शहरं
Join us  
Trending Stories
1
"पंतप्रधानांचा उपदेश की अपयशाचा पुरावा? देश चालवणं आता तुमच्या..." राहुल गांधींचा मोदींवर निशाणा
2
Nepal Plane Fire: नेपाळमध्ये काळ आला होता, पण वेळ आली नव्हती! लँडिंग दरम्यान विमानाच्या टायरला आग; २८९ प्रवाशांचे प्राण थोडक्यात वाचले
3
Canara Bank मध्ये ४४४ दिवसांच्या FD मध्ये २ लाख जमा केल्यास किती मिळेल व्याज, खात्यात एकूण किती रक्कम येईल?
4
हार्दिक पांड्या आणि मुंबई इंडियन्समध्ये बिनसलं? इन्स्टावर अनफॉलो केलं, MI च्या गोटात काल रात्री असं काही घडलं
5
महामुंबई: मुंबई महापालिका निधी वाटपातील गटबाजीने भाजपमध्येच अस्वस्थता 
6
Chandranath Rath : मोठी कारवाई! सुवेंदू अधिकारींचे PA चंद्रनाथ यांच्या हत्येप्रकरणी हिस्ट्रीशीटरसह ३ जणांना अटक
7
हंटाव्हायरसचा विळखा! ३ जणांचा मृत्यू झालेल्या क्रूझवरून भारतीय नागरिकांची सुखरूप सुटका; पुढे काय होणार?
8
केवळ पगारवाढीवर अवलंबून आहात का?; 'ही' ३ कारणे आहेत तुम्ही श्रीमंत होण्यातील अडथळा!
9
'असदुद्दीन ओवेसी हे ओसामा बिन लादेनसारखेच, त्यांच्यात काही फरक नाही', मंत्री नितेश राणेंचे विधान
10
Post Office मध्ये ३६ महिन्यांच्या एफडीमध्ये ₹२,००,००० जमा कराल तर किती मिळेल रिटर्न, पाहा कॅलक्युलेशन
11
Adhik Maas 2026: अधिक मसात का लावली जाते वेणीमाधव वात? काय आहे वैशिष्ट्य, महत्त्व आणि लाभ? वाचा
12
मोदींचं आवाहन, पेट्रोलियम मंत्र्यांनी मांडलं गणित, देशात पेट्रोल, डिझेलचे दर भडकणार, किमती एवढ्या रुपयांनी वाढणार
13
रील बनवण्याचे वेड अन् दोन प्रियकरांचे लफडे; भरल्या घरात बेसबॉल बॅटने नव्या बॉयफ्रेंडचा खेळ खलास
14
विजयच्या शपथविधी सोहळ्याकडे पत्नी अन् मुलांनी फिरवली पाठ, लेकाने हटवलं वडिलांचं नाव
15
भारतीय रणरागिणींचा सुवर्णवेध! शांघाय तिरंदाजी विश्वचषकात जिंकलं गोल्ड, यजमान चीनचा उडवला धुव्वा
16
Keralam CM: केरळचे मुख्यमंत्रिपद कोणाला मिळणार, महाराष्ट्राचे प्रभारी चेन्निथलांसह तीन नेत्यांच्या नावांची चर्चा
17
SBI च्या गुंतवणूकदारांना ₹४४,७२२ कोटींचं नुकसान, 'या' कंपन्यांमध्ये पैसा गुंतवणारे झाले मालामाल
18
हंटाव्हायरसच्या विळख्यात सापडलेले जहाज अखेर स्पेनमध्ये पोहोचले, युद्धपातळीवर मोहीम
19
'वंदे मातरम्' : मुख्यमंत्री विजय यांच्या चालीने भाजप बॅकफूटवर; बंगालमध्ये भाजपकडून उच्चार नाही
20
शेतकऱ्याच्या कांद्याला मिळतात ५० पैसे, ग्राहक मोजतो २५ रुपये; उत्पादन खर्चही निघेना, शेतकऱ्यांचा आक्रोश
Daily Top 2Weekly Top 5

अडला खय?

By admin | Updated: December 1, 2014 00:18 IST

मालवणी तडका

सकलो : कायरे कोनचा खय अडला?
तुकलो : अरे माका सांग सगळी सोंगा घेवक येतत पन खयची सोंगा घेवक येनत नाय?
सकलो : पैशाची सोंगा घेवक येनत नाय.
तुकलो : अगदी बरोबर. खयलाव काम करूचा तर मानूस गावता पन पैसो गावना नाय. मानूस उभो करून येता पन पैसो उभो करूक येना नाय.
सकलो : पन माका याक सांग असा कित्या व्हता हेचो तू इचार केलस काय?
तुकलो : म्हंजे?
सकलो : अरे पैसो उभो रवना नाय असा तू कसा काय म्हनतस? तुझा काम जर लोकोपयोगी आसात तर पैसो उभो रवाक हरकत काय हा?
तुकलो : हैता तूझा म्हन्ना बरोबर हा. लोकोपयोगी आसात तर हरकत काय हा?
सकलो : मन तसा नसता. सांगतना सांगला जाता. लोकांनसाठी आनी वापरला जाता आपल्यासाठी म्हनान लोकांका वाटता कित्या पैसो देवया.
तुकलो : खरा हा. लोकांका अनुभव वायट इल्लो आसता म्हनान लोक ता कारन सांगाक शकतत. तेतूर तेंची काय चूक नाय.
सकलो : पन तुका ह्या आताच कित्या आठावला?
तुकलो : नाय रे आज येका चांगल्या कार्यक्रमाक गेल्लय थिसर चर्चा झाली म्हनान म्हटलंय.
सकलो : कसलो रे चांगलो कार्यक्रम?
तुकलो : जिल्ह्यातले सगळे कलाकार येकत्र येवचे हत. आनी तेतूर तेनी आपली कला सादर करूची हा.
सकलो : भारी मरे इषय हा. मी पन कलाकारच हय मरे.
तुकलो : तू मेल्या घेवपी कलाकार. तुझो तेतूर काय संबंध?
सकलो : मी घेतय पन रातचो घेतय. तेतूर तुका मी कधी तरास दिलय?
तुकलो : मस्करी केलंय. सिरियस घेव नुको. तू काष्टशिल्पकार हस ह्या माका म्हायती हा.
सकलो : व्हेरी गुड! आता कसा माका बरा वाटला. तू माझी अशी स्तुती केलस तर मी घेवचा पन बंध करीन.
तुकलो : तू खूपच सिरीयस घेतलस. मी खराच चेष्टेन बोल्लय.
सकलो : चेष्टेन बोल्लस तरी खरा बोल्लस. अरे आमच्या खऱ्या कलेची तुमी कधी कदरच करूक नाय. म्हनान नकोती कला तुमका आमका दाखवची लागता. तुमी स्तुती करतलास त्या हुसेनची पन आमची कधी कदर करूचास नाय.
तुकलो : अरे तेचेसाठीच तर आमी व्यासपीठ तयार करतव मा? तुमच्या सरक्यांका पुढे हाडूचा हा. तुमच्या पाठीर शाबासकीची थाप पडली की तुमी आनखी जोरात आपली कला वाढवतलास.
सकलो : अगदी बरोबर. नायतर आमी नकोती कला विकसित करीत रवतलव आनी खरी कला आमची लोप पावतली. तेचेसाठी कायतरी करूक व्हया.
तुकलो : कायतरी करू व्हया म्हंजे? काय करतलस? सगळी सोंगा घेवक येतीत रे पन ह्या पैशाचा सोंग कोन घेतलो?
सकलो : कोन म्हंजे? मी थोडी घेतय तू थोडी घेक आनी जे कलाकार हत तेनी परतेकान ह्यो भार उचललो तर काय हरकत. इचार करा मरे.
तुकलो : अरे तुझो इचार येकदम भारी मरे पन तू ह्यो कित्या सांगाक नाय?
सकलो : कसो सांगतलस थिसर निधी आनी लोक बघूक येतले काय हेचारच चर्चा चलत रवली.
तुकलो : तुमचा बघीसा आसला तर लोक येतलेच आनी नाय इले तर तो तेंचो दोष.
सकलो : आता कसो तू पन लायनीवर इलस.
तुकलो : अरे बाबा तेंचे आपसातलेच इचार इतके टोकाक जावक लागले कोन कोनच्या बाजून हा आनी कोन काय आनी कित्या बोलता ताच कळना.
सकलो : सुरवातीक व्हता तसा. तुमचा ‘इंन्टेशन’ बरा हा तर झाडाखाली लावया प्रदर्शन बघनारे बघतीत. हसनारे हसतीत.
तुकलो : अगदी बरोबर. पाऊल तर उचलला हा. पुढे तर टाकूक व्हया. काटो लागात तर बूट घालया.
सकलो : एस! खूप बरा वाटला. कलेचो आदर कलाकारच करूक शकता.
तुकलो : अरे आनी रसिकपन काय कमी नाय हत. तुमी तुमची कला दाखवा. बघनाऱ्यांची रांग लागात...
- विजय पालकर