देवगड येथे सर्वाधिक लांबीच्या झीपलाईनचे थाटात उद्घाटन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2020 19:29 IST2020-12-28T19:27:30+5:302020-12-28T19:29:52+5:30
tourism Sindhudurg- भारतीय समुद्रकिनाऱ्यावरील व महाराष्ट्रातील सर्वाधिक लांबीच्या झीपलाईनचे उद्घाटन देवगड बीचवरती आमदार नीतेश राणे यांच्या हस्ते करण्यात आले. फ्लाईंग कोकण यांच्यावतीने या झीपलाईनसाठी सुविधा नागरिकांना देण्यात येणार आहे. यामुळे देवगडच्या पर्यटन विकासामध्ये आणखी एक मानाचा तुरा खोवण्यात आला आहे.

देवगड बीचवर आमदार नीतेश राणे यांच्या हस्ते झीपलाईनचे उद्घाटन करण्यात आले. (छाया : वैभव केळकर )
देवगड : भारतीय समुद्रकिनाऱ्यावरील व महाराष्ट्रातील सर्वाधिक लांबीच्या झीपलाईनचे उद्घाटन देवगड बीचवरती आमदार नीतेश राणे यांच्या हस्ते करण्यात आले. फ्लाईंग कोकण यांच्यावतीने या झीपलाईनसाठी सुविधा नागरिकांना देण्यात येणार आहे. यामुळे देवगडच्या पर्यटन विकासामध्ये आणखी एक मानाचा तुरा खोवण्यात आला आहे.
देवगड पवनचक्की ते बीचवरून देवगड किल्ला रोडकडे जाणाऱ्या रस्त्यापर्यंत १८८५ फूट लांब व २८० फूट उंचीवरून जाणाऱ्या या झीपलाईनची सुविधा फ्लाईंग कोकण यांच्यावतीने सुरू करण्यात आली आहे. या झीपलाईनचे उद्घाटन आमदार नीतेश राणे यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी माजी आमदार अजित गोगटे, नगराध्यक्षा प्रियांका साळसकर, उपनगराध्यक्ष राजेंद्र वालकर, देवगड पंचायत समिती सभापती सुनील पारकर, कणकवली सभापती दिलीप तळेकर, बाळा खडपे, प्रकाश राणे, भाजप तालुकाध्यक्ष संतोष किंजवडेकर, संदीप साटम, नगरसेवक उमेश कणेरकर, माजी नगरसेवक शरद टुकरुल, उष:कला केळुस्कर, नगरसेवक बापू जुवाटकर, विकास कोयंडे, उज्ज्वला अदम, प्राजक्ता घाडी, सुभाष धुरी, योगेश चांदोस्कर, माजी नगरसेवक गणपत गावकर व फ्लाईंग कोकणचे जोईल बंधू, आदी उपस्थित होते.
पर्यटन प्रकल्प आणण्यासाठी प्रयत्न : नीतेश राणे
या झीपलाईनच्या उद्घाटनप्रसंगी आमदार नीतेश राणे म्हणाले, पर्यटन एके पर्यटनाच्या माध्यमातून देवगड तालुक्याचा विकास केला जात आहे. भविष्यामध्ये मालवणपेक्षाही देवगड तालुक्यामध्ये जास्त पर्यटकांचा लोंढा येऊन पर्यटन विकासाला चालना मिळणार आहे. पर्यटनाचे प्रकल्प जास्तीत जास्त आणण्यासाठी आपले प्रयत्न आहेत. जनतेमधूनही असे पर्यटनात्मक प्रकल्प उभारणाऱ्या व्यक्तींना आपले कायम सहकार्य राहणार आहे, असेही ते म्हणाले.