आंबोली वर्षा पर्यटनाच्या पार्श्वभूमीवर पोलिस सर्तक, अतिरिक्त पोलीस कुमक मागवणार
By अनंत खं.जाधव | Updated: June 15, 2024 15:57 IST2024-06-15T15:55:52+5:302024-06-15T15:57:02+5:30
आवश्यक ठीकाणी पोलिस बंदोबस्त वाढविण्यात असून मद्यपी पर्यटकांवर कारवाई करण्यात येणार आहे. अशी माहिती सावंतवाडीचे पोलिस उपअधीक्षक विनोद कांबळे यांनी दिली ते सावंतवाडीत पत्रकारांशी बोलत होते.

आंबोली वर्षा पर्यटनाच्या पार्श्वभूमीवर पोलिस सर्तक, अतिरिक्त पोलीस कुमक मागवणार
सावंतवाडी : आंबोली वर्षा पर्यटन हंगामात मुख्य धबधब्यासह अन्य पर्यटन स्थळावर कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी सावंतवाडी पोलिस सतर्क झाले आहेत तसेच आवश्यक ठीकाणी पोलिस बंदोबस्त वाढविण्यात असून मद्यपी पर्यटकांवर कारवाई करण्यात येणार आहे. अशी माहिती सावंतवाडीचे पोलिस उपअधीक्षक विनोद कांबळे यांनी दिली ते सावंतवाडीत पत्रकारांशी बोलत होते.
आंबोली येथील वर्षा पर्यटनाला आता सुरूवात होणार आहे.या ठिकाणी कोणताही अनुचित प्रकार घडू नये तसेच शनिवार व रविवार या दोन दिवशी मोठ्याप्रमाणात पर्यटक येत असतात आलेल्या पर्यटकांना त्रास होऊ नये यासाठी अतिरिक्त पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार असल्याचे पोलिस उपअधीक्षक कांबळे यांनी सांगितले.
पावसाळ्यात आंबोलीत येणार्या पर्यटकांची संख्या मोठी असते त्यामुळे या पार्श्वभूमिवर आवश्यक ती खबरदारी पोलिस प्रशासना कडून घेण्यात येणार आहे.
अतिउत्साही पर्यटकांना रोखण्यात येणार असून मद्यधुंद अवस्थेत धागडधिंगाणा घालणार्या पर्यटकांवर कारवाई करण्यात येणार आहे त्या दृष्टीनेही पोलिस बंदोबस्त वाढविण्याचे आदेश ही देण्यात आले आहेत.तसेच गर्दीच्या दिवशी अवजड वाहानाबाबत ही निर्णय घेण्यात येणार असल्याचे कांबळे यांनी सांगितले