शहरं
Join us  
Trending Stories
1
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
2
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
3
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
4
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
5
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
6
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
7
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
8
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
9
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
10
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
11
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
12
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
13
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
14
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
15
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
16
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
17
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
18
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
19
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
20
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?

कणकवलीतील गुन्हा मालवण पोलिसांकडे वर्ग का?, कन्हैया पारकर यांचा सवाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2020 14:55 IST

कर्तव्यावर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याला धक्काबुक्की, शिवीगाळ करीत कर्तव्य बजावण्यात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी कणकवली पोलिसांत दाखल असलेल्या गुन्ह्याचा पुढील तपास मालवण पोलिसांकडे का वर्ग करण्यात आला आहे? या प्रकरणातील कलमे शिथिल करण्याचा तर हा प्रकार नाही ना? असे सवाल उपस्थित करीत जिल्हा पोलिसांनी आपल्या वरिष्ठांना वस्तुस्थिती समजावून सांगत दाखल झालेल्या तक्रारीप्रमाणे तपास करून आपली विश्वासार्हता टिकवावी, असे आवाहन कणकवलीचे माजी उपनगराध्यक्ष कन्हैया पारकर यांनी केले आहे. ​

ठळक मुद्देकणकवलीतील गुन्हा मालवण पोलिसांकडे वर्ग का?, कन्हैया पारकर यांचा सवालपोलीस योद्ध्यावर हल्ला प्रकरण, कर्तव्यदक्ष पोलिसांचे मनोधैर्य खच्ची होण्याची भीती

कणकवली : कर्तव्यावर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याला धक्काबुक्की, शिवीगाळ करीत कर्तव्य बजावण्यात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी कणकवली पोलिसांत दाखल असलेल्या गुन्ह्याचा पुढील तपास मालवण पोलिसांकडे का वर्ग करण्यात आला आहे? या प्रकरणातील कलमे शिथिल करण्याचा तर हा प्रकार नाही ना? असे सवाल उपस्थित करीत जिल्हा पोलिसांनी आपल्या वरिष्ठांना वस्तुस्थिती समजावून सांगत दाखल झालेल्या तक्रारीप्रमाणे तपास करून आपली विश्वासार्हता टिकवावी, असे आवाहन कणकवलीचे माजी उपनगराध्यक्ष कन्हैया पारकर यांनी केले आहे.याबाबत त्यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, कणकवली पोलीस ठाण्यात १७ एप्रिल २०२० रोजी पोलीस कर्मचारी आशिष जामदार यांनी दिलेल्या तक्रारीनुसार संशयित जावेद शेखसह कणकवलीचे नगराध्यक्ष समीर नलावडे, नगरसेवक अबिद नाईक व संदीप नलावडे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर २७ एप्रिल रोजी जावेद शेख याला अटक झाली होती. आता या प्रकरणाचा पुढील तपास हा मालवण पोलिसांकडे वर्ग करण्यात आल्याचे समजते.कोरोनाच्या संकटकाळात कर्तव्यावर असलेल्या पोलीस योद्ध्यावर हा हल्ला झाला होता. त्यातील संशयित हे राजकीय व्यक्ती आहेत. हा गुन्हा कणकवली पोलीस ठाण्यात दाखल झाला होता. संशयित सापडत नसल्याने कणकवली नगराध्यक्षांचे वाहन पोलिसांनी जप्त केले होते. मात्र, गेल्या महिनाभरापासून पोलिसांना संशयित सापडलेले नाहीत. याप्रकरणाची ही पार्श्वभूमी पाहता, अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत.मुळात कणकवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालेला असताना तो मालवण पोलिसांकडे का वर्ग करण्यात आला? अशी कोणती अपवादात्मक परिस्थिती निर्माण झाली? ३५३ सारखा गुन्हा दाखल झालेला असताना आरोपी सापडत नाहीत, आरोपींची वाहने जप्त होतात, मात्र, ४१ ची नोटीस बजावताच आरोपी हजर कसे होतात? असे अनेक सवाल उपस्थित होत आहेत.पोलीस कर्मचारी कर्तव्यावर असताना हल्ला झाल्याने गुन्ह्याचे गांभीर्य अधिक आहे. या प्रकरणाला कोणतीही राजकीय बाजू नाही. कायद्याची जाण असलेल्या पोलिसानेच तक्रार दाखल केली आहे. त्यामुळे एखादे कलम वगळायचे असेल तर तक्रारदार पोलिसाला आपली तक्रार मागे घ्यावी लागणार आहे. तसे झाले तर पोलीस खोट्या तक्रारी करतात, असा संदेश सामान्य जनतेत जाण्याची शक्यता आहे. तसेच तक्रारदार पोलिसाला न्याय मिळाला नाही, तर पोलीस आपल्याच कर्मचाऱ्याला न्याय देऊ शकले नाहीत, तर इतरांचे काय? अशी भावना सामान्य माणसांत निर्माण होणार आहे.याविषयी कोणतीही राजकीय भूमिका नाही : पारकरकोरोनाच्या काळात संपूर्ण राज्यात पोलिसांवर हल्ल्याच्या २५० घटना घडल्या. मात्र, सिंधुदुर्गात ही एकमेव घटना असून तीही कणकवलीतील आणि त्यात नगराध्यक्षांचा सहभाग आहे. त्यामुळे याप्रकरणी पोलीस दलाविषयीच्या विश्वासार्हतेचा आणि प्रतिमेचा प्रश्न आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या प्रकरणात ढिलाई दाखविल्यास कर्तव्यदक्ष पोलिसांचे मनोधैर्य खच्ची होण्याची भीती आहे. याविषयी माझी कोणतीही राजकीय भूमिका नसून जिल्ह्यात गेल्या काही दिवसांत सुरू असलेल्या चर्चांचा कानोसा घेता ही प्रतिक्रिया देत आहे, असेही कन्हैया पारकर यांनी म्हटले आहे.

टॅग्स :Policeपोलिसsindhudurgसिंधुदुर्ग