शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू-काश्मीर: हवाई दलाच्या वाहनांवर दहशतवाद्यांचा गोळीबार; लष्कराचे काही जवान जखमी
2
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
3
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
4
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
5
पैशांची कमतरता, पक्षही देईना, निवडणूक लढू शकणार नाही; काँग्रेसच्या महिला उमेदवारानं परत केलं तिकीट
6
नितीन पाटलांना जूनमध्ये खासदार केलं नाही तर पवारांची औलाद सांगणार नाही; अजित पवारांची घोषणा
7
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
8
रोहित शर्माचे काल प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणे ही भारतासाठी डोकेदुखी; MI ने सांगितलं टेंशन वाढवणारं कारण
9
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
10
लोकसभेचा निकाल लागताच चित्र बदलणार; थरूर यांनी सांगितला 'इंडिया' आघाडीचा प्लॅन
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

गृह सोसायटीच्या थकीत मेंटेनन्सवर व्याजमाफी द्यावी : निरंजन डावखरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2020 10:21 AM

कोविड-१९ मुळे निर्माण झालेल्या आर्थिक संकटाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सहकारी गृहनिर्माण सोसायट्यांमधील रहिवाशांच्या सदनिकांच्या थकीत मेंटेनन्सवर किमान सहा महिन्यांसाठी व्याजआकारणी करू नये. सोसायटीला तूर्त राखीव निधी खर्च करण्यासाठी राज्याच्या सहकार विभागाने आदेश द्यावेत, अशी मागणी भाजपाचे आमदार निरंजन वसंत डावखरे यांनी राज्याचे सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांच्याकडे केली आहे.

ठळक मुद्देगृह सोसायटीच्या थकीत मेंटेनन्सवर व्याजमाफी द्यावी : निरंजन डावखरेई-मेलद्वारे सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांना पाठविले पत्र

सिंधुदुर्ग  : कोविड-१९ मुळे निर्माण झालेल्या आर्थिक संकटाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सहकारी गृहनिर्माण सोसायट्यांमधील रहिवाशांच्या सदनिकांच्या थकीत मेंटेनन्सवर किमान सहा महिन्यांसाठी व्याजआकारणी करू नये. सोसायटीला तूर्त राखीव निधी खर्च करण्यासाठी राज्याच्या सहकार विभागाने आदेश द्यावेत, अशी मागणी भाजपाचे आमदार निरंजन वसंत डावखरे यांनी राज्याचे सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांच्याकडे केली आहे.शहरी व निमशहरी भागात सहकारी सोसायट्यांकडून प्रत्येक सदनिका वा दुकानाच्या गाळ्याकडून मासिक देखभाल शुल्क (मेंटेनन्स चार्ज) आकारले जाते. ठराविक मुदतीत शुल्क न भरल्यास, प्रत्येक सोसायटीने केलेल्या नियमानुसार प्रलंबित शुल्कावर १२ ते २१ टक्क्यांपर्यंत व्याज आकारणी केली जाते.

सध्या कोविड-१९ मुळे सामान्य नागरिकांचे आर्थिक गणित कोलमडले आहे. व्यापाऱ्यांचे व्यवसाय बंद, तर नोकरदारांना पगारकपातीला सामोरे जावे लागत आहे, याकडे आमदार निरंजन डावखरे यांनी लक्ष वेधले आहे.राज्यातील बहुतांशी सहकारी सोसायट्यांमध्ये एप्रिल महिन्यापासून मेटेंनन्स न भरणाऱ्यांची संख्या मोठी आहे. गृहनिर्माण सहकारी सोसायटी ही ना नफा तत्वावर चालणारी संस्था आहे. त्यामुळे सद्यस्थितीचा विचार करता, थकीत मेंटेनन्सवर सोसायटीकडून होणारी व्याज आकारणी अन्यायकारक आहे. तरी राज्य सरकारने थकीत मेंटेनन्सवर पुढील सहा महिन्यांकरिता व्याज न आकारण्याचे निर्देश द्यावेत.

त्याचबरोबर आर्थिक अडचणीत असलेल्या सोसायट्यांच्या व्यवस्थापनाला सिंकिंग फंड किंवा राखीव निधीचा तूर्त वापर करण्याची परवानगी द्यावी. या संदर्भात राज्य सरकारने लवकरात लवकर नियमावली निश्चित केल्यास, सामान्य व मध्यमवर्गीयांना दिलासा मिळू शकेल, असे आमदार डावखरे यांनी ई-मेलद्वारे सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांना पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याNiranjan Davkhareनिरंजन डावखरेsindhudurgसिंधुदुर्ग