शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वाती मालीवाल यांच्या तक्रारीनंतर पोलीस अ‍ॅक्शन मोडमध्ये, विभव कुमार यांच्याविरोधात FIR दाखल
2
IPL 2024, QUALIFIER 1 च्या एका जागेसाठी तिरंगी लढत; SRH, RR, CSK यांच्यात मजेशीर चुरस
3
खासदारांच्या दिलदार शत्रूनेच चंद्रहार पाटील यांचा घात केला - विशाल पाटील
4
SRH vs GT सामन्यात पाऊस आला धावून, २ संघ गेले वाहून! आता प्ले ऑफचे एकच स्थान शिल्लक
5
स्वाती मालीवाल यांनी दिली लेखी तक्रार, गैरवर्तनप्रकरणी दिल्ली पोलीस करणार चौकशी 
6
पंतप्रधान मोदी किती जागा जिंकणार? चीननंतर आता पाकिस्तानातूनही आला आकडा! तुम्हीही जाणून घ्या
7
लोणारच्या दैत्यसुदन मंदिरामध्ये सूर्यकिरणांचा अभिषेक!
8
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील आरोपी भावेश भिंडे याला अटक; दोन दिवसांपासून सुरु होता शोध
9
मी फडणवीसांवर काहीच बोलणार नाही, कारण...; उद्धव ठाकरेंनी केली घणाघाती टीका
10
अमेठीतून गेले आता रायबरेलीतूनही जाणार खटा-खट-खटा-खट, पंतप्रधान मोदींचा राहुल गांधींवर हल्लाबोल
11
विकेंडला तीन दिवस 'ड्राय डे' राहणार! मद्यप्रेमींना घसा ओला करणे आव्हान 
12
धक्कादायक! प्रॉपर्टीच्या वादातून नायजेरियात मशिदीत बॉम्बस्फोट; आठ जणांचा मृत्यू, १६ जखमी
13
'संपूर्ण जगाला विश्वास, भारतात BJP चे सरकार स्थापन होणार', PM मोदींचा विरोधकांवर निशाणा
14
Mahindra XUV 3XO चा रेकॉर्ड, अवघ्या एका तासात 50000 बुकिंग!
15
तू काय नवीन नाहीस! गौतम गंभीरचा ट्वेंटी-२० वर्ल्ड कपपूर्वी संजू सॅमसनला सज्जड दम 
16
T20 World Cup आधी पाकिस्तानची इंग्लंडविरूद्ध तयारी; शोएब मलिकने सांगितला प्लॅन
17
"इंडिया आघाडी फुटणार अन् शहजादे...", पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
18
रायबरेलीत सोनिया गांधी सक्रिय; अखिलेश यादव, राहुल गांधी पोहोचण्यापूर्वीच कार्यकर्त्यांसोबत बैठक!
19
केजरीवाल बाहेर आल्याने सर्वाधिक नुकसान कुणाचं, भाजप की काँग्रेस?; प्रशांत किशोर यांनी 'गणित'च सांगितलं
20
‘CAA ही मोदींची गॅरंटी, कुणीही हटवू शकणार नाही’, आझमगड येथून मोदींनी दिलं आव्हान

सीमा भागातील मराठी भाषिकांवरील अन्याय खपवून घेणार नाही, सावंतवाडीत धरणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2021 4:09 PM

Sawantwadi Karnatak sindhudurg kolhapur- बेळगाव सीमा भागातील मराठी भाषिकांवर कन्नड लोकांकडून होणाऱ्या अन्यायाविरोधात येथील शिवाजी चौकात महाराष्ट्र एकीकरण समिती, सिंधुदुर्गच्यावतीने धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी मराठी भाषिकांवर होणारा अन्याय आम्ही खपवून घेणार नाही. याठिकाणी उदरनिर्वाह करणाऱ्या कन्नड लोकांच्या पोटावर पाय आणायचा असेल, तरच त्यांनी असे कृत्य करावे, असा इशारा समितीचे जिल्हाध्यक्ष वसंत उर्फ अण्णा केसरकर यांनी दिला. केसरकर यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन सुरू करण्यात आले आहे.

ठळक मुद्देसीमा भागातील मराठी भाषिकांवरील अन्याय खपवून घेणार नाही :वसंत केसरकर एकीकरण समितीकडून सावंतवाडीत धरणे आंदोलन

सावंतवाडी : बेळगाव सीमा भागातील मराठी भाषिकांवर कन्नड लोकांकडून होणाऱ्या अन्यायाविरोधात येथील शिवाजी चौकात महाराष्ट्र एकीकरण समिती, सिंधुदुर्गच्यावतीने धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी मराठी भाषिकांवर होणारा अन्याय आम्ही खपवून घेणार नाही. याठिकाणी उदरनिर्वाह करणाऱ्या कन्नड लोकांच्या पोटावर पाय आणायचा असेल, तरच त्यांनी असे कृत्य करावे, असा इशारा समितीचे जिल्हाध्यक्ष वसंत उर्फ अण्णा केसरकर यांनी दिला. केसरकर यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन सुरू करण्यात आले आहे.यावेळी माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी, माजी नगरसेवक विलास जाधव, सुरेश भोगटे, अपर्णा कोठावळे, दर्शना बाबर-देसाई, राजू धारपवार, नगरसेविका दिपाली भालेकर, दिलीप भालेकर, सचिन इंगळे, उमा वारंग, उदय नाईक, अफरोज राजगुरू, हिदायतुल्ला खान आदींसह मोठ्या संख्येने मराठी भाषाप्रेमी या आंदोलनात सहभागी झाले आहेत.केसरकर म्हणाले, बेळगाव सीमा भागात सुरू असलेल्या वादात मराठी भाषिकांचा नाहक बळी जात आहे. दरम्यान, हा खटला न्यायालयात असून, त्याचा निकाल शांततेच्या मार्गाने लागत आहे. मात्र, कर्नाटकातील काही समाजकंटकांकडून कायदा हातात घेऊन रस्त्यात दंगली घडवून आणल्या जात आहेत. यात मराठी भाषिकांवर हल्ले केले जात आहेत तर महाराष्ट्रातून कोल्हापूरच्या दिशेने जाणाऱ्या रुग्णवाहिकांवरसुद्धा कन्नड समाजकंटकांकडून दगडफेक केली जात आहे. हा सर्व प्रकार निषेधार्थ आहे.कर्नाटकातील लोक मोठ्या संख्येने महाराष्ट्रात वास्तव्यास आहेत. मात्र, त्यांना याठिकाणी मराठी भाषिकांकडून कोणताही त्रास दिला जात नाही. उलट त्यांचा याठिकाणी सन्मानच केला जातो. मात्र, आपल्या भाऊबंधांच्या पोटावर पाय आणायचा असेल तर अशा कर्नाटकातील समाजकंटकांनी हे कृत्य करावे, मग आम्हीसुद्धा आमची ताकद दाखवू, असेही ते म्हणाले. 

टॅग्स :belgaonबेळगावSawantwadiसावंतवाडीKarnatakकर्नाटकsindhudurgसिंधुदुर्गkolhapurकोल्हापूर