'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2026 21:28 IST2026-04-03T21:06:09+5:302026-04-03T21:28:29+5:30
अंजली दमानिया यांनी काही बड्या नेत्यांचे खरातशी संभाषण झाल्याचा दावा केला होता. यावर बोलताना दीपक केसरकर म्हणाले की, "जोपर्यंत खरात याच्यावर कोणतेही गुन्हेगारी आरोप नव्हते, तोपर्यंत त्याच्याशी कोणीही फोनवर बोलू शकत होते.

'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी 'अशोक खरात' प्रकरणावरून सत्ताधारी नेत्यांवर केलेल्या आरोपांनंतर आता आमदार दीपक केसरकर यांनी स्पष्टीकरण दिले. "केवळ फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे चुकीचे आहे," अशा शब्दांत केसरकरांनी दमानिया यांच्या दाव्यांना प्रत्युत्तर दिले.
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
अंजली दमानिया यांनी काही बड्या नेत्यांचे खरातशी संभाषण झाल्याचा दावा केला होता. यावर बोलताना दीपक केसरकर म्हणाले की, "जोपर्यंत खरात याच्यावर कोणतेही गुन्हेगारी आरोप नव्हते, तोपर्यंत त्याच्याशी कोणीही फोनवर बोलू शकत होते. त्या काळात संवाद साधण्यात काहीही गैर नव्हते. मात्र, आता जुन्या संभाषणाचे आधार घेऊन मंत्र्यांच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवणे हे राजकीय षड्यंत्र आहे."
या प्रकरणात दीपक लोंढे यांच्या नावावरूनही केसरकरांना लक्ष्य केले जात होते. त्यावर स्पष्टीकरण देताना केसरकर म्हणाले, "दीपक लोंढे हे सिन्नरचे रहिवासी आहेत. त्यांचा आणि खरातचा वैयक्तिक परिचय असू शकतो, पण त्याचा माझ्या नावाशी किंवा कामाशी काडीचाही संबंध नाही. विनाकारण माझं नाव या वादात ओढण्याचा प्रयत्न केला जात आहे.
प्रत्येक गोष्टीत माझं नाव का?
"कोणतीही घटना घडली की विनाकारण माझं नाव त्यात गोवण्याचा प्रयत्न केला जातो. हे चुकीचे आहे, असंही केसरकर म्हणाले.