारांचा समावेश असलेला विशेष सांस्कृतिक कार्यक्रम होईल. या कार्यक्रमाच्या नियोजनासाठी ८ डिसेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता नगरवाचनालयाच्या सभागृहात बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.४ जानेवारी रोजी सायंकाळी ७ वाजता राज्य तसेच देशातील नामवंत कलाकार, गायक यांचा समावेश असलेला आगळावेगळा कार्यक्रम होईल. या दिवशी इतरही कार्यक्रम होणार असून त्याचे नियोजन सुरू आहे. ५ जानेवारी रोजी सायंकाळी ७ वाजता महोत्सवाचा समारोप होईल. यावेळी माजी मुख्यमंत्री खासदार नारायण राणे , नीलमताई राणे, माजी खासदार निलेश राणे, आमदार नीतेश राणे , माजी मंत्री रवींद्र चव्हाण, भाजप जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार तसेच भाजपचे अन्य नेते व मान्यवर उपस्थित रहातील. रात्री ८ वाजता हिंदी-मराठी चित्रपटसृष्टीतील नामवंत कलावंताच्या उपस्थितीत ऑकेस्ट्रा व इतर कार्यक्रम होणार आहेत. याखेरीज विविध स्पर्धा व इतर कार्यक्रमही होणार आहेत. त्याची प्रसिध्दि वेळोवेळी केली जाईल असे सांगतानाच कणकवली वासियानी आपल्या हक्काच्या या पर्यटन महोत्सवात बहुसंखेने सामिल होऊन आनंद द्विगुणित करावा. असे आवाहन समीर नलावडे यांनी यावेळी केले.नगरपंचायत फंडातून पैसे वापरणार नाही !या महोत्सवासाठी शहरातील कुणाकडूनही कसल्याच प्रकारची वर्गणी घेतली जाणार नाही. तसेच नगरपंचायतीच्या फंडातूनही एक रुपया वापरला जाणार नाही. आम्ही स्वखर्चाने तसेच आमदार नीतेश राणे यांच्या माध्यमातून हा महोत्सव घेणार आहोत. शहरातील कोणाजवळ कोणीही महोत्सवासाठी वर्गणी अथवा पैसे मागत असेल तर थेट संबधितानी आपल्याशी संपर्क साधावा असे आवाहनही समीर नलावडे यांनी यावेळी केले.फूड फेस्टिव्हल मध्ये ९० स्टॉल्स !पर्यटन महोत्सवाच्या ठिकाणी फूड फेस्टिव्हल होणार असून विविध खाद्यपदार्थ तसेच इतर वस्तूंचे ९० स्टॉल्स लावले जाणार आहेत. एकप्रकारे तिथे खाद्यजत्राच भरणार असून त्याठिकाणी स्टॉल्स लावू इच्छिणाऱ्यानी नगरसेवक संजय कामतेकर यांच्याशी संपर्क साधून आपली नाव नोंदणी करावी . असेही समीर नलावडे यांनी यावेळी सांगितले. 

टॅग्स :Kankavliकणकवलीsindhudurgसिंधुदुर्ग