दोडामार्ग-बेळगाव-कोल्हापूर मुख्य रस्त्यावर जंगली हत्तींचा कळप, वाहन धारकांचा उडाला थरकाप

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2022 16:15 IST2022-03-29T16:15:07+5:302022-03-29T16:15:54+5:30

गेल्या काही दिवसांपासून जंगली हत्तींनी हेवाळे गावातील बांबर्डे घाटीवडे विजघर येथील शेतकरी बांधवांच्या शेतीचे नुकसान करुन धुमाकूळ घातला आहे.

Herds of wild elephants on Dodamarg Belgaum Kolhapur main road, vehicle owners tremble | दोडामार्ग-बेळगाव-कोल्हापूर मुख्य रस्त्यावर जंगली हत्तींचा कळप, वाहन धारकांचा उडाला थरकाप

दोडामार्ग-बेळगाव-कोल्हापूर मुख्य रस्त्यावर जंगली हत्तींचा कळप, वाहन धारकांचा उडाला थरकाप

दोडामार्ग : काल, सोमवारी मध्यरात्री दोडामार्ग ते बेळगाव कोल्हापूर मुख्य रस्त्यावर चक्क चार जंगली हत्तींचा कळप दिसून आला. यावेळी या मार्गावर ये जा करणाऱ्या वाहन धारकांचा भितीने थरकाप उडाला.

गेल्या काही दिवसांपासून जंगली हत्तींनी  हेवाळे गावातील बांबर्डे घाटीवडे विजघर येथील शेतकरी बांधवांच्या शेतीचे नुकसान करुन धुमाकूळ घातला आहे. यानंतर या हत्तीच्या कळपाने मुख्य रस्त्याकडे मार्गक्रमण केले आहे. काल, सोमवारी मध्यरात्री हत्तीचा कळप चक्क दोडामार्ग ते बेळगाव कोल्हापूर मुख्य रस्त्यावर रपेट करताना दिसला.

काही वाहनधारकांना हत्तीचा कळप दिसतात त्यांची घांबरगुडी उडाली. काही मिनिटे रस्त्त्यावर चालत नंतर हा कळप रस्ता सोडून बागायती दिशेने गेल्याची माहिती प्रत्यक्षदर्शी संदेश राणे यांनी दिली.

Web Title: Herds of wild elephants on Dodamarg Belgaum Kolhapur main road, vehicle owners tremble