शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Mumbai Kalyan Lok Sabha Election 2024 Live Updates: मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी बजावला मतदानाचा हक्क
2
"त्यांना पराभवाची चाहूल लागलीय"; बोगस मतदानाचा आरोप करणाऱ्या विचारेंवर मुख्यमंत्र्यांचा पलटवार
3
गुजरातच्या GST अधिकाऱ्याने साताऱ्यात विकत घेतले संपूर्ण गाव; एकाही अधिकाऱ्याने केला नाही तपास
4
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live ठाण्यात बोगस मतदानासाठी दीड हजार लोक आणून ठेवलेत; राजन विचारेंचा गंभीर आरोप
5
आजचे राशीभविष्य: धनलाभ, मान-सन्मान लाभतील; व्यापार वृद्धी, यशकीर्तीचा आनंदी दिवस
6
Credit Cardच्या १६ अंकांमध्ये लपलीयेत 'ही' ४ रहस्यं; काहीच लोकांना माहितीये याचा अर्थ, पाहा
7
मेले ते गेले... तुमचे नातेवाईक नव्हतेच ते!
8
राज्यातील अखेरचा टप्पा; वाढवा मतदानाचा टक्का; महाराष्ट्रातील १३ जागांसह देशातील ४९ मतदारसंघांत आज मतदान
9
Lok sabha election 2024: अक्षयकुमार ते जान्हवी कपूर! कलाकारांनी बजावला मतदानाचा हक्क
10
सहा ठिकाणी शिंदेसेना VS उद्धवसेना; लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात राज्यातील १३ मतदारसंघांमध्ये आज मतदान
11
EPFO नं क्लेम सेटलमेंट नियमांत केला बदल, Aadhaar डिटेल्स शिवायही होणार 'हे' काम
12
नृसिंह जयंती: ७ राशींना सौभाग्याचा काळ, संचित धनवृद्धी; यश-प्रगती संधी, महादेवही शुभ करतील!
13
खूशखबर! मान्सून आला रे... अंदमान-निकोबारमध्ये धडक, ३१ मेपर्यंत केरळमध्ये, या तारखेला पोहोचणार महाराष्ट्रात
14
राहुल, अखिलेश यांच्या प्रचारसभेत गोंधळ; नेत्यांना भेटण्यासाठी उत्साहाच्या भरात लोक बॅरिकेड्स तोडून मंचावर  
15
चप्पल व्यापाऱ्याकडे छापा; नोटा पाहून अधिकारी थक्क, ४० कोटींची रोकड जप्त! 
16
सेक्स स्कॅण्डल : प्रज्वलविरोधात अटक वॉरंट
17
चॉकलेटच्या वडीचा आकार आता लहान होणार, कारण...
18
‘MPSC’ची ढकलगाडी; ...तर एमपीएससीच्या सक्षमीकरणाशिवाय पर्याय नाही
19
‘आप’ला चिरडण्याचे कारस्थान; भाजपने सुरू केले ‘ऑपरेशन ब्रूम’; केजरीवाल यांचा आरोप
20
जलदगतीने वजन कमी करणे आरोग्यासाठी ठरू शकते धोकादायक, औषधांचा वापर टाळण्याचे आयसीएमआरचे आवाहन

जालन्यातील लाठी हल्ल्याचा निषेध: कणकवलीत शेकडो मराठा समाज बांधव उतरले रस्त्यावर, जोरदार घोषणाबाजी

By सुधीर राणे | Published: September 04, 2023 12:35 PM

कणकवली : मराठा समाजावर झालेल्या जालना येथील लाठी हल्ल्याच्या निषेधार्थ आज, सोमवारी कणकवलीत मराठा समाज बांधवांकडून छत्रपती शिवाजी महाराज ...

कणकवली: मराठा समाजावर झालेल्या जालना येथील लाठी हल्ल्याच्या निषेधार्थ आज, सोमवारी कणकवलीत मराठा समाज बांधवांकडून छत्रपती शिवाजी महाराज चौक येथून निषेध मोर्चा काढण्यात आला. मोर्चाच्या प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराज चौक ते कणकवली पटवर्धन चौक मार्गे मोर्चा प्रांताधिकारी कार्यालयपर्यंत काढण्यात येणार आहे. या मोर्चात आमदार वैभव नाईक यांच्यासह जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष सतीश सावंत, शिवसेना ठाकरे गट जिल्हाप्रमुख संजय पडते, ठाकरे गटातील शिवसेनेचे नेते संदेश पारकर, यांच्यासह शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले होते. यावेळी उपविभागीय पोलिस अधिकारी संध्या गावडे यांच्यासह कणकवली पोलीस निरीक्षक अमित यादव यांच्या मार्गदर्शनाखाली कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात होता.  मोर्चामध्ये भगव्या टोप्या व 'एक मराठा लाख मराठा' च्या टोप्या परिधान केलेले मराठा समाज बांधव सहभागी झाले होते. मोर्चेकऱ्यांनी 'या लाठी सरकारचे करायचं काय?, खाली डोकं वर पाय', 'लाठी चार्ज करणाऱ्या सरकारचा निषेध असो', आदी घोषणांनी परिसर दणाणून सोडला. मोर्चात युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक, बाळा गावडे, सुशांत दळवी, समीर परब, शिवसेना ठाकरे गट शहर प्रमुख प्रमोद मसुरकर, तालुकाप्रमुख शैलेश भोगले, महिला आघाडी जिल्हाप्रमुख नीलम सावंत, माधवी दळवी, संतोष परब यांच्यासह शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले होते. 

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गMaratha Reservationमराठा आरक्षणKankavliकणकवली