शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
2
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
3
केरळमध्ये 'लाल' किल्ला ढासळणार? एक्झिट पोलमध्ये काँग्रेसप्रणित UDF ची मोठी मुसंडी; विजयन यांची 'हॅट्ट्रिक' हुकणार!
4
रोहितसह दुखापतीमुळे शतकवीरही OUT! MI कडून ओपनिंगचा नवा प्रयोग, मोठ्या बदलांसह मैदानात उतरला संघ
5
पश्चिम बंगाल निवडणुकीत मोठा राडा, ईव्हीएमवरील भाजपच्या बटणावर 'टेप'! मतदान थांबलं, आयोगाकडून फेरमतदानाचे संकेत
6
भोंदू अशोक खरातला सातव्या गुन्ह्यात न्यायालयीन कोठडी; आठव्या गुन्ह्यात SIT ने घेतला ताबा
7
विधानपरिषदेसाठी काँग्रेसही उमेदवार देणार? उद्धव ठाकरेंऐवजी अंबादास दानवेंच्या उमेदवारीमुळे चर्चांना उधाण
8
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
9
महाराष्ट्र माझा, मराठी माझी बोली भाषा! अमराठी चालकांसाठी परिवहन विभागाचा पुढाकार, पुस्तिकेचे प्रकाशन
10
Top Marathi News LIVE Updates: नांदेडमध्ये तापमान ४४ अंशांवर; उष्णतेची तीव्र लाट
11
कितीही वाढूद्या, आम्ही खरेदी करणार...! १,५०,००० पार असूनही भारतात सोन्याची मागणी १० टक्क्यांनी वाढली
12
लग्नाला नकार दिल्याच्या रागातून प्रेयसीसह तिच्या आईची हत्या; दुहेरी हत्याकांडाने विरार हादरले
13
सिगरेट शौकिनांना धक्का... गुंतवणूकदारांची चांदी...! १ मे पासून किमतीत १७ टक्क्यांपर्यंत वाढ; कंपन्यांचे शेअर्स मात्र सुसाट
14
आरपीएफ जवानाच्या सतर्कतेमुळे आईसह बाळाला जीवनदान; कल्याण रेल्वे स्थानकावरील घटना
15
IPL मधील 'कमबॅक किंग' आहे Mumbai Indians! पाचवेळचा चॅम्पियन संघ Playoffs साठी किती वेळा ठरलाय पात्र?
16
१ महिन्यात २ अंगारक योग: संकष्ट-विनायक चतुर्थी ठरेल खास, गणपती बाप्पा शुभच करेल; काय करावे?
17
महाराष्ट्राचे AI धोरण जाहीर, हरित आयोग स्थापन, लंडन येथे अध्यासन केंद्र; मंत्रिमंडळाचे ७ मोठे निर्णय
18
महाराष्ट्राचे कृत्रिम बुद्धिमत्ता धोरण नेमके आहे तरी काय? AI मुळे किती नोकऱ्या मिळणार? वाचा
19
मोठी बातमी! उद्धव ठाकरे विधानपरिषदेवर जाणार नाहीत, अंबादास दानवे यांना उमेदवारी; आदित्य ठाकरेंची घोषणा
20
लग्नासाठी तयार व्हायला नवरी ब्युटी पार्लरमध्ये गेली अन् घडलं आक्रित; वराती ऐवजी निघाली अंत्ययात्रा
Daily Top 2Weekly Top 5

कुडाळात होणार चौरंगी लढत

By admin | Updated: September 28, 2014 00:16 IST

काँग्रेसतर्फे नारायण राणे, राष्ट्रवादीकडून पुष्पसेन सावंत यांचा अर्ज

कुडाळ : कुडाळ विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार नारायण राणे, राष्ट्रवादी काँगे्रसतर्फे पुष्पसेन सावंत, तर भाजपच्यावतीने विष्णू मोंडकर यांनी अर्ज दाखल केला आहे. सेनेतर्फे वैभव नाईक यांनी शुक्रवारीच अर्ज दाखल केला असल्याने या मतदारसंघात चौरंगी निवडणूक रंगणार असल्याचे चित्र दिसून येत आहे.विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस असल्यानेही कुडाळ मतदारसंघातून उमेदवारी भरणाऱ्या संभाव्य सर्व उमेदवारांनी शनिवारी गर्दी केली होती. कुडाळ शहरातील नक्षत्र टॉवर येथील काँग्रेसच्या प्रचार कार्यालयाच्या ठिकाणी शनिवारी सकाळपासूनच काँग्रेसचे कार्यकर्ते, पदाधिकारी जमू लागले. दुपारी १ वाजण्याच्या सुमारास शहरातून भव्य अशी रॅली काढत नारायण राणेंनी उमेदवारी अर्ज निवडणूक कार्यालयात भरला. राष्ट्रवादीचे उमेदवार पुष्पसेन सावंत यांच्या पाठीशी या मतदारसंघातील राष्ट्रवादीचे कार्यकर्ते ठामपणे उभे आहेत, हे दाखविण्यासाठी राष्ट्रवादीच्या सर्व कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी गर्दी केली होती. पुष्पसेन सावंत यांनी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास अर्ज भरला. भाजपाकडून सरचिटणीस राजू राऊळ, रविकिरण तोरसकर व विष्णू मोंडकर यांची नावे चर्चेत असताना यापैकी कोण उमेदवारी अर्ज भरेल, हे निश्चित होत नव्हते. तरीही अर्ज भरण्याची मुदत संपण्याआधी मालवण येथील विष्णू मोंडकर यांनी भाजपामधून अर्ज भरला. या मतदार संघातून अपक्ष म्हणून किशोर शिरोडकर (कुडाळ), स्रेहा केरकर (तारकर्ली), लवू वारंग (नानेली) यांनी, तर बसपामधून रवींद्र कसालकर यांनी शुक्रवारी अर्ज भरलेला आहे. या मतदारसंघात एकूण ९ उमेदवार असणार आहेत. (प्रतिनिधी)