कर्नाटकातील हायस्पीड नौका ताब्यात, आरवली येथे सिंधुदुर्ग मत्स्य विभागाची धडक कारवाई 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2025 15:14 IST2025-01-30T15:13:52+5:302025-01-30T15:14:12+5:30

मालवण : कर्नाटक किनारपट्टीवरील हायस्पीड नौकांच्या सिंधुदुर्ग किनारपट्टीवरील घुसखोरी व मासळी लुटीबाबत आमदार नीलेश राणे यांनी सातत्याने आक्रमक भूमिका ...

High speed boat seized in Karnataka Sindhudurg Fisheries Department takes action in Aravalli | कर्नाटकातील हायस्पीड नौका ताब्यात, आरवली येथे सिंधुदुर्ग मत्स्य विभागाची धडक कारवाई 

कर्नाटकातील हायस्पीड नौका ताब्यात, आरवली येथे सिंधुदुर्ग मत्स्य विभागाची धडक कारवाई 

मालवण : कर्नाटक किनारपट्टीवरील हायस्पीड नौकांच्या सिंधुदुर्ग किनारपट्टीवरील घुसखोरी व मासळी लुटीबाबत आमदार नीलेश राणे यांनी सातत्याने आक्रमक भूमिका घेतली, तर मत्स्य व्यवसाय व बंदरे विकासमंत्री नितेश राणे यांनी मंत्रिपदाचा पदभार घेतल्यानंतर मत्स्य विभागाची धडक कारवाई अधिकच गतिमानपणे सुरू झाली. सिंधुदुर्ग किनारपट्टीवर पुन्हा एकदा सिंधुदुर्ग मत्स्य विभागाने धडक कारवाई करत कर्नाटक येथील हायस्पीड नौका ताब्यात घेतली आहे.

आरवली वेंगुर्ला समोर १६ वाव समुद्री क्षेत्रात मत्स्य व्यवसाय विभागाचे अंमलबजावणी अधिकारी मुरारी भालेकर सहायक मत्स्य विकास अधिकारी परवाना अधिकारी वेंगुर्ला यांनी २८ जानेवारी रोजी नियमित गस्त घालत होते. त्यावेळी रात्री ११:३० वाजण्याच्या सुमारास कर्नाटक राज्याच्या जलधी क्षेत्रासाठी परवाना असलेली जलशिला सुवर्णा कोटियान (रा. कोदावूर ता. मलपे, राज्य कर्नाटक) यांची नौका हनुमा सानिध्य नों. क्र.- IND - KA- २-MM-५२१७ द्वारे महाराष्ट्रातील जलधीक्षेत्रात आरवली वेंगुर्ला समोर अनधिकृतरित्या मासेमारी करत असताना, दिसून आली. त्या नौकेला मत्स्य विभागाने ताब्यात घेतले. नौकेवर नौका तांडेलसह इतर खलाशी होते.

ही नौका जप्त करून वेंगुर्ला बंदरात ठेवण्यात आली आहे आणि त्यावर असणाऱ्या मासळीचा लिलाव करण्याची कार्यवाही करण्यात आली. अंमलबजावणी अधिकारी मुरारी भालेकर, सहायक मत्स्य विकास अधिकारी (परवाना अधिकारी वेंगुर्ला) यांनी पोलिस कर्मचारी आळवेकर, तसेच दीपेश मायबा, मिमोह जाधव व सागरी सुरक्षा पर्यवेक्षक सागर परब व राजेश कुबल, स्वप्निल सावजी, नीलेश पाणजी, प्रणित मुणगेकर, हर्षद टाक्कर, भगवान तांडेल, चंद्रकांत कुबल, सागरी सुरक्षा रक्षक यांच्या सहकार्याने ही कारवाई करण्यात केली.

प्रतिवेदन दाखल केल्यानंतर या नौकेबाबत सुनावणी

अंमलबजावणी अधिकारी यांनी प्रतिवेदन दाखल केल्यानंतर या नौकेबाबत सुनावणी सहायक आयुक्त मत्स्य व्यवसाय सिंधुदुर्ग यांच्या न्यायालयात ठेवण्यात येणार आहे, अशी माहिती मत्स्य विभागाच्या वतीने देण्यात आली.

Web Title: High speed boat seized in Karnataka Sindhudurg Fisheries Department takes action in Aravalli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.