शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

दरोडा घालणाऱ्या प्रमुख आरोपीसह दोघे ताब्यात, निरुखे-पांग्रड येथील घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 7, 2019 14:04 IST

दीड वर्षांपूर्वी निरूखे पांग्रड येथील रामदास करंदीकर यांच्या घराची सीआयडी अधिकारी असल्याचा बनाव करून झडती घेत साडेपाच लाख रुपयांची लूट करून दरोडा घालणाऱ्या प्रमुख आरोपीसह अन्य एका आरोपीला सिंधुदुर्ग पोलीस पथकाने ताब्यात घेतले.

ठळक मुद्देदरोडा घालणाऱ्या प्रमुख आरोपीसह दोघे ताब्यात, निरुखे-पांग्रड येथील घटना सीआयडी अधिकारी असल्याचा बनाव करुन घराची झडती

सिंधुदुर्गनगरी : दीड वर्षांपूर्वी निरूखे पांग्रड येथील रामदास करंदीकर यांच्या घराची सीआयडी अधिकारी असल्याचा बनाव करून झडती घेत साडेपाच लाख रुपयांची लूट करून दरोडा घालणाऱ्या प्रमुख आरोपीसह अन्य एका आरोपीला सिंधुदुर्ग पोलीस पथकाने ताब्यात घेतले.

मुख्य सुत्रधार श्रीजीत रमेशन (देहू रोड, पुणे) याला नवी मुंबईतून तर दुसरा संशयीत इरफान निजामुद्दीन शेख (रा.पुणे) याला पुण्यातून अटक करण्यात आली, अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम यांनी पत्रकार परिषदेत दिली. दरम्यान या दोन्ही संशयितांना कुडाळ न्यायालयाने ९ पर्यत पोलीस कोठडी सुनावली आहे.जिल्हा पोलीस अधीक्षक दालनात पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अपर पोलीस अधीक्षक तुषार पाटील, सावंतवाडी विभागीय पोलीस अधिकारी शिवाजी मुळीक, सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंद्र हुलावळे उपस्थित होते.जिल्हा पोलीस अधीक्षक गेडाम म्हणाले, २२ एप्रिल २०१८ रोजी कुडाळ तालुक्यातील निरूखे करंदीकरवाडी येथील रामदास पुरूषोत्तम करंदीकर यांच्या घरी सीआयडीचे बनावट अधिकारी बनून आलेल्या काहीजणांनी आपण पोलीस अधिकारी असून अवैध मालमत्तेचा शोध घेण्यासाठी झाडाझडती घेणार असल्याचे सांगत घराची झडती घेतली होती. या झडतीत करंदीकर यांच्या घरातील साडेपाच लाख रुपयांची लूट करण्यात आली होती.

या प्रकरणात करंदीकर यांनी दिलेल्या तक्रारीनुसार संबंधित बनावट अधिकाऱ्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात एकूण ९ आरोपी असल्याचे निष्पन्न झाले होते. पैकी यापूर्वी ५ संशयितांना अटक करण्यात आली होती. तर चार संशयीत फरार होते. यातील प्रमुख सूत्रधारासह अन्य एका आरोपीस गुरूवारी दोन वेगवेगळ्या ठिकाणांहून अटक करण्यात आली. सुत्रधार श्रीजीत हा मुंबईत एका टोलनाक्यावर कामाला होता.

पोलिसांना चकवा देण्याच्या उद्देशाने तो दिवसाही आपल्या राहत्या घरी जात नव्हता. तर त्याचा अन्य साथीदार इरफान हा पुणे येथे ड्रायव्हर म्हणून कामाला होता. दोघेही पोलिसांना सापडत नव्हते. पोलिसांचे विशेष पथक या आरोपींच्या शोधार्थ तब्बल दहा वेळा मुंबई येथे जाऊन आले होते. मात्र पदरी निराशा पडत होती. येथील पोलीस अधिकारी राजेंद्र हुलावळे यांना या प्रमुख आरोपीसह अन्य एका आरोपीचा सुगावा लागला होता. त्यानुसार पोलीस पथक मुंबईला रवाना झाले.

संशयीत श्रीजीत याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने इरफान यांचे नाव सांगितले. लागलीच दोघांना गुरूवारी ताब्यात घेण्यात आले. या पथकात वरील पोलीस अधिकाऱ्यांसह पोलीस हवालदार पडलीक, दुधवडकर, शिंदे यांचा समावेश होता.या टोळीला सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एका घरात ३ कोटी रुपये आल्याची माहिती मिळाली होती.

या माहितीच्या मागावर म्होरक्या श्रीजीतसह हे टोळके सिंधुदुर्गात दाखल झाले होते. जिल्ह्यात दाखल झाल्यावर या टोळक्याने त्या घराबाबत खूप चौकशी केली. अखेर या टोळक्याला करंदीकर यांच्या घराबाबत सांगण्यात आले आणि त्यांनी तिथे दरोडा टाकला असे सांगतानाच हे सर्वजण या कालावधीत कुडाळमधील एका हॉटेलमध्ये थांबले होते, असेही गेडाम यांनी यावेळी सांगितले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीsindhudurgसिंधुदुर्ग