होळीचा सण : गवंडीवाड्याच्या शिमगोत्सवाला १२१ वर्षांची परंपरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2020 14:20 IST2020-03-17T14:18:25+5:302020-03-17T14:20:22+5:30
शिमगोत्सवाच्या निमित्ताने शहरातील गवंडीवाडा राममंदिर येथील स्थानिक कलाकारांचे १२१ वर्षांची परंपरा लाभलेले खेळे शहरवासीयांसाठी सध्या लक्षवेधी ठरत आहेत. कोकणात सध्या शिमगोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. काही ठिकाणी दीड तर काही ठिकाणी पाच दिवसांचा शिमगोत्सव साजरा केला जातो.

शिमगोत्सवाच्या निमित्ताने मालवण शहरातील गवंडीवाडा राममंदिर येथील स्थानिक कलाकारांचे १२१ वर्षांची परंपरा लाभलेले खेळे शहरवासीयांसाठी सध्या लक्षवेधी ठरत आहेत.
मालवण : शिमगोत्सवाच्या निमित्ताने शहरातील गवंडीवाडा राममंदिर येथील स्थानिक कलाकारांचे १२१ वर्षांची परंपरा लाभलेले खेळे शहरवासीयांसाठी सध्या लक्षवेधी ठरत आहेत. कोकणात सध्या शिमगोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. काही ठिकाणी दीड तर काही ठिकाणी पाच दिवसांचा शिमगोत्सव साजरा केला जातो.
होळीचा सण झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी शहरात धूलिवंदनाचा सण साजरा केला जातो. त्यानंतर शहरात विविध ठिकाणी खेळे सादर केले जातात. शहरातील गवंडीवाडा राममंदिरच्यावतीने स्थानिक कलाकारांमार्फत सादर केल्या जाणाऱ्या खेळ्यांना १२१ वर्षांची परंपरा आहे.
होळीच्या तिसऱ्या दिवशीपासून सुरू होणाऱ्या या खेळांमध्ये सचिन पाटकर, ललीत नागडे, गणेश वाडकर, शंकर धुरी, बाळा चुरी, महेश राठोड, विवेक आडकर, संतोष मंडलिक, बंटी हिंदळेकर, अनिकेत गवंडी, उदय बिळवसकर, विकास पांचाळ, हर्षल पेडणेकर, संतोष मंडलिक हे स्थानिक कलाकार रंगून शहरातील देऊळवाडा, भरड, सोमवारपेठ, बाजारपेठ, मेढा तसेच अन्य भागात पहाटेपर्यंत खेळे सादर करून शबय गोळा करतात.
यात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे हे सर्व कलाकार स्वखर्चाने या खेळ्यांमध्ये सहभागी होत आपले योगदान देतात. गोळा होणारे संपूर्ण शबयचे पैसे हे राममंदिरात साजऱ्या होणाऱ्या रामनवमी, हनुमान जयंती उत्सवांच्या कार्यक्रमासाठी वापरले जातात.
तीन दिवस सुरू असलेल्या या खेळ्यांचा समारोप शनिवारी करण्यात आला.