शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
3
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
4
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
5
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
6
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
7
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
8
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
9
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
10
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
11
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
12
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
13
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
14
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
15
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
16
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
17
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!
18
निवडणुका जवळ आल्यावर आमच्यावर आरोप होतात; आता आमची बदनामी झाली, अजित पवारांची खंत
19
Digital Gold SEBI: डिजिटल गोल्ड खरेदी असाल, तर थांबा! ऑनलाईन सोने खरेदी करणाऱ्यांना सेबीचा सावधगिरीचा इशारा
20
शशी थरूर यांनी अडवाणींचे कौतुक केले, नेहरू आणि इंदिरा गांधींबद्दल धक्कादायक विधान केले

जिल्ह्यातील महसूल विभागासाठी आदर्शवत ठरावे : दीपक केसरकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2019 14:06 IST

सावंतवाडी तहसिदार कार्यालयाची सुंदर वास्तू उभारली आहे. या इमारतीच्या फर्निचरचे काम अजून बाकी आहे. लवकरच ही सर्व कामे पूर्ण होतील व जिल्ह्यातील सर्वात सुंदर असे तहसिदार कार्यालय निर्माण होईल व जिल्ह्यातील महसूल विभागासाठी ही इमारत आदर्शवत अशी ठरेल असे प्रतिपादन पालकमंत्री दीपक केरसकर यांनी सावंतवाडी येथे तहसिलदार कार्यालयाच्या नुतन इमारतीच्या उद्घाटन प्रसंगी आयोजित कार्यक्रमावेळी केले.

ठळक मुद्देजिल्ह्यातील महसूल विभागासाठी आदर्शवत ठरावे : दीपक केसरकरसावंतवाडी तालुका तहसिलदार कार्यालय सुंदर वास्तू

सिंधुदुर्गनगरी : सावंतवाडी तहसिदार कार्यालयाची सुंदर वास्तू उभारली आहे. या इमारतीच्या फर्निचरचे काम अजून बाकी आहे. लवकरच ही सर्व कामे पूर्ण होतील व जिल्ह्यातील सर्वात सुंदर असे तहसिदार कार्यालय निर्माण होईल व जिल्ह्यातील महसूल विभागासाठी ही इमारत आदर्शवत अशी ठरेल असे प्रतिपादन पालकमंत्री दीपक केरसकर यांनी सावंतवाडी येथे तहसिलदार कार्यालयाच्या नुतन इमारतीच्या उद्घाटन प्रसंगी आयोजित कार्यक्रमावेळी केले.यावेळी जिल्हाधिकारी डॉ. दिलीप पांढरपट्टे, माजी आमदार राजन तेली, सावंतवाडीचे नगराध्यक्ष बबन साळगावकर, महिला व बालकल्याण समितीच्या सभापती पल्लवी राऊळ, सावंतवाडीचे राजे खेमराज सावंत, युवराज लखम राजे, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष रेश्मा सावंत, जिल्हा परिषद सदस्य शितल राऊळ, मायकल डिसोझा, राजन मुळीक, रोहिणी गावडे, पंचायत समिती सभापती पंकज पेडणेकर, उपसभापती नेमळेकर, अप्पर जिल्हाधिकारी मंगेश जोशी, सावंतवाडीचे प्रांताधिकारी सुशांत खांडेकर, तहसिलदार राजाराम म्हात्रे, उपवनसंरक्षक समाधान चव्हाण, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता युवराज देसाई, सुरेश गवस, ठेकेदार सुनिल केळूसकर, प्रसाद नार्वेकर आदींसह सावंतवाडी वासीय मोठ्या संख्येने उपस्थित होते.नागरिकांना चांगल्या सुविधा मिळाव्यातजिल्ह्याच्या विकासासाठी निधीची कमतरता पडू देणार नाही असे सांगून पालकमंत्री केसरकर पुढे म्हणाले की, सर्व शासकीय इमारती या सुसज्ज व सुंदर होत आहेत. या वास्तूंच्या रुपातून नागरिकांनाही चांगल्या सुविधा मिळाव्यात. सध्या सावंतवाडीमध्ये वनसदृष्य जमिनीचा प्रश्न मोठा आहे. यावरही लवकरच तोडगा काढण्यात येईल. सध्या शिरशिंगेच्या रस्त्याचा प्रश्न मार्गी लावला आहे.

लवकरच कोलगावच्या रस्त्याच्या प्रश्नही सुटेल असा विश्वास व्यक्त करुन केसरकर म्हणाले की, सावंतवाडी येथे महसूलच नाही तर इतर सर्व कार्यालये एकत्र आणण्याच्या दृष्टीने नियोजन करण्यात यावे. एकाच ठिकाणी सर्व कार्यालये असल्यास नागरिकांना सोयीचे होईल व चांगल्या सुविधा पुरवता येतील. जिल्हा सुंदर बवनव्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन काम करण्याची गरज आहे. सावंतवाडी तालुक्यतील पाणी पुरवठा योजनांसाठी साडे पाच कोटींचा निधी मंजूर केला आहे. त्यामुळे येत्या काळात तालुक्यामध्ये कोठेही पाण्याची समस्या निर्माण होणार नसल्याचेही पालकमंत्री केसरकर यांनी सांगितले.

टॅग्स :TahasildarतहसीलदारDeepak Kesarkarदीपक केसरकर sindhudurgसिंधुदुर्ग