डुक्कर असल्याच्या संशयावरून शिकारीने केली सहकार्याची शिकार
By अनंत खं.जाधव | Updated: December 5, 2025 20:34 IST2025-12-05T20:33:34+5:302025-12-05T20:34:18+5:30
ओवळीयेच्या जंगलांत घडली घटना : शिकारी ताब्यात: चार ते पाच असल्याचा संशय

डुक्कर असल्याच्या संशयावरून शिकारीने केली सहकार्याची शिकार
सावंतवाडी : ओवळीये येथील जंगलात डूक्कराची शिकार करण्यासाठी गेलेल्या शिकारीचीच शिकार झाल्याची दुर्देवी घटना शुक्रवारी सकाळी घडली गुरूवारी डुक्कर दिसला म्हणून सकाळीच सर्वजण शिकारीसाठी गेले असतनाच डुक्कर हकवण्यासाठी रान काढत असतनाच अचानक डुक्कराच्या पावलांचा आवाज आला म्हणून मारलेल्या गोळी ने सचिन सुभाष मर्गज (28 मर्गज वाडी वेर्ले) याचा वेध घेतला असून तो जागीच ठार झाला.
या घटनेची माहिती मिळताच पोलिसांकडून घटनास्थळावर जात पंचनामा केला व कोलगाव येथील शिप्रियान डाॅन्टस याला ताब्यात घेण्यात आले आहे.शिकारी साठी गेलेल्या मध्ये पाच ते सहा जणांचा समावेश असल्याचे दबक्या आवाजात चर्चा असून कोण गेले यांची माहिती मात्र मिळू शकली नाही.
सह्याद्री पट्ट्यातील सांगेली ओवळीये येथील जंगलात काहि यूवक शिकारीसाठी गेले होते.यातील सचिन मर्गज याला गुरूवारीच ओवळीये च्या जंगलात डुक्कर दिसून आला असल्याने त्याने आपल्या साथीदारांना यांची माहिती दिली त्यानंतर शुक्रवारी सकाळीच कोलगाव येथील शिप्रियान डाॅन्टस यांच्यासह अन्य काहि जण शिकारीच्या उद्देशाने जंगलात गेले होते.शिप्रियान कडे बंदुक असल्याने तो नेम धरून बसला होता.
तर अन्य काहि जण डुक्कर यावा म्हणून रान काढत होते.त्यात सचिन होता..तो वाकून वाकून रान काढत असतनाच पायाचे मोठ मोठ्याने आवाज झाला म्हणून सुप्रियान ने डुक्कर असल्याचे दिसताच बंदुक रोखली समोर झाडात सचिन हा वाकून रान काढत होता.त्याचा समज झाला कि हाच डुक्कर आहे.रानात त्याला दिसले नाही.आणि त्याने थेट बंदुकीचा बार सचिन च्या दिशेने रोखत अचूक वेध घेतला.मात्र प्रत्यक्षात तेथे डुक्कर नव्हताच.
या घडल्या प्रकाराने सर्वच जण घाबरून गेले होते.त्यानी सचिन मर्गज याचा मृतदेह तेथेच टाकून पळ काढला आणि स्थानिकांना माहिती दिली त्यानंतर सचिन चा मृतदेह सावंतवाडीतील रूग्णालयात हलविण्यात आला.सावंतवाडीत मृतदेहांची उत्तरीय तपासणी करण्यात आली. याबाबतची माहीती मिळताच माजी सरपंच पंढरी राऊळ, ग्रामपंचायत सदस्य विजय राऊळ, बाळू गावडे, सुनील राऊळ, प्रसाद गावडे, सुनील मर्गज, सदा कदम, कृष्ण मर्गज, प्रकाश मर्गज, मोहन मर्गज, सतीश लिंगवत, माजी पंचायत समिती सदस्य बाबल अल्मेडा, रामदास मिस्त, सुरेश गावडे, बाबू शेटये, रामचंद्र चव्हाण, भगवान राणे आदींनी घटनास्थळी धाव घेतली होती. याबाबत सावंतवाडी पोलीस ठाण्यात त्याचे वडील सुभाष मर्गज यांनी तक्रार दिली.
सचिनच्या हनवटीत गोळी तर छातीत शेरे
शिप्रियान याच्या बंदुकीच्या गोळीने सचिन चा वेध घेतल्यानंतर त्याला तत्काळ उपचार मिळाले नाही दुपारनंतर येथील कुटीर रुग्णालयात हलविण्यात आले.यावेळी सचिनच्या हनवटी तोडाला बंदुकीचे शेरे लागल्या होता.यातील मयत सचिन हा अविवाहित होता. तो गावात छोटी मोठी वेल्डीगचे काम करत होता. तो मनमिळाऊ स्वभावाचा होता. त्याच्या अचानक जाण्यामुळे गावात हळहळ व्यक्त होत आहे.
घर वेर्लेत पण राहत असे सांगेली ला
मृत सचिन यांचे शिक्षण बारावी पर्यत झाले होते.तो वेर्ले येथील घरी न राहाता मावशीकडे सांगेली येथे राहत होता.तर आई वडील वेर्ले येथे राहत असून त्याच्या दोन बहिणीची लग्न झाली आहेत.घरी आई वडिल असतात वडिल छोटी मोठी मोलमजुरी करतात .