वेंगुर्लेतील मुस्लिम बांधवांकडून हल्ल्याचा निषेध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2019 11:41 IST2019-02-23T11:39:49+5:302019-02-23T11:41:04+5:30

वेंगुर्ले : काश्मिर-पुलवामा येथे पाकिस्तानकडून झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यात देशाचे जवान शहीद झाले. या भ्याड हल्ल्याचा वेंगुर्लेतील मुस्लिम बांधवांनी ...

Invasion of Muslim Brothers in Vengurle | वेंगुर्लेतील मुस्लिम बांधवांकडून हल्ल्याचा निषेध

वेंगुर्लेतील मुस्लिम बांधवांकडून हल्ल्याचा निषेध

ठळक मुद्देवेंगुर्लेतील मुस्लिम बांधवांकडून हल्ल्याचा निषेधवेंगुर्ले येथील मशिदीसमोर शहीद जवानांना श्रद्धांजली

वेंगुर्ले : काश्मिर-पुलवामा येथे पाकिस्तानकडून झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यात देशाचे जवान शहीद झाले. या भ्याड हल्ल्याचा वेंगुर्लेतील मुस्लिम बांधवांनी जाहीर निषेध केला.

वेंगुर्ले-येथील मशिदीसमोर येथील अब्दुल शेख, मुश्ताक गोलंदाज, मुनाफ गोलंदाज, रियाज मुल्ला, मुस्ताक बेग, आसद मकानदार, ताजुद्दीन मकानदार, सिद्धीक गोलंदाज, जावेद मकानदार, मेहबूब मकानदार, अब्दुल रहेमान शेख, शब्बीर गोलंदाज, जहीर शेख, उस्मान साठी, मुनीर बागवान यांच्यासह समाज बांधवांनी उपस्थित राहून पुलवामा हल्ल्याचा निषेध केला.

तसेच शहीद जवानांना श्रद्धांजली वाहण्यात आली. मुस्लिम धर्म दहशतवाद शिकवत नाही, दहशतवादाचा आम्ही तीव्र शब्दात निषेध करतो, असे मुस्लिम बांधवांनी सांगितले.

Web Title: Invasion of Muslim Brothers in Vengurle