घरालगतच्या झुडपांना आग, बांदा मुस्लीमवाडी येथील घटना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2020 15:11 IST2020-05-14T15:09:13+5:302020-05-14T15:11:31+5:30
बांदा मुस्लीमवाडी येथे भरवस्तीत दाऊद आगा यांच्या घरासमोरील झुडपांना अचानक आग लागल्याने एकच खळबळ उडाली. आगीने रौद्ररुप धारण केल्याने व लगतच घरे असल्याने नागरिकांची तारांबळ उडाली. ही आग मंगळवारी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास लागली. सावंतवाडी नगरपालिकेचा अग्निशमन बंब वेळीच आल्याने अनर्थ टळला.

बांदा मुस्लीमवाडीत भरवस्तीत दाऊद आगा यांच्या घरासमोरील झुडपांना आग लागली.
बांदा : बांदा मुस्लीमवाडी येथे भरवस्तीत दाऊद आगा यांच्या घरासमोरील झुडपांना अचानक आग लागल्याने एकच खळबळ उडाली. आगीने रौद्ररुप धारण केल्याने व लगतच घरे असल्याने नागरिकांची तारांबळ उडाली. ही आग मंगळवारी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास लागली. सावंतवाडी नगरपालिकेचा अग्निशमन बंब वेळीच आल्याने अनर्थ टळला.
बांदा मुस्लीमवाडीत भरवस्तीलगत झुडपांना आग लागली. त्या लगतच घरे असल्याने नागरिकांची तारांबळ उडाली. आग आटोक्यात आणण्यासाठी स्थानिक ग्रामस्थ व ग्रामपंचायत सदस्य जावेद खतीब यांनी कळशीने पाणी मारून शर्थीचे प्रयत्न सुरू केले.
मात्र, आगीन रौद्रावतार घेतल्याने जावेद खतीब यांनी त्वरित सावंतवाडीचे नगराध्यक्ष संजू परब व नगरसेवक मनोज नाईक यांना याची कल्पना दिली. त्यांनी तत्काळ अग्निशमन बंब पाठविला. त्यानंतर आग आटोक्यात आणण्यात यश आले.