शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

सागरी जीवसृष्टीवर होणारे विपरीत परिणाम चिंताजनक

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2025 18:19 IST

वाढत्या पर्यटनामुळे स्थानिकांना रोजगारही मिळतोय, ही सकारात्मक बाब आहे. मात्र, पर्यावरणावर त्याचे विपरीत परिणामही होत आहेत.

संदीप बोडवेमालवण : सागरी प्रजाती ही आपली मौल्यवान संपत्ती आहे आणि मालवणसारखी किनारपट्टी पर्यटनाचे आकर्षण केंद्र झाली आहे. येथे स्कूबा डायव्हिंग, कोरल रीफ्स आणि ऐतिहासिक स्थळांमुळे पर्यटकांची संख्या वाढत आहे. या वाढत्या पर्यटनामुळे स्थानिकांना रोजगारही मिळतोय, ही सकारात्मक बाब आहे.मात्र, पर्यावरणावर त्याचे विपरीत परिणामही होत आहेत. प्लास्टिक कचरा, जलप्रदूषण, बोटींचा आवाज आणि तेलगळती यामुळे पर्यावरणीय तणाव वाढत आहे. सागरी जीवसृष्टीवर होणारा हा विपरीत परिणाम चिंताजनक आहे आणि त्यांचे संरक्षण अत्यंत आवश्यक आहे. पर्यटन आणि पर्यावरण यामध्ये समतोल राखणे ही काळाची गरज ठरली आहे.दरवर्षी १ ऑक्टोबर ते ७ ऑक्टोबरदरम्यान साजरा केला जाणारा वन्यजीव सप्ताह हा केवळ वाघ, हत्ती, पक्षी यांच्यापुरता मर्यादित नसून आपल्या सागरी जीवसृष्टीचा देखील समावेश आहे.मालवण मरीन सेंच्युरी : एक आशेचा किरण :मालवण मरीन सेंच्युरी ही महाराष्ट्रातील एकमेव मरीन सेंच्युरी असून तिथला उद्देश समुद्री जैवविविधतेचे संवर्धन आणि संरक्षित क्षेत्र तयार करणे आहे. येथे आढळणारे कोरल रीफ्स, समुद्री कासव, विविध मासे, समुद्री पक्षी आणि समुद्रातील वनस्पती यांचे संरक्षण केंद्रस्थानी आहे. जर योग्य नियोजन, प्रशासन आणि स्थानिक लोकांच्या सहभागाने ही सेंच्युरी विकसित केली गेली, तर ती पर्यटन आणि संरक्षण यामध्ये समतोल साधणारी एक आदर्श मॉडेल योजना ठरू शकते.स्थानिक समुदायाची भूमिका :मालवणमधील स्थानिक मच्छीमार, व्यवसायिक आणि युवक जर पर्यावरणसंवेदनशील पर्यटनासाठी पुढे आले, तर संपूर्ण समुद्री परिसंस्थेचे संरक्षण शक्य आहे. स्थानिक पातळीवरखालील उपक्रम राबवता येतील :

  • सागरी स्वच्छता मोहीम
  • शाळांमधील पर्यावरण शिक्षण वाढवणे
  • सामुदायिक ‘नो-प्लास्टिक’ निर्णय घेणे
  • इको-फ्रेंडली बोटींचा वापर करणे.

प्रदूषणाचे वाढते संकट व त्याचे परिणाम :प्लास्टिक कचरा : पर्यटकांनी वापरलेल्या प्लास्टिकच्या बाटल्या, पिशव्या थेट समुद्रात फेकल्या जातात, ज्यामुळे मासे, कासव आणि इतर सागरी जीव यांचा वरतीचा बळी पडतो.तेलगळती : टुरिस्ट आणि मच्छीमार बोटीमधून समुद्रात होणारी इंधनाची गळती जलप्रदूषणास कारणीभूत ठरते.ध्वनिप्रदूषण : जलक्रीडा, बोटींचा आवाज आणि लाउडस्पीकरमुळे सागरी प्राण्यांच्या नैसर्गिक वर्तनात अडथळा निर्माण होतो.कोरल रीफ्सचा ऱ्हास : स्कूबा डायव्हिंग आणि इतर साहसी क्रियाकलापांमुळे कोरल रीफ्स नष्ट होत आहेत, जे अनेक सागरी जीवांसाठी निवासस्थान आहेत.यामुळे सागरी प्रजातींची संख्या घटते, काही नवीन प्रजाती लोप पावतात आणि संपूर्ण परिसंस्था असंतुलित होते.जबाबदार नागरिकांची भूमिका :सागरी जीवसृष्टीचे रक्षण हे फक्त शासन किंवा पर्यावरण संस्थांचे काम नाही, तर प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे. विशेषतः मालवणसारख्या ठिकाणी येणाऱ्या पर्यटकांनी खालील बाबींत लक्ष द्यावे.

  • प्लास्टिकचा वापर टाळा आणि ‘तुमचा कचरा परत आणा’ हा नियम पाळा.
  • बायोडिग्रेडेबल साहित्य वापरा, जसे की कागदी पिशव्या, स्टीलच्या बाटल्या.
  • ध्वनिप्रदूषण कमी करा; समुद्रकिनाऱ्यावर जोरात संगीत न वाजवा.
  • कोरल आणि सागरी जीवांना स्पर्श करू नका; स्कूबा डायव्हिंग करताना काळजी घ्या.
  • स्थानिक मार्गदर्शकांचा सन्मान करा; हे केवळ मार्गदर्शक नाहीत, तर त्या भागाचे संरक्षणकर्तेही आहेत.
  • पर्यावरण शिक्षण वाढवा; विद्यार्थी आणि पर्यटकांनी सागरी जीवनाबद्दल अधिक माहिती घ्यावी.

आज आपण सागर वाचवला, तर उद्या तो वाचवेलवन्यजीव सप्ताह हा केवळ प्राणिप्रेमाचा उत्सव नाही, तर हा जागरूकतेचा आणि कृतीचा संदेश अधोरेखित करतो. मालवणसारखी जैवविविधतेने नटलेली जागा आपलीच आहे. तिचे रक्षण ही फक्त पर्यावरणप्रेमींची नव्हे, तर संपूर्ण समाजाची सामूहिक जबाबदारी आहे. पर्यटन, रोजगार आणि निसर्ग यांचा समतोल साधत, ‘संवेदनशील पर्यटन - सुरक्षित सागरी जीवन’ ही आपली दिशा असावी. आज आपण सागर वाचवला, तर उद्या तो आपल्याला वाचवेल.

English
हिंदी सारांश
Web Title : Marine life threatened: Urgent need to balance tourism and conservation.

Web Summary : Malvan's marine biodiversity faces threats from tourism, pollution. Balancing tourism with conservation is crucial. Malvan Marine Sanctuary offers hope through community involvement and sustainable practices. Protect the ocean for a sustainable future.