मालवण-राजकोट येथील शिवपुतळा कामाची पाहणी; कसा, कोणती कंपनी तयार करणार पुतळा.. वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2025 15:40 IST2025-01-23T15:40:03+5:302025-01-23T15:40:31+5:30

१०० वर्ष टिकेल असा पुतळा बांधण्याची अट 

Inspection of the Shivaji Maharaj statue work at Malvan Rajkot | मालवण-राजकोट येथील शिवपुतळा कामाची पाहणी; कसा, कोणती कंपनी तयार करणार पुतळा.. वाचा सविस्तर

मालवण-राजकोट येथील शिवपुतळा कामाची पाहणी; कसा, कोणती कंपनी तयार करणार पुतळा.. वाचा सविस्तर

मालवण: मालवण किनारपट्टीवरील किल्ले राजकोट येथे छत्रपती शिवाजी महाराज्यांचा भव्यदिव्य पुतळा नव्याने उभारण्याचे काम राज्यशासनाच्या वतीने जोरदार सुरु असून सदर काम सार्वजनिक बांधकाम विभागाच्या देखरेखीखाली करण्यात येत आहे. या कामाच्या फाउंडेशनची पाहणी आज सकाळी तहसीलदार वर्षां झाल्टे यांनी केली यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपाभियंता अजितकुमार पाटील हे उपस्थित होते.

राज्य सरकारने याठिकाणी ६० फुट उंच पुतळा उभारण्याचे काम ज्येष्ठ शिल्पकार राम सुतार आणि त्यांचा मुलगा अनिल सुतार यांच्या कंपनीला दिले आहे. राम सुतार आर्ट क्रिएशन्स प्रा. लि. या कंपनीने याआधी गुजरातमधील ‘स्टॅट्यू ऑफ युनिटी’ या सरदार वल्लभभाई पटेलांच्या पुतळ्याचे काम पाहिले होते. देशभरात मोठमोठे पुतळे दर्जेदार पद्धतीने उभरण्याचा मोठा अनुभव त्यांना आहे. 

निविदेनुसार १०० वर्ष टिकेल असा पुतळा बांधण्याची अट घातली गेली आहे. तर १० वर्ष पुतळ्याची देखभाल आणि दुरूस्ती करण्याचीही अट घालण्यात आली आहे. 

६० फूट उंचीचा, ८ मिमी जाडीचा पुतळा

  • राज्य शासनाने राजकोट किल्ला येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची रचना, अभियांत्रिकी, बांधकाम, उभारणी, संचलन आणि देखभाल दुरुस्ती करण्याची निविदा प्रसिद्ध केली होती. 
  • इतर निविदाची तुलना केल्यानंतर राम सुतार यांच्या कंपनीला हे काम देण्यात आले आहे. कास्य धातूपासून ६० फूट उंचीचा ८ मीमी जाडीचा पुतळा तयार होत आहे.


आधी ३ फूट उंचीचे फायबर मॉडेल तयार होणार

  • आधी ३ फूट उंचीचे फायबर मॉडेल तयार केले जाईल. कला संचालनालयाने मान्यता दिल्यानंतरच प्रत्यक्ष बांधकाम हाती घेतली जाईल. 
  • नव्या पुतळ्याचा प्रकल्प आयआयटी-मुंबई आणि अनुभवी कंत्राटदार कंपनीला देण्यात आले आहे. तसेच पुतळा मजबूत असा उभारला जावा, यासाठी तज्ज्ञांचीही मदत घेण्यात येणार आहे.

Web Title: Inspection of the Shivaji Maharaj statue work at Malvan Rajkot

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.