शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणनं आखला बदल्याचा 'मास्टर प्लॅन'! आखाती देशांतील ८ मोठे पूल 'हिट लिस्ट'वर; बघा संपूर्ण लिस्ट
2
पश्चिम बंगालमधील सर्वात 'लेटेस्ट' निवडणूक सर्वेक्षणात भाजपची मोठी मुसंडी; TMC ला झटका! जनतेचा 'मूड' बदलला?
3
“बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत महाविकास आघाडीचे प्रमुख नेते निर्णय घेतील”: संजय राऊत
4
तुम्ही घाबरलात राघव...! राज्यसभेतील उपनेते पदावरून हटविण्यामागचे कारण समोर आले, आपचे थेट आरोप... 
5
INS तारागिरी! समुद्रात येतंय वादळ, भारताची नौदल ताकद वाढणार; किती विध्वंसक आहे युद्धनौका?
6
अमेरिकेने इराणमध्ये मर्यादा ओलांडल्या! जिनिव्हा कन्व्हेन्शनचे नियम पायदळी तुडवले, काय केले..?
7
"आमच्या घरी नोटांची बंडलं यायची अन् बाबा..." ढोंगी अशोक खरातच्या मुलानेच उघडली पित्याची कुंडली
8
Life Lesson: जपानी लोकांसारखं यशस्वी आणि दीर्घायुषी व्हायचंय? 'या' सात नियमांचे आजपासून पालन करा
9
भयंकर! बिहारमध्ये विषारी दारूने घेतला चौघांचा बळी; अनेकांची गेली दृष्टी, ७ जणांची मृत्यूशी झुंज
10
इस्रायलचा पुन्हा एकदा विश्वासघात, नेतन्याहू संतापले; भारताच्या २ मित्र देशांमध्ये तणाव वाढला
11
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
12
"काँग्रेस सगळ्या निवडणुका लढायला पुढे जाते, पण निकाल लागल्यानंतर कळतं...", संजय राऊत यांचा टोला
13
HDFC बँकेच्या दुबई शाखेत मोठा गैरव्यवहार; ५ वर्षांपर्यंत लपवलं सत्य, अतनु चक्रवर्तींच्या राजीनाम्याशी संबंध?
14
'इराणने युद्ध जिंकल्याचे जाहीर करावे आणि...'; कोणी दिला हा सल्ला, ट्रम्पवर कडी करा...
15
वर्षभरापूर्वीच झाले लग्न, पतीचे दुसऱ्या महिलेसोबत अनैतिक संबंध; मृदंगाचार्य अमोल लघाणेच्या पत्नीने...; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
16
‘लोक माझ्यावर जळतात, माझ्याविरोधात…’, पराभवानंतर अजिंक्य रहाणे संतापला, टीकाकारांवर बरसला
17
Peace Of Mind: नातं की ओझं? भगवान बुद्धांच्या 'या' एका सूत्राने दूर होईल तुमच्या मनातील सर्व गोंधळ!
18
Success Story: १०,००० पगार ते ४०० कोटींचा व्यवसाय, कसा होता ब्रॉडबँड सेवा पुरवणाऱ्या जम्मू काश्मीरच्या विवेक रैनांचा प्रवास?
19
गोरखपूर ट्रेन नाही, रत्नागिरी पॅसेंजरमुळे ८ लोकलला फटका; दादरला येणार की नाही? मध्य रेल्वे म्हणते…
20
होर्मुझचा तिढा सुटला नाहीय तोच समुद्रात अमेरिका-चीन एकमेकांविरोधात उभे ठाकले; पनामाचा वाद उफाळला... 
Daily Top 2Weekly Top 5

कणकवलीत 'बिनविरोध पॅटर्न'! उद्धवसेनेच्या उमेदवारांची माघार; आतापर्यंत भाजपाचे ५ जण बिनविरोध

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2026 16:06 IST

वरवडे पंचायत समितीत ३ उमेदवार रिंगणात होते. त्यापैकी उद्धवसेना,मनसे उमेदवाराने माघार घेतल्याने भाजपा उमेदवार यांचा एकमेव अर्ज राहिला

सिंधुदुर्ग - राज्यात महापालिका निवडणुकीत चर्चेत आलेला बिनविरोध पॅटर्न जिल्हा परिषद, पंचायत समितीतही पाहायला मिळत आहे. कणकवलीतील पुन्हा याच पॅटर्नमुळे भाजपाचे आतापर्यंत ५ उमेदवार बिनविरोध झाले आहेत. मंत्री नितेश राणे यांच्या कणकवली मतदारसंघात बिनविरोध निवडीचे सत्र भाजपाकडून सुरू आहे. बिडवाडी पंचायत समितीमध्ये बिनविरोध निवड झाल्यानंतर आता वरवडे पंचायत समितीत भाजपाचे अधिकृत उमेदवार सोनू सावंत यांच्याविरोधात विरोधकांनी अर्ज मागे घेतले आहेत. त्यामुळे सोनू सावंत यांची बिनविरोध निवड झाली आहे.

सोनू सावंत यांच्याविरोधात उद्धवसेनेचे सुधीर सावंत आणि मनसेचे शांताराम सादये या दोघांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले आहेत. त्यामुळे कणकवलीत भाजपाचे पंचायत समिती निवडणुकीमधील दुसरे उमेदवार सोनू सावंत हे बिनविरोध झाले आहेत. अद्याप निवडणूक विभागाकडून याची अधिकृत घोषणा होणे बाकी आहे. वरवडे पंचायत समितीत ३ उमेदवार रिंगणात होते. त्यापैकी उद्धवसेना,मनसे उमेदवाराने माघार घेतल्याने भाजपा उमेदवार यांचा एकमेव अर्ज राहिला. त्यामुळे त्यांनी बिनविरोध निवड होणार आहे. त्याशिवाय खारेपाटण जिल्हा परिषद गटातून उद्धवसेनेच्या मीनल तळगावकर यांनी निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेतली. तिथे भाजपाच्या उमेदवार प्राची इस्वलकर या बिनविरोध झाल्या आहेत. बांदा जिल्हा परिषद गटातून भाजपाचे उमेदवार प्रमोद कामत हेदेखील बिनविरोध ठरले आहेत. 

आतापर्यंत ३ उमेदवार बिनविरोध

भाजपाचा हा उद्धवसेनेला दुसरा धक्का कणकवली तालुक्यातून देण्यात आला आहे. आतापर्यंत भाजपाचे कणकवली मतदारसंघांमध्ये ३ उमेदवार बिनविरोध झाले आहेत. यामध्ये बिडवाडी पंचायत समिती, वरवडे पंचायत समिती तर वैभववाडी तालुक्यातील कोकिसरे पंचायत समितीच्या उमेदवारांचा समावेश आहे. 

४ उमेदवारी अर्ज मागे

कणकवली तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी दाखल केलेल्या उमेदवारी अर्जापैकी चार अर्ज शुक्रवारी मागे घेण्यात आले. यामध्ये खारेपाटण जिल्हा परिषद मतदार संघातील उज्ज्वला वीरेंद्र चिके (अपक्ष) तसेच फोंडाघाट जिल्हा परिषद मतदार संघातील सुजाता सदानंद हळदीवे (शिंदेसेना) तसेच वरवडे पंचायत समिती मतदार संघातील सुधीर दिगंबर सावंत (उद्धवसेना), शांताराम सुरेश सादये (मनसे) या उमेदवारांचा समावेश आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Kanakkavli: Unopposed Pattern! Shiv Sena Withdraws, BJP Wins 5 Uncontested

Web Summary : In Kanakkavli, BJP secures five unopposed wins in Panchayat Samiti elections after Shiv Sena candidates withdraw. This continues the trend seen in municipal elections, strengthening BJP's position in Nitesh Rane's constituency. Uddhav Sena's candidate also withdrew from Kharepatan Zilla Parishad seat, further aiding BJP's uncontested victories.
टॅग्स :ZP Electionमहाराष्ट्र जिल्हा परिषद निवडणूक निकाल २०२५BJPभाजपाNitesh Raneनीतेश राणे