सावंतवाडी मतदारसंघातील आरोग्य व्यवस्था सुधारणार; दीपक केसरकर अन् तानाजी सांवत यांच्यात बैठक

By अनंत खं.जाधव | Published: December 13, 2023 03:45 PM2023-12-13T15:45:21+5:302023-12-13T15:49:51+5:30

या बैठकीत मतदार संघातील चारही रूग्णालयात वैद्यकीय अधीक्षक देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

Improvement of health system in Sawantwadi Constituency; Meeting between Deepak Kesarkar and Tanaji Sawat | सावंतवाडी मतदारसंघातील आरोग्य व्यवस्था सुधारणार; दीपक केसरकर अन् तानाजी सांवत यांच्यात बैठक

सावंतवाडी मतदारसंघातील आरोग्य व्यवस्था सुधारणार; दीपक केसरकर अन् तानाजी सांवत यांच्यात बैठक

सावंतवाडी : वेंगुर्ला, दोडामार्ग, सावंतवाडी व शिरोडा या चारही रुग्णालयातील आरोग्य व्यवस्था मृत्युशय्येवर आहे.रूग्णालय आहे पण रूग्णालयात डॉक्टर नाही.आणि डॉक्टर आहेत पण वैद्यकीय सुविधा नाहीत या सर्वाच्या पार्श्वभूमीवर शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी मंगळवारी रात्रीउशिरा आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांची भेट घेतली.

या बैठकीत मतदार संघातील चारही रूग्णालयात वैद्यकीय अधीक्षक देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच काही काहि रूग्णालयात तज्ञ डॉक्टर नाहीत ते सुद्धा देण्याची व्यवस्था केली आहे. डॉक्टरची निवासस्थाने सुद्धा नवीन बांधून देण्यात येणार आहेत.अशा विविध विषयांवर चर्चा झाल्याची माहिती राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी दिली.

नागपूर येथील विधान भवनात सुरु असलेल्या हिवाळी अधिवेशनात शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर यांनी सावंतवाडी, दोडामार्ग, वेंगुर्ला व शिरोडा या चारही उपजिल्हा व ग्रामीण रुग्णालयातील समस्या संदर्भात राज्याचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांचेशी केलेल्या चर्चेनुसार आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांच्या दालनात आरोग्य खात्याचे वरीष्ठ अधिकाऱ्या समवेत बैठक घेण्यात आली.

तिन्ही तालुक्यातील उपजिल्हा व ग्रामीण रूग्णालयातील रिक्तपद भरण्यासाठी प्रामुख्याने चर्चा झाली. विशेष तज्ञांची पद देखील भरली जाणार आहेत. तर सावंतवाडीतील भुलतज्ञांचे थकीत मानधन अदा केल जाणार आहे. तसेच कंत्राटी कर्मचाऱ्यांच मानधन देखील डिसेंबर दोन महिन्यात काढलं जाणार आहे. डॉक्टरांना क्वार्टर्स बांधून देण्यासाठीची चर्चा देखील या बैठकीत झाली. तर वेंगुर्ला, दोडामार्गात शवविच्छेदन गृहासाठी प्रस्ताव करण्याची सुचना केली. तिन्ही तालुक्यातील रूग्णालयातील समस्या कायमस्वरूपी दुर करण्यासाठी या बैठकीत चर्चा झाल्याची प्राथमिक माहिती शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी दिली आहे.

Web Title: Improvement of health system in Sawantwadi Constituency; Meeting between Deepak Kesarkar and Tanaji Sawat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.