Kadabuki kicks off Rajan Redkar | राजन रेडकर यांना केली धक्काबुक्की
राजन रेडकर यांना केली धक्काबुक्की

ठळक मुद्देराजन रेडकर यांना केली धक्काबुक्कीवेंगुर्ला पोलीस ठाण्यात तक्रार

वेंगुर्ला : रेडी येथून वेंगुर्ला येथे कामानिमित्त जात असलेले भारतीय भ्रष्टाचार निवारण संस्थेचे कोकण विभागीय सीईओ राजन रेडकर यांना अज्ञात दुचाकीस्वारांनी धक्काबुक्की केली व मायनिंगबाबत तक्रारी करण्याचे थांबव, नाहीतर तुला सोडणार नाही, अशी धमकी दिल्याची घटना शुक्रवारी रात्री घडली. याबाबतची तक्रार रेडकर यांनी वेंगुर्ला पोलीस ठाण्यात दिली.

रेडकर यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, शनिवारी सायंकाळी रेडी येथून दुचाकीने मी सागरेश्वर-वेंगुर्ला येथे जात होतो. माझ्यासोबत असलेले सौरभ नागोळकर गाडी चालवित होते. आमच्यामागोमाग रेडी ते वेंगुर्ला जाणाऱ्या रस्त्याने दोन दुचाकीस्वार आम्हांला ओव्हरटेक करून मोचेमाड घाटी येथे पुढे आले. त्या दुचाकीवर पाठीमागे बसलेल्या व्यक्तीने माझ्या नावाने हाक दिली. म्हणून मी सौरभ याला गाडी थांबविण्यास सांगितले.

त्याचवेळी दुचाकीवर मागे बसलेली व्यक्ती माझ्याकडे चालत आली. मायनिंगच्या संदर्भात तक्रार करतो ते थांबव. नाहीतर तुला सोडणार नाही, अशी धमकी देऊन त्याने झटापट केली. यात माझा शर्ट फाटून नुकसान झाले. मी त्याला पकडणार एवढ्यात ते दोघे आपल्या काळ््या रंगाच्या दुचाकीवरून पळून गेले, असे म्हटले आहे.

Web Title: Kadabuki kicks off Rajan Redkar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.