प्रो कबड्डी स्पर्धेत कणकवलीच्या प्रणय राणेची 'यु मुंबा' संघात निवड
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2022 12:14 IST2022-07-30T12:14:13+5:302022-07-30T12:14:45+5:30
कणकवली : प्रो कबड्डीचे ९ वे पर्व पुढील महिन्यात सुरू होत आहे. या नव्या पर्वासाठी यु मुंबा संघात एन. वाय. ...

प्रो कबड्डी स्पर्धेत कणकवलीच्या प्रणय राणेची 'यु मुंबा' संघात निवड
कणकवली : प्रो कबड्डीचे ९ वे पर्व पुढील महिन्यात सुरू होत आहे. या नव्या पर्वासाठी यु मुंबा संघात एन. वाय. पी. कॅटेगरी मधून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवलीचा सुपुत्र प्रणय विनय राणे याची निवड झाली आहे. ८.७८ लाख किमतीला यु मुंबा संघाने प्रणय राणे याची संघात निवड केली आहे.
प्रणयची ही निवड कणकवली तालुक्याच्या तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवणारी आहे. प्रणय हा कणकवलीच्या यंगस्टार संघाचा खेळाडू असून एसटीचे वाहतूक नियंत्रक विनय राणे यांचा मुलगा आहे. प्रणय याच्या या निवडीबद्दल त्याचे जिल्ह्यात सर्व स्तरातून कौतुक होत आहे.