शहरं
Join us  
Trending Stories
1
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
2
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
3
"गुलामाने प्रतिक्रिया द्यायची नसते हे त्यांना सांगा"; अधिवेशनात उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंवर घणाघात
4
विरोधी पक्षनेतेपदाबाबत उद्धव ठाकरे आक्रमक, सरकारची कोंडी करण्याची तयारी; स्पष्ट इशाराच दिला
5
“अधिवेशानाचे सत्ताधाऱ्यांना गांभीर्य नाही, ‘हम करे सो कायदा’ पद्धतीने…”: हर्षवर्धन सपकाळ
6
“संसदीय लोकशाहीत विविध पक्षांच्या संघटनेचे योगदान देखील महत्त्वाचे”; मंत्री चंद्रकांत पाटील
7
“बाबा आणि आत्याने आईला खूप मारलं'”; ढसाढसा रडत ४ वर्षांच्या लेकाचा धक्कादायक खुलासा
8
अक्षय खन्नाला आहेत दोन भाऊ, एक सख्खा अन् एक सावत्र, दोघांनीही बॉलिवूडमध्ये केलं काम
9
विराट कोहली, रोहित शर्माला कपिल देव यांचा अजब सल्ला, म्हणाले- "मला वाटतं की टीम इंडियात..."
10
कॅमेरा नसलेला 'आयफोन' बाजारात? खरेच असा फोन अस्तित्वात आहे का? ॲप्पलच बनविते...
11
या ठिकाणी अचानक पडले ७०० मोठे खड्डे, जमिनीत गाडला जातोय संपूर्ण परिसर, कारण काय?
12
“साधूसंत झाडावर राहणार का? एक दिवस लोक सरकारला ‘चले जाव’ म्हणतील”; अण्णा हजारे संतापले
13
मैत्रिणींचा सोनमला वाचवण्याचा प्रयत्न? राजा रघुवंशीच्या भावाचा खळबळजनक आरोप
14
राहुल गांधींसोबतच्या बैठकीला शशी थरूर अनुपस्थित, चर्चांना उधाण, पक्षाने दिली अशी माहिती 
15
टाटा-हिंडाल्कोसह 'या' शेअर्समध्ये बंपर तेजी! बाजारात सलग दुसऱ्या दिवशी गुंतवणूकदारांची चांदी
16
Numerology: एकसारखे नंबर वारंवार दिसणे केवळ योगायोग नाही, तर उज्ज्वल भविष्याचे शुभ संकेत!
17
अजबच! घटस्फोट झाला, पण पत्नीने ना पोटगी मागितली ना... , उलट लग्नातल्या बांगड्याही केल्या परत, कोर्टही अवाक्   
18
नवा सिक्सर किंग! १४ वर्षीय वैभव सूर्यवंशीचा कहर! १४ षटकार ठोकत मोडला १७ वर्षांपूर्वीचा जागतिक विक्रम
19
चांदी झाली 'सोनेरी'! २ लाख रुपये किलोचा टप्पा पार, पण गुंतवणुकीपूर्वी 'हा' भयानक इतिहास वाचा
20
इम्रान खानचा काटा काढायला असीम मुनीरचा खतरनाक प्लॅन; देशद्रोहाचा खटला चालवला जाणार?
Daily Top 2Weekly Top 5

सिंधुदुर्ग जिल्ह्यात अंध-अपंगाच्या संख्येत वाढ, औषध कंपन्यांसह डॉक्टर जबाबदार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2018 17:45 IST

सिंधुदुर्ग जिल्ह्यात पोलिओ व अंध-अंपगांची संख्या कमी होेण्यापेक्षा ती दिवसेंदिवस वाढत असून याला जबाबदार औषध कंपन्या व डॉक्टर असल्याचा गंभीर आरोप महालक्ष्मी अंध- अपंग सामाजिक संघटनेचे अध्यक्ष हरी गावकर यांनी केला आहे.

ठळक मुद्देसिंधुदुर्ग जिल्ह्यात अंध-अपंगाच्या संख्येत वाढऔषध कंपन्यांसह डॉक्टर जबाबदार अंध-अपंग संघटनेचा आरोप२८ मार्चला प्रांत कार्यालयावर आक्रोश मोर्चा

सावंतवाडी : जिल्ह्यात पोलिओ व अंध-अंपगांची संख्या कमी होेण्यापेक्षा ती दिवसेंदिवस वाढत असून याला जबाबदार औषध कंपन्या व डॉक्टर असल्याचा गंभीर आरोप महालक्ष्मी अंध- अपंग सामाजिक संघटनेचे अध्यक्ष हरी गावकर यांनी केला आहे.

अंध-अपंग बांधवाच्यावतीने आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी त्यांनीे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी अंध-अपंग बांधवांच्यावतीने २८ मार्च रोजी येथील प्रांताधिकारी कार्यालयावर आक्रोश मोर्चा काढणार असल्याचेही जाहीर केले.गावकर म्हणाले, अंध बांधवांना आपल्या न्याय हक्कासाठी वेळोवेळी भांडावे लागत आहे. अंधबांधवांचे हक्क डावलण्यात येत असून आमच्यावर अन्याय होत आहे.  स्थानिक स्वराज्य संस्थांमधून देण्यात येणाऱ्या तीन टक्के अपंग निधीतही मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार करण्यात येत असून प्रत्यक्षात आम्हाला दीड टक्का निधीच वाटप करण्यात येत आहे. उर्वरित दीड टक्का निधी संगनमताने लाटला जातो.जिल्ह्यात तीन टक्के राखीव जागांवर आज अधिकाऱ्यांची मुले भरती करण्यात आली आहेत. तसेच यातून अपंगांना डावलण्यात आले आहे ही वस्तूस्थिती आहे. त्याचा शासन स्तरावरून शोध घेण्यात यावा. डॉक्टर व औषध कंपन्यांच्या साटेलोट्यामुळे अंपगत्वात वाढ होत आहे.

डॉक्टरांकडून रूग्णांना देण्यात येणारी औषधे चांगल्या दर्जाची दिली जात नसल्याने मूकबधीर, मतिमंदत्व अशा प्रकारच्या रोगांना प्रोत्साहन मिळत आहे. यांच्यावर अन्न व औषध प्रशासनाने वेळीच लक्ष घालावे, अशी मागणी त्यांनी यावेळी केली. आज रस्त्याचा कामात होणाऱ्या भ्रष्टाचारामुळे मोठ्या प्रमाणात अपघात होत आहे.रस्त्याच्या साईटपट्ट्या, कच्चे गटार, दिशादर्शक फलक, डांबराचे अल्प प्रमाण व अंदाजपत्रकानुसार न करण्यात येणारी कामे यामुळे रस्ता काही काळातच खराब, होऊन रस्त्यावर खड्डे पडल्यामुळे अपघात होऊन अपंगत्वाचे प्रमाण वाढलेले दिसत आहे.या सर्वांचे लक्ष वेधण्यासाठी २८ मार्चला प्रांताधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणाार आहे. या मोर्चासाठी आमदार बच्चू कडू यांनाही निमंत्रित करण्यात आले आहे, असे संघटेनेचे सल्लागार सुनील पेडणेकर यांनी सांगितले.यावेळी संघटनेचे सल्लागार सुनील पेडणेकर, आत्माराम परब, विठ्ठल शिरोडकर, उमेश कोरगावकर, सत्यवान वारंग, राधाबाई नाईक आदी उपस्थित होते.स्वतंत्र रेशन कार्ड द्या!अपंगांच्या समस्यांवर आमदार, खासदार यांचे कोणाचेही लक्ष नाही. त्यामुळे आम्हा अंपगांवर उपासमारीची वेळ आली आहे. दिवसेंदिवस वाढणारी महागाई व महागड्या सेवा सवलती यामुळे मोठा फटका अपंगांना सोसावा लागत आहे. त्यामुळे शासनाने अपंगांना स्वतंत्र रेशन कार्ड द्यावे, अशी मागणी यावेळी अंध-अंपग बांधवांनी बोलून दाखविली.अपंग निधीत वाढ कराशासनाकडून राज्यातील अपंगाना देण्यात येणारा संजय गांधी अपंग निधी हा ६०० रूपये एवढा तुटपुंजा देण्यात येतो. त्यात वाढ करून तो गोवा, कर्नाटक, राज्याच्या धर्तीवर २ हजार रूपये एवढा देण्यात यावा, अशी मागणी त्यांच्याकडून करण्यात आली.महालक्ष्मी अंध-अंपग सामाजिक संघटनेच्या अंध बांधवांनी एकत्र येत अपंगाच्या समस्या मांडल्या.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गHealthआरोग्य