शहरं
Join us  
Trending Stories
1
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
2
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
3
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
4
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
5
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
6
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
7
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
8
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
9
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
10
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
11
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
12
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
13
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
14
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
15
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
16
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
17
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
18
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
19
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
20
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...

पर्यावरणीय विनाशात भारताचा उच्चक्रम : असीम सरोदे, ती ओळख पुसण्याची वेळ आली आहे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 18, 2017 3:56 PM

पर्यावरणीय विनाशाच्या उंबरठ्यावर भारताचा जागतिक क्रमवारीत उच्चक्रम असणे ही लाजिरवाणी गोष्ट पुसून काढण्यासाठी राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाच्या माध्यमातून नवीन पर्यावरणीय साक्षरता आणली जात आहे. बेताल विकास प्रक्रिया व भवताली घडणारे राजकारण यांचा विचार करणे क्रमप्राप्त झाले असल्याचे मत मानवीहक्क विश्लेषक व पर्यावरण तज्ज्ञ अ‍ॅड. असीम सरोदे यांनी केले.

ठळक मुद्देवसुंधरा सायन्स सेंटरद्वारे ५२ वे अखिल भारतीय मराठी विज्ञान अधिवेशनती ओळख पुसण्याची वेळ आली आहे : असीम सरोदे रामदास कोकरे, भाऊ काटदरे, संजीव करपे उपस्थित

कुडाळ : पर्यावरणीय विनाशाच्या उंबरठ्यावर भारताचा जागतिक क्रमवारीत उच्चक्रम असणे ही लाजिरवाणी गोष्ट पुसून काढण्यासाठी राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाच्या माध्यमातून नवीन पर्यावरणीय साक्षरता आणली जात आहे. निसर्गाची मानवाने केलेली दुरवस्था अशा बिंदूवर पोहोचली आहे की आपली जगण्याची मूल्ये, धर्मपरंपरांचे उत्सव साजरे करण्याची पद्धत, बेताल विकास प्रक्रिया व भवताली घडणारे राजकारण यांचा विचार करणे क्रमप्राप्त झाले असल्याचे मत मानवीहक्क विश्लेषक व पर्यावरण तज्ज्ञ अ‍ॅड. असीम सरोदे यांनी केले.वसुंधरा सायन्स सेंटरद्वारे आयोजित ५२ व्या अखिल भारतीय मराठी विज्ञान अधिवेशनात अ‍ॅड. सरोदे बोलत होते. उत्कृष्ट कचरा व्यवस्थापनाचे उदाहरण घालून देणारे रामदास कोकरे, कासव प्रजाती वाचविण्यासाठी कार्यरत असलेले भाऊ काटदरे, शाश्वत निर्वाहासाठी बांबूचा वापर करणारे संजीव करपे यावेळी उपस्थित होते.सध्याची विकासाची कल्पना चंगळवाद आणि भौतिकवाद यांना केंद्रस्थानी ठेवून आखली जाते असे दिसते. शाश्वतता समाविष्ट नसेल, तर दिखाऊपणावर भर देण्यात येतो. जलसंपत्तीचा विकास नद्यांच्या संरक्षणाशिवाय शक्य नाही. पर्यावरणावर होणाऱ्या आघातांचे मूल्यांकन न करता नियोजन करण्यात येणारे अपारदर्शक विकासाचे मॉडेल नेहमीच लोकविरोधी असते, असे सांगून अ‍ॅड. सरोदे म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज अत्यंत पुरोगामी व कृतिशील पर्यावरणवादी होते. पण आज त्यांचा विचार पायदळी तुडवून छत्रपतींचा पुतळा समुद्रात उभारणे पर्यावरणाचे कायमस्वरूपी भयंकर नुकसान करणारे आहे याची जाणीवही भावनांचे राजकारण करणाऱ्यांना उरलेली नाही.पर्यावरणीय विध्वंस, जैवविविधता, अनियंत्रित वाळू उपसा, पाण्याची तस्करी, वृक्षांच्या कत्तली, समुद्री जीवांची नासधूस, समुद्र किनाऱ्यांवर अतिक्रमण, डोंगरफोड, नद्यांमधील प्रदूषण अशा विविध न्याय्य मागण्यांसाठी राष्ट्रीय हरित न्यायाधीकरण कायदा हे एक प्रभावी अस्त्र आता लोकांसाठी उपलब्ध आहे.

पर्यावरणाचे मूलभूत प्रश्न मांडण्यासाठी विशेष न्यायालय स्थापन करणारे भारत जगातील तिसरे राष्ट्र ठरले आहे. ज्यांनी पर्यावरणाचे नुकसान केले आहे त्यांनीच पर्यावरण पूर्ववत करण्यासाठीचा भार उचलावा आणि प्रदूषण करणाऱ्यांनीच आर्थिक नुकसान भरपाई द्यावी, हे कायद्यातील तत्त्व आहे.

पर्यावरणीय माहितीचे व यंत्रणांचे लोकशाहीकरण राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणामुळे घडून येत आहे, असेही अ‍ॅड. सरोदे म्हणाले. त्यांनी राष्ट्रीय हरित न्यायाधीकरण कायद्याबद्दल सोप्या भाषेत सविस्तर माहिती दिली. धारणाक्षम विकासासाठी सगळ्यांनी कार्यरत होण्याचे आवाहन करून अ‍ॅड. सरोदे म्हणाले, पर्यावरण वाचविण्यासाठी लढाई लढण्यासाठी एका एनव्हायरमेंट डिफेन्स फंड (पर्यावरणाची बाजू मांडण्यासाठी आर्थिक निधी)ची निर्मिती करण्यासाठी वसुंधरा विज्ञान केंद्राने पुढाकार घ्यावा, असे आवाहनही सरोदे यांनी केले.धोक्याचा इशाराकिनारी व सागरी परिसंस्थांचा विध्वंस करणारे उद्योग व कारखाने भ्रष्ट मार्गाने परवानगी मिळवून सुरूच राहिले तर शेतकरी आत्महत्यांप्रमाणेच समुद्रावर अवलंबून असणारे कोळी समाजातील लोकसुध्दा आत्महत्या करण्यास सुरुवात करतील, असा धोक्याचा इशारा अ‍ॅड. असीम सरोदे यांनी दिला.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गenvironmentवातावरण