corona virus -जिल्ह्याच्या ग्रामिण भागातील सर्व शाळा ओस, महाविद्यालयांना सुट्टी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2020 14:17 IST2020-03-17T14:03:47+5:302020-03-17T14:17:04+5:30
साथरोग प्रतिंबधात्मक कायदा 1897 च्या कलम 2 (ख) नुसार जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या अधिपत्याखाली येणाऱ्या सर्व प्राथमिक, माध्यमिक, सरकारी तसेच खाजगी शाळा 31 मार्च 2020 रोजीपर्यंत बंद ठेवल्या आहेत. त्यामुळे सरकारी तसेच खाजगी शाळा ओस पडल्या आहेत.

corona virus -जिल्ह्याच्या ग्रामिण भागातील सर्व शाळा ओस, महाविद्यालयांना सुट्टी
सिंधुदुर्गनगरी : साथरोग प्रतिंबधात्मक कायदा 1897 च्या कलम 2 (ख) नुसार जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या अधिपत्याखाली येणाऱ्या सर्व प्राथमिक, माध्यमिक, सरकारी तसेच खाजगी शाळा 31 मार्च 2020 रोजीपर्यंत बंद ठेवल्या आहेत. त्यामुळे सरकारी तसेच खाजगी शाळा ओस पडल्या आहेत.
साथरोग प्रतिंबधात्मक कायदा 1897 च्या कलम 2 (ख) नुसार जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी यांना प्राप्त झालेल्या अधिकारांचा वापर करून जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या अधिपत्याखाली येणाऱ्या सर्व प्राथमिक, माध्यमिक, सरकारी तसेच खाजगी शाळा, महाविद्यालये, आयुक्त व्यवसाय व प्रशिक्षण केंद्र, यांच्या आस्थापनेवरील शैक्षणिक संस्था,चित्रपटगृहे, तरण तलाव, व्यायामशाळा, नाट्यगृहे, म्युझियम या आस्थापना दिनांक 31 मार्च 2020 रोजीपर्यंत बंद ठेवल्या आहेत.
जिल्हा परिषदेच्या ज्या शाळांमध्ये 10 वी व 12 वी च्या परीक्षा तसेच विद्यापिठांच्या परीक्षा विहीत वेळापत्रानुसार घेण्यात याव्यात. तसेच अशा परीक्षा केंद्रांवर आजारी विद्यार्थी इतर विद्यार्थ्यांच्या संपर्कात येणार नाहीत याची दक्षता घ्यावी अशा सूचना जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी दिल्या आहेत.